सध्याचा तास
नवव्या प्रहराची प्रार्थना — नोन
आम्ही क्रूसावरील ख्रिस्ताच्या तारक मृत्यूची व त्याच्या राज्यात मला स्मर, अशी विनंती करणाऱ्या दरोडेखोराच्या पश्चात्तापाची आठवण ठेवतो.
प्रत्येक प्रहराची प्रस्तावना
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने
एकमेव देव, आमेन.
प्रभु, दया कर. प्रभु, दया कर. प्रभु, आशीर्वाद दे. आमेन.
पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास गौरव असो, आता आणि सदैव आणि सर्व युगांच्या युगांपर्यंत, आमेन.
आमचा पिता
¶ ‹म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः› ‹हे आमच्या स्वर्गातील पित्या, › ‹तुझे नाव पवित्र मानले जावो.›
‹तुझे राज्य येवो, › ‹जसे स्वर्गात› ‹तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.›
‹आमची रोजची भाकर आज आम्हास दे.›
‹जशी आम्ही आमच्या ऋण्यांस त्यांची ऋणे सोडली आहेत, › ‹तशीच तू आमची ऋणे आम्हांस सोड.›
‹आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस› ‹तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.)›
कृतज्ञतेची प्रार्थना
चांगल्या गोष्टींचा निर्माणकर्ता, दयाळू देव, आमच्या प्रभू व देव व तारणहार येशू ख्रिस्ताचे पिता, याचे आपण आभार मानूया; कारण त्याने आम्हांला आच्छादले, सहाय्य केले, राखले, आम्हांला स्वतःकडे स्वीकृत केले, आमच्यावर दया केली, आधार दिला, आणि आम्हांला या क्षणी आणले. हाच तो आहे; म्हणून आपण त्याच्याकडे विनवूया की, तो आम्हांला हा पवित्र दिवस आणि आमच्या आयुष्याचे सर्व दिवस आपल्या शांततेत राखो. सर्वशक्तिमान प्रभु, आमचा देव.
हे स्वामी देव, सर्वशक्तिमान, आमच्या प्रभू व देव व तारणहार येशू ख्रिस्ताचे पिता, आम्ही तुला सर्वकाळ, सर्व कारणांसाठी आणि सर्व स्थितींमध्ये धन्यवाद देतो; कारण तू आम्हांला आच्छादलेस, सहाय्य केलेस, राखलेस, आम्हांला स्वतःकडे स्वीकृत केलेस, आमच्यावर दया केलीस, आधार दिलास, आणि आम्हांला या क्षणी आणलेस.
याकरिता, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या, तुझ्या कृपाळूपणापासून आम्ही मागतो आणि विनवतो: आम्हांला हा पवित्र दिवस आणि आमच्या आयुष्याचे सर्व दिवस तुझ्या भयासह संपूर्ण शांततेत पूर्ण करता येऊ दे. सर्व मत्सर, सर्व परीक्षा, आणि सैतानाचे सर्व कृत्य, आणि दुष्ट मनुष्यांची कटकारस्थाने, तसेच गुप्त व उघडे शत्रूंची उभारणी — हे सर्व आमच्यापासून, तुझ्या सर्व लोकांपासून, आणि या पवित्र स्थळापासून दूर कर. आणि जे चांगले व उपयुक्त आहे ते आम्हांला प्रदान कर; कारण तूच आम्हांला सर्प व विंचू आणि शत्रूच्या सर्व शक्तीवर तुडविण्याचा अधिकार दिलास. आम्हांला परीक्षेत नेऊ नकोस; पण दुष्टापासून सोडव.
तुझ्या एकुलत्या पुत्रा, आमच्या प्रभू व देव व तारणहार येशू ख्रिस्ताच्या कृपा, दया आणि मानवप्रेमामुळे. ज्याच्याद्वारे तुला, त्याच्याबरोबर आणि जीवनदायी तुझ्या तुल्य असणाऱ्या पवित्र आत्म्यासह, आता आणि सदैव आणि सर्व युगांच्या युगांपर्यंत गौरव, मान, सामर्थ्य आणि वंदना उचित आहे, आमेन.
