सध्याचा तास
मध्यरात्रीची प्रार्थना
मध्यरात्री आम्ही प्रभूच्या येण्याची वाट पाहत जागरण करतो व गेथसेमनीतील त्याची प्रार्थना स्मरतो.
आमचा पिता
¶ ‹म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः› ‹हे आमच्या स्वर्गातील पित्या, › ‹तुझे नाव पवित्र मानले जावो.›
‹तुझे राज्य येवो, › ‹जसे स्वर्गात› ‹तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.›
‹आमची रोजची भाकर आज आम्हास दे.›
‹जशी आम्ही आमच्या ऋण्यांस त्यांची ऋणे सोडली आहेत, › ‹तशीच तू आमची ऋणे आम्हांस सोड.›
‹आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस› ‹तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.)›
कृतज्ञतेची प्रार्थना

स्तोत्र 50
थोर परमेश्वर देव, बोलला आहे. आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत हाक मारली.
सौंदर्य परिपूर्णता सियोनेमधून देव प्रकाशला आहे.
आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही, त्याच्यासमोर आग नाश करत चालली आहे, आणि त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.
त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली, म्हणजे तो त्याच्या लोकांचा न्यायनिवाडा करील.
देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा. ज्यांनी यज्ञाच्या व्दारे माझ्याशी करार केला आहे.”
आकाश त्याच्या चांगुलपणाविषयी सांगत असते. कारण देव स्वतः न्यायधीश आहे.
हे माझ्या लोकांनो, ऐका, आणि मी बोलेन, मी देव आहे, तुमचा देव आहे.
मी तुमच्या होमार्पणाबद्दल तक्रार करीत नाही. तुमची होमार्पणे निरंतर माझ्यापुढे आहेत,
मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही. किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही.
कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे, हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.
उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे आणि भूमीवरील वन्य पशू माझे आहेत.
मी भुकेला असलो तरी तुला बोलणार नाही, कारण जग माझेच आहे, आणि त्यातील सर्वकाही माझेच आहे.
मी बैलाचे मांस खाणार का? मी बकऱ्यांचे रक्त पिणार का?
देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर, आणि परत्पराकडे आपले नवस फेड.
तू संकटात असता मला हाक मार, आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील.
देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे? आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस?
कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस, आणि माझी वचने झुगारून देतोस?
तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता.
तू वाईटाला आपले मुख देतोस, आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते.
तुम्ही बसता आणि आपल्या भावाविरूद्ध बोलता. तू आपल्या सख्या भावाची निंदा करतोस.
तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प राहिलो. मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले, परंतू मी तुझा निषेध करणार आणि तुझ्या डोळ्यापुढे ओळीने सर्वकाही मांडणार.
तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हास फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हास कोणीही वाचवू शकणार नाही.
जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो, आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो, त्यास मी देवाचे तारण दाखवेन.
तेव्हा उपासक म्हणतो:

स्तोत्र 133
पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे.
ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे, त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमूल्य तेलासारखे आहे.
सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.
