TSK

TSK · मीखा 2:12

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

बेला मरण पावल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब ह्याने राज्य केले.

त्यादिवशी, असे होईल की प्रभू आपल्या अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व भूसमुद्रातील त्याच्या उर्वरीत लोकांस परत मिळविण्यासाठी आपले हात लांब करील.

परमेश्वराची तलवार आच्छादली असून रक्त गाळीत आहे, ती कोकऱ्यांच्या आणि बोकड्यांच्या रक्ताने माखली असून मेंढ्याच्या गुर्द्यांच्या चरबीने पुष्ट झाली आहे. कारण परमेश्वर बस्रा नगरात यज्ञबली व अदोमाच्या भूमीत मोठा संहार करणार आहे.

“मी स्वत: माझ्या उरलेल्या कळपास ज्या सर्व देशात घालवला होता, त्यास एकत्र करणार, आणि त्यांना त्यांच्या कुरणात परत आणीन. मग ती सफल होऊन बहूतपट होतील.

कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी स्वत:च आपल्या कळपाचा शोध घेईन आणि मी त्यांची काळजी घेईन,

म्हणून, मी माझ्या कळपाला वाचवीन. यापुढे त्यांची लूट होणार नाही. आणि मी मेंढ्या-मेंढ्यात न्यायनिवाडा करीन.

प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी हे त्यांच्यासाठी करावे म्हणून इस्राएलाच्या घराण्याकडून पुन्हा मागणी होईल; कळपाप्रमाणे मी त्यामध्ये लोकांची वाढ करीन.

यहूदाचे लोक व इस्राएलचे लोक एकत्र येऊन आपणावर एक पुढारी नेमतील व त्या देशातून निघून येतील तेव्हा इज्रेलाचा दिवस महान होईल.

परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसात, मी लंगड्यांना एकत्र करीन, आणि जे बहिष्कृत व ज्यांना मी पीडले, त्यांना मी एकवट करीन.

जसे परमेश्वराकडून दहिवर येते, जशा गवतावर सरी येतात आणि त्या मनुष्याची वाट पाहत नाही व मनुष्याच्या मुलाची वाट पाहत नाही, तसे याकोबचे उरलेले लोक पुष्कळ लोकांच्यामध्ये होतील.

तुझ्यासारखा देव कोण आहे? जो तू पापांची क्षमा करतोस आणि आपल्या वतनाच्या उरलेल्यांचा अपराध मागे टाकतो. तो अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणार नाही, कारण त्यास दयाळू व्हायला आवडते.

पुष्कळ लोक आणि बलिष्ठ राष्ट्रे, सेनाधीश परमेश्वराच्या शोधात आणि त्याची कृपा मिळवण्यास यरूशलेमेत येतील.

¶ “मी यहूदाच्या घराण्याला बळकट करीन आणि योसेफाच्या घराचा बचाव करीन; कारण मी त्यांना पुनःस्थापित करीन आणि त्यांच्यावर दया करीन. आणि मी त्यांचा कधीच त्याग केला नव्हता, असेच त्यांच्याशी वागेन. मी परमेश्वर त्यांचा देव आहे व त्यांना प्रतिसाद देईल.