स्तोत्र 50
थोर परमेश्वर देव, बोलला आहे. आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत हाक मारली.
सौंदर्य परिपूर्णता सियोनेमधून देव प्रकाशला आहे.
आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही, त्याच्यासमोर आग नाश करत चालली आहे, आणि त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.
त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली, म्हणजे तो त्याच्या लोकांचा न्यायनिवाडा करील.
देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा. ज्यांनी यज्ञाच्या व्दारे माझ्याशी करार केला आहे.”
आकाश त्याच्या चांगुलपणाविषयी सांगत असते. कारण देव स्वतः न्यायधीश आहे.
हे माझ्या लोकांनो, ऐका, आणि मी बोलेन, मी देव आहे, तुमचा देव आहे.
मी तुमच्या होमार्पणाबद्दल तक्रार करीत नाही. तुमची होमार्पणे निरंतर माझ्यापुढे आहेत,
मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही. किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही.
कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे, हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.
उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे आणि भूमीवरील वन्य पशू माझे आहेत.
मी भुकेला असलो तरी तुला बोलणार नाही, कारण जग माझेच आहे, आणि त्यातील सर्वकाही माझेच आहे.
मी बैलाचे मांस खाणार का? मी बकऱ्यांचे रक्त पिणार का?
देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर, आणि परत्पराकडे आपले नवस फेड.
तू संकटात असता मला हाक मार, आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील.
देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे? आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस?
कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस, आणि माझी वचने झुगारून देतोस?
तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता.
तू वाईटाला आपले मुख देतोस, आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते.
तुम्ही बसता आणि आपल्या भावाविरूद्ध बोलता. तू आपल्या सख्या भावाची निंदा करतोस.
तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प राहिलो. मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले, परंतू मी तुझा निषेध करणार आणि तुझ्या डोळ्यापुढे ओळीने सर्वकाही मांडणार.
तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हास फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हास कोणीही वाचवू शकणार नाही.
जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो, आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो, त्यास मी देवाचे तारण दाखवेन.
प्रार्थनेची सुरुवात
धन्य दिवसाच्या नवव्या प्रहराची स्तुति, मी ती माझ्या राजा व देव ख्रिस्ताला अर्पितो, आणि तो माझी पापे क्षमा करो अशी विनंति करतो.
स्तोत्र 95
याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणाचा खडक त्याचा हर्षाने जयजयकार करू.
उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू; स्तुतीचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
कराण परमेश्वर महान देव आहे आणि सर्व देवांहून तो श्रेष्ठ महान राजा आहे.
त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थाने आहेत; पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत.
समुद्र त्याचाच आहे, कारण त्यानेच तो निर्माण केला, आणि त्याच्या हाताने कोरडी भूमी घडवली गेली.
याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्यास नमन करू;
कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील लोक आणि त्याच्या हातातील मेंढरे आहोत. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल.
मरीबा येथल्याप्रमाणे किंवा मस्साच्या दिवशी रानात केले तसे आपली मने कठीण करू नका,
तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या अधिकाराला आव्हान दिले, आणि जरी त्यांनी माझी कृती पाहिली होती, तरी माझ्या सहनशीलतेची परीक्षा केली.
चाळीस वर्षे त्या पिढीवर मी रागावलो, आणि म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे आहेत; त्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत.
म्हणून मी आपल्या रागात शपथ वाहिली की, हे माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.
स्तोत्र 96
अहो, परमेश्वरास नवीन गीत गा; हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर.
परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या; दिवसेंदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा.
राष्ट्रात त्याचे गौरव, त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा.
कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे. सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे.
कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, पण परमेश्वराने तर स्वर्ग निर्माण केला.
वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत. सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत.
अहो तुम्ही लोकांच्या कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य सांगा.
परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा. अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या.
पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा. हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो.
राष्ट्रांमधील लोकांस सांगा की, परमेश्वर राज्य करतो. जगसुद्धा स्थिर स्थापिलेले आहे; ते हलविता येणे अशक्य आहे. तो सरळपणे लोकांचा न्याय करील.