उठा, प्रकाशाची लेकरांनो
उठा, प्रकाशाची लेकरांनो 1
उठा, प्रकाशाची लेकरांनो, आपण सेनाधीश प्रभुची स्तुति करूया; जेणेकरून तो आमच्या आत्म्यांच्या तारणाची कृपा आम्हांवर करो. जेव्हा आम्ही तुझ्यासमोर शारीरिकरीत्या उभे राहतो, तेव्हा आमच्या मनातील झोपेचा गुंगी दूर कर. हे प्रभु, आम्हांला जागरूकता दे, की आम्ही समजू कसे प्रार्थनेच्या वेळेला तुझ्यासमोर उभे राहावे; आणि तुला वर योग्य गौरव अर्पण करावे; आणि आमच्या विपुल पापांची क्षमा आम्हांस लाभो. (गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
उठा, प्रकाशाची लेकरांनो 2
हे प्रभुचे सेवकांनो, प्रभुचे गुणगान करा; जे प्रभुच्या घरात, आमच्या देवाच्या अंगणात उभे आहात. रात्री तुम्ही तुमचे हात पवित्रस्थानाकडे उंच करा, आणि प्रभुचे स्तवन करा. सियोनहून प्रभु तुम्हांला आशीर्वाद देवो, ज्याने स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली. (गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
उठा, प्रकाशाची लेकरांनो 3
माझी विनवणी तुझ्या समोर येऊ दे, हे प्रभु, तुझ्या वचनाप्रमाणे मला समज दे. माझी प्रार्थना तुझ्या सान्निध्यात येऊ दे, हे प्रभु, तुझ्या वचनाप्रमाणे मला जिवंत कर. माझे ओठ स्तुतीने ओतप्रोत होतील, जेव्हा तू मला तुझे नियम शिकवशील. माझी जीभ तुझ्या वचनांची घोषणा करील, कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत. तुझे हात मला तारण्यासाठी असू देत, कारण मी तुझ्या आज्ञा इच्छिल्या आहेत. हे प्रभु, तुझे तारण मी आतुरतेने वाट पाहिली, आणि तुझा नियम हा माझा ध्यान आहे. माझा जीव जगो आणि तुला स्तुति करो; आणि तुझे नियम मला सहाय्य करोत. मी हरवलेल्या मेंढराप्रमाणे भटकलो; तुझ्या दासाचा शोध घे; कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.
पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास गौरव असो, आता आणि सदैव आणि सर्व युगांच्या युगांपर्यंत, आमेन. पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास गौरव असो, आत्तापासून सर्व युगांच्या युगांपर्यंत, सर्वकाळ, आमेन. हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या चांगल्या, तुला गौरव असो. तुझ्या आई कुमारीला आणि सर्व संतांना शांती असो. हे पवित्र त्रित्व, तुला गौरव असो; आमच्यावर दया कर.
देव उभा राहो; त्याचे सर्व शत्रू तुटक होवोत; आणि त्याच्या पवित्र नावाचे वैरी त्याच्या मुखकमलापासून पळून जातील. पण तुझी प्रजा आशीर्वाद घेऊन — हजारो हजारो व दहा हजारो दहापट — तुझी इच्छा करीत राहो. हे प्रभु, माझे ओठ उघड, आणि माझे तोंड तुझ्या स्तुतीची घोषणा करो. आमेन. अल्लेलूया.
प्रार्थनेची सुरुवात
स्तोत्र 3
परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत! पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे.
“परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,” असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. सेला
परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस, तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे.
मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन, आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. सेला
मी अंग टाकून झोपी गेलो; मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो.
जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही.
हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार! कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस, तू दुष्टांचे दात पाडले आहेत.
तारण परमेश्वरापासूनच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. सेला.
स्तोत्र 6
हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस, किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस.
हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत.
माझा जीव फार घाबरला आहे. परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे?
हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव! तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार.
कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही. मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार?
मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो.
शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत.
अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे.
माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील. ते माघारे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील.
स्तोत्र 12
हे परमेश्वरा, साहाय्य कर! कारण भक्तिमान नाहीसा झाला आहे. विश्वासू गायब झाला आहे.
प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो, प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो.
परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको.
हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ, जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?”
परंतु परमेश्वर म्हणतो, “गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो; ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन.”
परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत, पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत.
हे परमेश्वरा, तुच त्यांना सांभाळशील, या पिढीपासून तू त्यांना सर्वकाळ राखशील.
मनुष्यांच्या संतानांमध्ये निचपणाला थोरवी मिळते तेव्हा दुष्ट चोहोंकडे हिंडत राहतात.
स्तोत्र 69
हे देवा, मला तार; कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन पोहचले आहे.
मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, तेथे पुराचे पाणी माझ्यावरून वाहत आहे.
माझ्या रडण्याने मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; माझ्या देवाची वाट पाहता माझे डोळे शिणले आहेत.
विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही अधिक आहेत; जे अन्यायाने माझे वैरी असून मला कापून काढायला पाहतात ते बलवान आहेत; जे मी चोरले नव्हते, ते मला परत करावे लागले.
हे देवा, तू माझा मूर्खापणा जाणतो, आणि माझी पापे तुझ्यापासून लपली नाहीत.
हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतिक्षा करतात, त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये. हे इस्राएलाच्या देवा, जे तुला शोधतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये.
कारण तुझ्याकरता मी निंदा सहन केली आहे; लाजेने माझे तोंड झाकले आहे.
मी आपल्या बंधूला परका झालो आहे, आपल्या आईच्या मुलांस विदेशी झालो आहे.
कारण तुझ्या मंदीराविषयीच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे, आणि तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेल्या निंदा माझ्यावर पडल्या आहेत.
जेव्हा मी रडलो आणि उपवास करून माझ्या जिवाला शिक्षा केली, तेव्हा ते जसे माझ्या स्वतःची निंदा होती.
जेव्हा मी गोणपाट आपले वस्र केले, तेव्हा मी त्यांना उपहास असा झालो.
जे नगराच्या वेशीत बसतात; ते माझी निंदा करतात; मी मद्यप्यांचा गीत झालो.
पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपल्या तारणाच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.
मला चिखलातून बाहेर काढ, आणि त्यामध्ये मला बुडू देऊ नकोस; माझा तिरस्कार करणाऱ्यापासून मला वाचव. खोल पाण्यापासून मला काढ.
पुराच्या पाण्याने मला पूर्ण झाकून टाकू नकोस, खोल डोह मला न गिळो. खाच आपले तोंड माझ्यावर बंद न करो.
हे परमेश्वरा, मला उत्तर दे, कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे.
आपल्या सेवकापासून आपले तोंड लपवू नकोस, कारण मी क्लेशात आहे; मला त्वरीत उत्तर दे.
माझ्या जिवाजवळ ये आणि त्यास खंडून घे; माझ्या शत्रूंमुळे खंडणी भरून मला सोडव.
तुला माझी निंदा, माझी लाज आणि माझी अप्रतिष्ठा माहित आहे; माझे विरोधक माझ्यापुढे आहेत;
निंदेने माझे हृदय तुटले आहे; मी उदासपणाने भरलो आहे; माझी कीव करणारा कोणीतरी आहे का हे मी पाहिले, पण तेथे कोणीच नव्हता; मी सांत्वनासाठी पाहिले, पण मला कोणी सापडला नाही.
त्यांनी मला खाण्यासाठी विष दिले; मला तहान लागली असता आंब दिली
त्यांचे मेज त्यांच्यापुढे पाश होवोत; जेव्हा ते सुरक्षित आहेत असा विचार करतील, तो त्यांना सापळा होवो.
त्यांचे डोळे आंधळे होवोत यासाठी की, त्यांना काही दिसू नये; आणि त्यांची कंबर नेहमी थरथर कापावी असे कर.
तू त्यांच्यावर आपला संताप ओत, आणि तुझ्या संतापाची तीव्रता त्यांना गाठो.
त्यांची ठिकाणे ओसाड पडो; त्यांच्या तंबूत कोणीही न राहो.
कारण ज्याला तू दणका दिला त्याचा ते छळ करतात; तू ज्यांस जखमी केलेस त्यांच्या वेदनेविषयी ते दुसऱ्याला सांगतात.
ते अन्यायानंतर अन्याय करतात त्यांना दोष लाव; तुझ्या न्यायाच्या विजयात त्यांना येऊ देऊ नको.
जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत, आणि नितिमानांबरोबर त्यांची नावे लिहिली न जावोत.
पण मी गरीब आणि दु:खी आहे; हे देवा, तुझे तारण मला उंचावर नेवो.
मी देवाच्या नावाची स्तुती गाणे गाऊन करीन, आणि धन्यवाद देऊन त्यास उंचाविन.
ते बैलापेक्षा, शिंगे असलेल्या, किंवा दुभागलेल्या खुराच्या गोऱ्ह्यांपेक्षा परमेश्वरास आवडेल.
लीनांनी हे पाहिले आहे आणि हर्षित झाले; जे देवाचा शोध घेतात त्या तुमचे हृदय जिवंत होवो.
कारण परमेश्वर गरजवंताचे ऐकतो आणि आपल्या बंदिवानांचा तिरस्कार करत नाही.
आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यामध्ये संचार करणारे प्रत्येकगोष्ट त्याची स्तुती करा.
