TSK

TSK · रोम 9:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द निरर्थक होऊन परत माझ्याकडे येणार नाही, परंतु जे मी इच्छिले ते पूर्ण करील आणि ज्यासाठी पाठवले ते यशस्वी होईल.

नथनेल आपल्याकडे येत आहे हे येशूने बघितले व तो म्हणाला, ‹“पाहा, हा खरा इस्राएली आहे, याच्यात कपट नाही.”›

कारण बाहेरून यहूदी आहे तो यहूदी नाही किंवा बाहेरून देहात सुंता आहे ती खरोखर सुंता नाही.

आणि जे सुंता झालेले आहेत ते केवळ सुंता झालेले आहेत एवढ्यावरून नाही, पण आपला पिता अब्राहाम हा सुंता न झालेला होता तेव्हा त्याच्यात असलेल्या त्याच्या विश्वासास अनुसरुन जे चालतात त्यांचाही त्याने पिता व्हावे.

आणि जे या नियमाने चालतात अशा सर्वांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो.

आपल्या योजनेचे कधीही न बदलणारे स्वरूप वचनाच्या वारसदारांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने वाहिलेल्या शपथेच्या द्वारे याबाबत हमी दिली.