आकाश आनंदित होवो, आणि पृथ्वी आनंदोत्सव करो; समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत.
शेत आणि त्यातील सर्वकाही आनंदोत्सव करोत. मग जंगलातील सर्व वृक्ष आनंदाने गजर करतील.
सगळी निर्मिती परमेश्वरापुढे आनंद करो, कारण तो येत आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा व त्याच्या सत्यतेने लोकांचा न्याय करील.
स्तोत्र 97
परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो. अनेक द्वीपसमूह आनंदित होवो.
ढग आणि काळोख त्याच्याभोवती आहेत. निती व न्याय त्याच्या सिंहासनाचा पाया आहेत.
अग्नी त्याच्यापुढे चालतो, आणि प्रत्येक बाजूने त्याच्या शत्रूंना नष्ट करून टाकतो.
त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले; पृथ्वी हे पाहून थरथर कापली.
परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर पर्वत मेणासारखे वितळले.
आकाशाने, त्याचा न्याय जाहीर केला, आणि सर्व राष्ट्रांनी त्याचे वैभव पाहिले.
जे कोरीव मूर्तीची पूजा करतात, जे मूर्तीचा अभिमान बाळगतात ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देवहो! त्याच्यासमोर नमन करा.
सियोनेने हे ऐकले आणि आनंदित झाली, कारण हे परमेश्वरा, तुझ्या न्यायामुळे यहूदाच्या नगरांनी आनंद केला.
कारण हे परमेश्वरा, सर्व पृथ्वीवर तू परात्पर आहेस. तू सर्व देवापेक्षा खूपच उंचावलेला आहेस.
जे तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता, ते तुम्ही वाईटाचा द्वेष करा, तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो, आणि तो त्यास दुष्टांच्या हातातून सोडवतो.
नितीमानासाठी प्रकाश आणि जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.
अहो नितीमानांनो, परमेश्वराठायी आनंदी व्हा. त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.
स्तोत्र 98
परमेश्वरास नवीन गीत गा, कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे.
परमेश्वराने आपले तारण कळवले आहे; त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे.
त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा.
परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा, वीणेवर मधुर स्वराने गायन करा.
कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने, परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा.
समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत.
नद्या टाळ्या वाजवोत, आणि पर्वत हर्षनाद करोत.
परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील.
स्तोत्र 99
परमेश्वर राज्य करतो; राष्ट्रे कंपित होवोत. तो करुबांच्यावर विराजमान आहे; पृथ्वी थरथर कापो.
सियोनात परमेश्वर महान आहे; तो सर्व राष्ट्रांच्यावर उंच आहे.
ते तुझे महान आणि भयचकीत करणाऱ्या नावाची स्तुती करोत. तो पवित्र आहे.
राजा बलवान आहे आणि तो न्यायप्रिय आहे. तू सरळपणा स्थापिला आहे; तू याकोबात न्याय व निती अस्तित्वात आणली आहेस.
परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पदासनाजवळ त्याची उपासना करा. तो पवित्र आहे.
त्याच्या याजकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते, आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुवेल हा होता. त्यांने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
तो त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा आणि त्याचे नियम पाळले.
हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस. तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास.
परमेश्वर, आपला देव ह्याची स्तुती करा, आणि त्याच्या पवित्र डोंगरावर उपासना करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.
स्तोत्र 100
हे सर्व पृथ्वी, परमेश्वरासाठी हर्षनाद करा.
परमेश्वराची सेवा आनंदाने करा. त्याच्या सान्निध्यात आनंदाने गाणी गात या.
परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या. त्यानेच आम्हास निर्माण केले, आणि आम्ही त्याचे आहोत. आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील त्याचे मेंढरे आहोत.
त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात, आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सर्वकाळ आहे, आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे.
स्तोत्र 109
हे माझ्या स्तवनाच्या देवा, शांत राहू नको.
