आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमचे कळप, व गुरेढोरे ही तुमच्याबरोबर घेऊन चालते व्हा, आणि जाताना मलाही आशीर्वाद द्या.
TSK
TSK · गण 12:11
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तेव्हा अवघे लोक शमुवेलाला म्हणाले, “आम्ही मरू नये म्हणून, परमेश्वर तुमचा देव याच्याकडे तुम्ही आपल्या सेवकांसाठी प्रार्थना करा. कारण आम्ही राजा मागून आपल्या सर्व पापांत आणखी या दुष्कर्माची भर टाकली आहे.”
तो राजाला म्हणाला, स्वामी, माझ्या हातून घडलेल्या अपराधांचा विचार करू नका. महाराज, तुम्ही यरूशलेम सोडून गेलात तेव्हाची माझी कृत्ये विसरून जा.
तेव्हा राजा यराबाम त्या संदेष्ट्याला म्हणाला, “माझा हात बरा व्हावा म्हणून तू कृपया तुझ्या परमेश्वर देवाची प्रार्थना कर.” तेव्हा त्याने देवाजवळ तशी विनंती केली आणि राजाचा हात बरा झाला. राजाचा हात मग पूर्ववत झाला.
परमेश्वरा, तुझ्या क्रोधात मला ताडना करू नकोस, आणि तुझ्या कोपात मला शिक्षा करू नकोस.
ते त्यास म्हणाले, “आमची विनंती तुझ्यासमोर येवो. जे आम्ही संख्येने थोडे लोक उरले आहोत, ते तू पाहत आहेस, त्या आम्हासाठी तुझा देव परमेश्वराकडे प्रार्थना कर.
‹पाहा, जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वतःला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीती केली आहे.›