कारण दुष्ट आणि कपटी माझ्यावर हल्ला करतात; ते माझ्याविरूद्ध खोटे बोलतात.
त्यांनी मला वेढले आहे आणि माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगतात. आणि ते विनाकारण माझ्यावर हल्ला करतात.
माझ्या प्रेमाच्या बदल्यात ते माझी निंदानालस्ती करतात. पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो.
मी केलेल्या चांगल्यासाठी वाईट, आणि त्यांनी माझ्या प्रीतीची फेड द्वेषाने केली.
या लोकांवर तू दुर्जन मनुष्यास शत्रूसारखा नेम; त्यांच्या उजव्या हाताकडे आरोप करणाऱ्याला उभा ठेव.
जेव्हा त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी म्हणून सापडो; त्याची प्रार्थना पापच मानली जावो.
त्याचे दिवस थोडे होवोत; दुसरा त्याचा अधिकार घेवो;
त्याची मुले पितृहीन आणि त्याची पत्नी विधवा होवो.
त्याची मुले इकडे तिकडे भटकत आणि भीक मागत फिरोत, ती आपल्या ओसाड ठिकाणाहून दूर जाऊन निवेदन करोत.
सावकार त्यांचे सर्वस्व हिरावून घेवो; त्याची कमाई परके लुटून घेवोत;
त्यांना कोणीही दया देऊ नये; त्याच्या पितृहीन मुलांची कोणीही कीव करू नये.
त्याचे वंशज कापून टाकली जावोत; पुढच्या पिढीत त्याचे नाव खोडले जावो.
परमेश्वरास त्याच्या पूर्वजांच्या पापांची आठवण राहो. त्याच्या आईची पापे कधीही विसरली न जावोत.
परमेश्वरापुढे त्यांचे पातक सदैव असोत; परमेश्वर त्यांचे स्मरण पृथ्वीवरून काढून टाको.
कारण या मनुष्याने कधीही दया दाखविण्याची पर्वा केली नाही, परंतु त्याऐवजी पीडलेल्यांचा छळ आणि गरजवंत व धैर्य खचलेल्यांचा वध केला.
त्यास शाप देणे आवडते, म्हणून तो परत त्याच्यावर आला. त्याने आशीर्वादाचा द्वेष केला; म्हणून त्याच्यावर आशीर्वाद आले नाहीत.
त्याने त्याच्या वस्राप्रमाणे आपल्याला शापाचे वस्र पांघरले, आणि त्याचे शाप हे पाण्याप्रमाणे त्याच्या अंतर्यामात, तेलासारखे त्याच्या हाडात आले.
त्याचे शाप त्यास पांघरावयाच्या वस्राप्रमाणे होवो, ते नेहमी वापरावयाच्या कंबरपट्ट्याप्रमाणे तो त्यास वेढून राहो.
माझ्या आरोप्यास, माझ्याविरूद्ध वाईट बोलणाऱ्यास परमेश्वराकडून हेच प्रतिफळ आहे
हे परमेश्वरा, माझा प्रभू, कृपा करून तुझ्या नावाकरता मला वागवून घे. कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे म्हणून मला वाचव.
कारण मी पीडित आणि गरजवंत आहे, आणि माझे हृदय माझ्यामध्ये घायाळ झाले आहे.
मी संध्याकाळच्या सावल्यांप्रमाणे दिसेनासा झालो आहे; मी टोळाप्रमाणे हुसकावला जात आहे.
उपासाने माझे गुडघे अशक्त झाले आहेत; मी त्वचा आणि हाडे असा होत आहे.
माझा विरोध्यास मी निंदेचा विषय झालो आहे, ते जेव्हा माझ्याकडे बघतात, तेव्हा आपले डोके हालवतात.
हे माझ्या परमेश्वरा, माझ्या देवा, मला मदत कर; तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझा उध्दार कर.
हे परमेश्वरा, त्यांनी हे जाणावे की, ही तुझी करणी आहे, तूच हे केले आहेस.
जरी त्यांनी मला शाप दिला, पण कृपा करून मला आशीर्वाद दे; जेव्हा ते हल्ला करतील, तेव्हा ते लज्जित होतील, परंतु तुझा सेवक आनंदी होईल.
माझे विरोधी वस्राप्रमाणे लाज पांघरतील, आणि ते त्यांची लाज झग्याप्रमाणे पांघरतील.
मी आनंदाने आपल्या मुखाने मनापासून परमेश्वरास धन्यवाद देईन; लोकसमुदायासमोर मी त्याची स्तुती करीन.
कारण तो पीडितांना धमकी देणाऱ्यांपासून, त्यांचे तारण करायला तो त्यांच्या उजव्या हाताला उभा राहतो.
स्तोत्र 110
माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.”
परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील; तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील.
तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात, पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत.
परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही, “तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे तू सर्वकाळ याजक आहेस.”
प्रभू तुझ्या उजव्या हाताला आहे. तो आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा वध करील.
तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील; तो प्रेतांनी दऱ्या भरील; तो अनेक राष्ट्रात नेत्यांना मारील.
तो मार्गाने चालत असता झऱ्यातले पाणी पिईल, आणि मग तो विजयानंतर आपले डोके वर उचलेल.
स्तोत्र 111
परमेश्वराची स्तुती करा. सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वरास अगदी मनापासून धन्यवाद देईल.
परमेश्वराचे कार्य महान आहेत, जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात.
त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे, आणि त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते.
त्याच्या आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे त्याने केले; परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे.
तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो. तो आपला करार नेहमी आठवतो.
त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन, आपली सामर्थ्याची कार्ये दाखवली आहेत.
त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे; त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत.
ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत, ते सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.
त्याने आपल्या लोकांस विजय दिला आहे; त्याने आपला करार सर्वकाळासाठी ठरवला आहे, देवाचे नाव पवित्र व भितीदायक आहे.
परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे; जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते. त्याची स्तुती सर्वकाळ टिकून राहील.
स्तोत्र 112
परमेश्वराची स्तुती करा. जो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे.
त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तीमान होतील; धार्मिक आशीर्वादित होतील.
धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत; त्यांचे नितीमत्व सर्वकाळ टिकते.
धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो; तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे.
जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो, जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते.
कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही; नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील.
तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे.
त्याचे हृदय निश्चल आहे, आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही.
तो गरीबांना उदारपणे देतो; त्याचे नितीमत्व सर्वकाळ राहील; तो सन्मानाने उंचविला जाईल.
दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील; तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल; दुष्टाची इच्छा नाश होईल.
स्तोत्र 114
जेव्हा इस्राएल मिसरातून, याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले,
तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाले.
समुद्राने पाहिले आणि पळाला; यार्देन मागे हटली.
पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या.
हे समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देने तू का मागे हटलीस?
पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता? लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता?
हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, याकोबाच्या देवासमोर थरथर काप.
तो खडक पाण्याच्या तळ्यात, कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो.
स्तोत्र 115
हे परमेश्वरा, आमचे नको. आमचे नको, तर आपल्या नावाचा सन्मान कर, कारण तू दयाळू आणि सत्य आहेस.
ह्यांचा देव कोठे आहे, असे राष्ट्रांनी का म्हणावे?
आमचा देव स्वर्गात आहे; त्यास जे आवडते ते तो करतो.
राष्ट्रांच्या मूर्ती सोन्याच्या व रुप्याच्या आहेत. त्या मनुष्यांच्या हातचे काम आहेत.
त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत, पण त्यांना बघता येत नाही.
त्यांना कान आहेत, पण त्यांना ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे, पण त्यांना वास घेता येत नाही.
त्यांना हात आहेत, पण त्यांना स्पर्श करता येत नाही. त्यांना पाय आहेत पण त्या चालू शकत नाही; किंवा त्यांच्या मुखाने त्यांना बोलता येत नाही.
जे त्यांना बनवितात त्यांच्याप्रमाणेच, त्यांच्यावर भरवसा ठेवणारा प्रत्येकजन आहे.
हे इस्राएला, परमेश्वरावर विश्वास ठेव. तो त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे.
हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर विश्वास ठेव; तोच त्याचे सहाय्य आणि ढाल आहे.
अहो परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा; तोच त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे.
परमेश्वराने आमची दखल घेतली आहे आणि आम्हास आशीर्वाद देईल. तो इस्राएलाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. तो अहरोनाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
जे परमेश्वराचा आदर करतात, त्या तरुण आणि वृद्ध या दोघांना तो आशीर्वाद देईल.
परमेश्वर तुम्हास अधिकाधिक वाढवो, तो तुमची आणि तुमच्या वंशजांची वाढ करो.
आकाश व पृथ्वी ही निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा तुम्हास आशीर्वाद असो.
स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण त्यांने मानवजातीला पृथ्वी दिली आहे.
मरण पावलेले म्हणजे निवांतस्थानी उतरलेले कोणीहि परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
पण आम्ही आता आणि सदासर्वकाळ परमेश्वरास धन्यवाद देत राहू. परमेश्वराची स्तुती करा.
संत लूकानुसार पवित्र सुवार्ता (9:10-17)
¶ मग प्रेषितांनी परत येऊन आपण जे काही केले होते ते त्यास सविस्तर सांगितले. मग तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगराकडे एकीकडे गेला.
परंतु याविषयी लोकांनी ऐकल्यावर ते त्याच्यामागे गेले. तेव्हा तो त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी देवाच्या राज्याविषयी बोलू लागला आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना त्याने बरे केले.
दिवस संपत आला, तेव्हा बारा जण जवळ येऊन त्यास म्हणाले, “समुदायाला निरोप दे, म्हणजे ते आसपासच्या गावांत व खेड्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो.”
पण तो त्यांना म्हणाला, ‹“तुम्हीच त्यांना खायला द्या.”› ते म्हणाले, “आम्ही जाऊन या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही.”
कारण ते सुमारे पाच हजार पुरूष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, ‹“पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा,”›
मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून सर्वांस बसवले.
त्याने त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले.
तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि त्यांनी मोडलेल्या तुकड्यांतले उरले ते बारा टोपल्या भरून त्यांनी उचलून घेतले.
Tenoo oasht emmok o piekhristos nem pekyot en aghathos nem pi epnevma ethowab je akee ak soati emmon nai nan
हे ख्रिस्ता, तुझ्या हितकर पित्याबरोबर व पवित्र आत्म्यासोबत आम्ही तुझी उपासना करतो; कारण तू आला आहेस व आम्हाला तारले आहेस.
1. तू, ज्याने आमच्यासाठी, पापींसाठी, नवव्या प्रहराला शरीराने मृत्यूची चव घेतलीस, आमच्या देहाच्या वासनांना मार, हे ख्रिस्ता, आमच्या देव, आणि आम्हांला सोडव. “माझी विनवणी तुझ्यापुढे जवळ येऊ दे, हे प्रभो; तुझ्या वचनाप्रमाणे मला समज दे. माझी याचना तुझ्या सान्निध्यात येऊ दे; तुझ्या वचनाप्रमाणे मला पुनर्जीवित कर.”
पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास महिमा असो.
पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास महिमा असो.
2. तू, ज्याने नवव्या प्रहराला क्रूसावर लटकत असताना आत्मा पित्याच्या हातात सोपविला, आणि तुझ्याबरोबर क्रूसावर खिळलेल्या चोराला परदिसात प्रवेश करण्यास नेले, मला सोडून देऊ नकोस, हे कल्याणकर्ता, न मला नाकारणोकोस, मला जो हरवलेला आहे; परंतु माझ्या आत्म्यास पवित्र कर आणि माझी समज प्रबुद्ध कर, आणि तुझ्या जीवनदायी रहस्यांच्या कृपेत मला सहभागी होऊ दे; ज्यायोगे मी तुझ्या कृपांचे आस्वाद घेताना, कोमटपणाशिवाय तुझे स्तुतीवचन अर्पण करीन, सर्व गोष्टींपेक्षा तुझ्या तेजाची आस धरत, हे ख्रिस्ता, आमच्या प्रभू, आणि आम्हांला सोडव.
आता आणि सदैव व युगानुयुगे, आमेन.
आता आणि सदैव व युगानुयुगे, आमेन.
3. तू, जो कुमारीपासून आमच्यासाठी जन्मावलास, आणि क्रूसवध सहन केलास, हे कल्याणकर्ता, आणि तुझ्या मृत्यूने मृत्यूचा नाश केलास, व तुझ्या पुनरुत्थानाने पुनरुत्थान प्रकट केलेस, हे देवा, तुझ्या स्वतःच्या हस्तांनी ज्यांना निर्माण केलेस त्यांच्याकडून तुझा चेहरा फिरवू नकोस; परंतु, हे कल्याणकर्ता, तुझे मानवावरचे प्रेम प्रकट कर. तुझ्या मातेकडील आमच्यासाठीची मध्यस्थी स्वीकार. हे तारणारा, नम्र लोकांना सोडव. आम्हांला अखेरपर्यंत सोडू नकोस, आणि कायमचा त्यागू नकोस. तुझा करार मोडू नकोस, आणि तुझी दया आमच्यापासून काढू नकोस; तुझ्या प्रिय अब्राहामाकरिता, तुझ्या सेवक इसहाकाकरिता, आणि तुझ्या संत इस्राएलकरिता.
आता आणि सदैव व युगानुयुगे, आमेन.
आता आणि सदैव व युगानुयुगे, आमेन.
4. जेव्हा दरोडेखोराने क्रूसावर जीवनाच्या राजाला लटकलेला पाहिला, तेव्हा तो म्हणाला: “जर आमच्याबरोबर खिळला गेलेला हा देहधारी देव नसता, तर सूर्य आपले किरण लपवला नसता, आणि पृथ्वी थरथर कापली नसती. पण हे सर्वशक्तिमान, जो सर्व काही सहन करतोस, हे प्रभो, जेव्हा तू तुझ्या राज्यात येशील तेव्हा मला स्मर.”
पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास महिमा असो.
पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास महिमा असो.
5. तू, ज्याने क्रूसावरील दरोडेखोराची कबुली स्वीकारलीस, आम्हांलाही तुझ्याकडे स्वीकार, हे कल्याणकर्ता; कारण आमच्या पापांमुळे आम्ही मृत्यूच्या शिक्षेस पात्र आहोत. आम्ही सर्व त्याच्यासारखेच आमची पापे कबूल करतो, आणि तुझे देवत्व मान्य करतो, आणि त्याच्याबरोबर म्हणत ओरडतो, “हे प्रभो, जेव्हा तू तुझ्या राज्यात येशील तेव्हा आम्हांला स्मर.”
आता आणि सदैव व युगानुयुगे, आमेन.
आता आणि सदैव व युगानुयुगे, आमेन.
6. जेव्हा मातेनें कोकरू व मेंढपाळ, जगाचा तारणारा, क्रूसावर लटकलेला पाहिला, तेव्हा ती रडत म्हणाली, “जग तारण प्राप्त करून आनंदित होते, पण तुझ्याकडे पाहून व तू सर्वांच्या खातिर जो क्रूसवध सोसतोस, त्याची आठवण काढत माझे हृदय जळत आहे, हे माझ्या पुत्रा व माझ्या देवा.”
तेव्हा उपासक प्रार्थना करतो:
प्रभो, आम्हाला ऐक आणि आमच्यावर दया कर, आणि आमची पापे क्षमा कर. आमेन.
(प्रभो, दया कर) 41 वेळा
क्षमा
हे देव पिता, आमच्या प्रभू व देव व तारणहार येशू ख्रिस्ताचे पिता, ज्याने आपल्या प्रगटीकरणाने आम्हांला उध्दारले आणि शत्रूच्या गुलामीतून सोडविले; आम्ही तुझ्या पवित्र व महान नावाने विनवितो: आमचे विचार सांसारिक काळजी आणि देहाच्या वासनांपासून स्वर्गीय नियमांच्या स्मरणाकडे वळव; हे चांगल्या, मानवप्रेमी, आमच्यात तुझ्या प्रीतीची सिद्धता पूर्ण कर. आमच्या प्रार्थना सदैव, आणि विशेषकरून या नवव्या प्रहराची प्रार्थना, तुझ्या समोर ग्राह्य ठरो. आणि आम्हांला तशाप्रकारे वागण्याची कृपा दे, जशी बोलावणीस शोभते. जेणेकरून जेव्हा आम्ही या देहातून निघू, तेव्हा आम्ही तुझ्या एकुलत्या पुत्राच्या दुःखांना योग्य असे वंदन करणाऱ्यांत मोजले जाऊ, आणि दया, आमच्या पापांची क्षमा, आणि संतांच्या समुदायासोबत उध्दार प्राप्त करू — ज्यांनी तुला खरोखर आदिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत संतुष्ट केले.
हे देवा, आमच्यावरील प्रतिकूलतेची सर्व शक्ती आणि तिची सर्व दुष्ट सैन्ये नष्ट कर; जसे तुझ्या एकुलत्या पुत्राने जीवनदायी क्रूसाच्या शक्तीने त्यांना चिरडले. आणि आम्हांला तुझ्याकडे स्वीकार, हे स्वामी येशू ख्रिस्त, जसा तू बाजूच्या चोराला स्वीकारलेस जेव्हा तू क्रूसावर लटकला होतास. आणि जसा तू नरकाच्या अंध:कारात बसलेल्यांवर प्रकाश टाकलास तसे आमच्यावरही प्रकाश टाक. आणि आम्हा सर्वांना परत आनंदवनात ने; कारण, हे स्वामी, तू धन्य देव आहेस; आणि तुझ्या चांगल्या पित्याबरोबर व जीवनदायी व तुझ्याशी समसमान पवित्र आत्म्यासह तुला गौरव, मान, सामर्थ्य, अधिकार आणि वंदना असो, अनंतकाळपर्यंत, आमेन.
प्रत्येक प्रहराच्या शेवटी केली जाणारी विनवणी
हे देवा, आमच्यावर दया कर; मग पुन्हा दया कर. जो सर्वकाळ आणि प्रत्येक क्षणी, स्वर्गात आणि पृथ्वीवर, वंदनीय आणि गौरवित — आमचा चांगला ख्रिस्त देव — दीर्घशांतीचा, विपुल दयेचा, व अतिशय करुणामय; जो धर्मीजनांवर प्रेम करतो आणि पाप्यांवर दया करतो, ज्याचा मी पहिला आहे; जो पाप्याचा मृत्यू इच्छित नाही, तर त्याची परतफेड व जीवन इच्छितो; जो सर्वांना उध्दाराकडे बोलावतो, येणाऱ्या चांगल्या वस्तूंच्या वचनासाठी.
हे प्रभु, या क्षणी व प्रत्येक क्षणी आमच्या विनंत्या स्वीकार. आमचे जीवन सुलभ कर; आम्हांला तुझ्या आज्ञांचे पालन करण्यास मार्गदर्शित कर. आमच्या आत्म्यांना पवित्र कर. आमच्या देहांना शुद्ध कर. आमचे विचार उभे कर. आमच्या इच्छांना शुद्ध कर. आमच्या आजारांना आरोग्य दे आणि आमची पापे क्षमा कर. सर्व वाईट दु:ख व हृदयदुखण्यापासून आम्हांला सोडव. तुझ्या पवित्र दूतांनी आम्हांला वेढून ठेव, की त्यांच्या छावणीत आम्ही राखलेले व मार्गदर्शित होऊ; आणि आम्ही विश्वासाच्या ऐक्याला आणि तुझ्या अगम्य व अमर्याद गौरवाच्या ज्ञानाला पोहोचू — कारण तू अनंतकाळपर्यंत धन्य आहेस. आमेन.
हे देवा, आम्हांला पात्र कर की आम्ही कृतज्ञतापूर्वक म्हणू: आमच्या स्वर्गस्थ पित्या