कारण देव सियोनेला तारील आणि यहूदाची नगरे पुन्हा बांधील; लोक तेथे राहतील आणि ते त्यांच्या मालकीचे होईल.
त्याच्या सेवकाचे वंशजही ते वतन करून घेतील; आणि ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते तेथे राहतील.
स्तोत्र 85
हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस.
तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस. तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत.
तू आपला सर्व क्रोध काढून घेतला आहे; आणि आमच्यावरील भयंकर क्रोधापासून मागे फिरला आहेस.
हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास परत आण, आणि आमच्यावरचा तुझा असंतोष दूर कर.
सर्वकाळपर्यंत तू आमच्यावर रागावलेला राहशील का? पिढ्यानपिढ्या तू रागावलेला राहशील काय?
तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा, म्हणून तू आम्हास परत जिवंत करणार नाहीस का?
हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा अनुभव आम्हास येऊ दे; तू कबूल केलेले तारण आम्हास दे.
परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन. कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल, तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये.
खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव रहावे.
दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.
पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, आणि स्वर्गातून नितिमत्व खाली पाहत आहे.
जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि आमची भूमी आपले पिक देईल.
त्याच्यासमोर नितीमत्व चालेल, आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील.
स्तोत्र 90
हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस.
पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच, अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस.
तू मनुष्यास पुन्हा मातीस मिळवतोस, आणि तू म्हणतोस, “अहो मनुष्याच्या वंशजांनो परत या.”
कारण हजारो वर्षे तुझ्या दृष्टीने, कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.
पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे ते आहेत.
सकाळी ते उगवते आणि वाढते; संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते.
खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो, आणि तुझ्या कोपाने आम्ही घाबरून जातो.
तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत. आमचे गुप्त पाप तुझ्या प्रकाशाच्या समक्ष ठेवले आहे.
तुझ्या क्रोधाखालून आमचे आयुष्य निघून जाते; आमची वर्षे उसाशाप्रमाणे त्वरेने संपून जातात.
आमचे आयुष्य सत्तर वर्षे आहे; किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे; पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु:ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो.
तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो?
म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.
हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ तू उशीर करशील? तुझ्या सेवकावर दया कर.
तू आपल्या दयेने आम्हास सकाळी तृप्त कर म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्षाने आणि आनंदाने घालवू.
जितके दिवस तू आम्हास पीडले त्या दिवसाच्या मानाने आणि जितकी वर्षे आम्ही समस्येचा अनुभव घेतला त्या वर्षाच्या मानाने आम्हांला आनंदित कर.
तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना बघू दे.
प्रभू, आमचा देव याची कृपा आम्हांवर असो. आमच्या हातच्या कामाला उन्नती दे; खरोखर, आमच्या हातच्या कामाला उन्नती दे.
स्तोत्र 116
मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो.
कारण तो माझे ऐकतो, म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन.
मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले, आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या, संकट व क्लेश मला झाले.
नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.”
परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे.
परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले.
हे माझ्या जिवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये; कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत.
तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूपासून, आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत.
जीवंताच्या भूमित परमेश्वराची सेवा करणे मी चालूच ठेवीन.
मी फार पीडित आहे असे जेव्हा मी म्हणालो, तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे.
मी अविचाराने म्हणालो की, सगळे माणसे खोटारडे आहेत.
परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू?
मी तारणाचा प्याला उंचावून परमेश्वराच्या नावाने हाक मारीन.
त्याच्या सर्व लोकांसमोर, मी परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचा मृत्यू अमोल आहे.
हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा सेवक आहे; मी तुझा सेवक, तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे; माझी बंधने तू सोडली आहेस.
मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
मी त्याच्या सर्व लोकांसमोर परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
परमेश्वराच्या घराच्या अंगणात, यरूशलेमा तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्र 117
अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराची स्तुती करा; अहो सर्व लोकांनो त्याची स्तुती करा.
कारण त्याचा विश्वासाचा करार आमच्यादृष्टीने महान आहे, आणि त्याची विश्वसनियता सर्वकाळ आहे. परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्र 118 (I)
परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
इस्राएलाने आता म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
अहरोनाच्या घराण्याने म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
परमेश्वराची उपासना करणाऱ्यांनी म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही; मनुष्य माझे काय करू शकेल?
माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे; माझा द्वेष करणाऱ्यावर विजय झालेला मी बघेन.
मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे.
मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे.
सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावात मी त्यांचा संहार करीन.
त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.
त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे; जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.
मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला, परंतु परमेश्वराने मला मदत केली.
परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे. आणि तो माझे तारण झाला आहे.
उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.
परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.
मी मरणार नाही, पण जगेन आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन.
परमेश्वराने मला जबर शिक्षा केली; परंतु त्याने मला मृत्यूच्या हाती दिले नाही.
माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा; मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन.
हे परमेश्वराचे दार आहे; नितीमान त्यातून प्रवेश करतील.
मी तुला धन्यवाद देईन, कारण तू मला उत्तर दिले आहे आणि तू माझे तारण झाला आहेस.
इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता, तोच कोनाशिला झाला आहे.
परमेश्वराने हे केले आहे; आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे.
परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे; ह्यात आपण आनंद व उल्लास करू.
हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर; हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, आता आमचा उत्कर्ष कर.
परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो; परमेश्वराच्या घरातून आम्ही तुला आशीर्वाद देतो.
परमेश्वर देव आहे. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे; यज्ञाचा पशू वेदीच्या शिंगास दोरीने बांधा.
तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईन. तू माझा देव आहेस; मी तुला उंचावीन.
अहो, तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या; कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
(स्तोत्र ११९)
(1) धन्य आहेत जे मार्गात निर्दोष आहेत — जे प्रभुच्या नियमात चालतात. धन्य आहेत जे त्याच्या साक्षींचा शोध घेतात, आणि सर्व हृदयाने त्याला शोधतात. कारण अधर्म करणाऱ्यांनी त्याच्या मार्गांनी चालणे पसंत केले नाही. तू आज्ञा दिलीस की तुझ्या आज्ञांची फार काळजीपूर्वक राखण करावी. काश, माझे मार्ग तुझ्या नियमांच्या राखणीसाठी स्थिर राहोत. मग मी लाजणार नाही, जेव्हा मी तुझ्या सर्व आज्ञांकडे ध्यान करीन. सरळ हृदयाने मी तुला धन्यवाद देईन, जेव्हा मी तुझ्या न्याय्य निर्णयांना जाणीन. मी तुझे नियम पाळीन — मला अखेरपर्यंत नाकारू नकोस. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(2) तरुण आपला मार्ग कशाने शुद्ध ठेवू शकतो? — तुझ्या वचनाचे पालन करून. सर्व हृदयाने मी तुला शोधले; मला तुझ्या आज्ञांपासून दूर भटकू देऊ नकोस. मी तुझे वचन माझ्या हृदयात दडवले आहे, की मी तुझ्याविरुद्ध पाप करूं नये. तू धन्य आहेस, हे प्रभु; मला तुझे नियम शिकव. माझ्या ओठांनी मी तुझ्या मुखाच्या सर्व न्यायांचे प्रगटन केले. मी तुझ्या साक्षींच्या मार्गात सर्व धनाप्रमाणे आनंद मानला. मी तुझ्या आज्ञांमध्ये बोलतो आणि तुझ्या मार्गांवर ध्यान करतो. मी तुझ्या विधींमध्ये मन लावून राहीन; आणि तुझे वचन विसरणार नाही. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(3) तुझ्या दासाला बक्षीस दे, की मी जगो आणि तुझे वचन पाळो. माझ्या डोळ्यांचे उघड कर, की मी तुझ्या नियमातील अद्भुत गोष्टी पाहीन. मी पृथ्वीवर एक परका आहे — तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपवू नकोस. प्रत्येक वेळी माझा जीव तुझ्या न्यायांच्या अभिलाषेने गळून पडतो. तू अभिमान्यांना, शापितांना — ज्यांनी तुझ्या आज्ञांपासून दूर भटकलो — धिक्कारले आहेस. अपमान व लाज माझ्यापासून दूर कर; कारण मी तुझ्या साक्षींची इच्छा केली. अधिपती माझ्याविरुद्ध बसून बोलले, तरी तुझा दास तुझ्या नियमांमध्ये ध्यान करीत होता; कारण तुझ्या साक्षी माझे ध्यान आहेत, आणि तुझे नियम माझे सल्ले आहेत. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(4) माझा जीव धुळीस चिकटला — तुझ्या वचनाप्रमाणे मला जिवंत कर. मी माझे मार्ग सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस — मला तुझे नियम शिकव. तुझ्या आज्ञांचा मार्ग मला समजाव; आणि मी तुझ्या अद्भुत कामांमध्ये ध्यान करीन. दुःखामुळे माझा जीव झुकला आहे — तुझ्या वचनाप्रमाणे मला बळ दे. असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; आणि तुझ्या नियमाने माझ्यावर कृपा कर. मी सत्याचा मार्ग निवडला; तुझे न्याय मला विसरले नाहीत. हे प्रभु, मी तुझ्या साक्षींना चिकटलो — मला लाज आणू नकोस. तू माझे हृदय रुंद केलेस म्हणून मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने धावीन. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(5) हे प्रभु, मला तुझ्या नियमांच्या मार्गात नियम दे, की मी तो सदैव पाळीन. मला समज दे, की मी तुझ्या नियमाचा शोध घेईन आणि सर्व हृदयाने तो राखीन. मला तुझ्या आज्ञांच्या पायवाटेने चालव; कारण मला ती प्रिय आहे. माझे हृदय तुझ्या साक्षीकडे वळव, अन्यायाकडे नव्हे. माझे डोळे व्यर्थ वस्तू पाहण्यापासून वळव; आणि तुझ्या मार्गांत मला जिवंत कर. तुझ्या भीतीत तुझ्या दासाला तुझे वचन स्थिर कर. ज्याची मला भीती वाटली त्या अपमानास दूर कर; कारण तुझे न्याय मधुर आहेत. पाहा — मी तुझ्या आज्ञांची इच्छा केली आहे; तुझ्या न्यायाने मला जिवंत कर. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(6) हे प्रभु, तुझी दया आणि तुझे तारण — तुझ्या वचनाप्रमाणे — माझ्यावर येऊ देत. मग जो मला दोष देतो त्याला मी उत्तर देईन; कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो. तुझ्या तोंडातील सत्याचे वचन माझ्या तोंडून दूर करू नकोस; कारण मी तुझ्या न्यायांची आशा धरली आहे. आणि मी तुझा नियम सर्वकाळ, सर्व युगांच्या युगांपर्यंत राखीन. आणि मी स्वातंत्र्यात चालीन; कारण मी तुझ्या आज्ञांची इच्छा केली आहे. आणि मी राजांसमोर तुझ्या साक्षींची बोलणी करीन आणि मला लाज नाही वाटेल. मी तुझ्या आज्ञांमध्ये आनंद मानला आहे, ज्यांना मी फार प्रेम केले आहे. मी तुझ्या आज्ञांकडे — ज्यांवर मी प्रेम केले — माझे हात उचलतो; आणि तुझ्या विधींवर ध्यान करतो. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(7) तुझ्या दासाला दिलेले तुझे वचन आठव; ज्यावर तू मला आशा ठेवायला लावलीस — हेच माझे दुःखातील सांत्वन; कारण तुझ्या वचनाने मला जिवंत केले. अभिमान्यांनी अत्यंत कायदा ओलांडला; पण मी तुझ्या नियमापासून वळलो नाही. हे प्रभु, मी तुझे प्राचीन न्याय आठविले आणि मला सांत्वन मिळाले. अधर्म्यांमुळे जे तुझा नियम सोडून गेले — मी दुःखी झालो. तुझे नियम माझ्या परदेशातील गीत झाले. रात्री मी तुझे नाव आठविले, हे प्रभु, आणि तुझा नियम राखिला. हे मला मिळाले, कारण मी तुझे नियम शोधले. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(8) हे प्रभु, तू माझा हिस्सा आहेस; मी तुझ्या आज्ञा पाळीन असे म्हटले आहे. सर्व हृदयाने मी तुझे मुखकमल गाठायला प्रयत्न केला — तुझ्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर. मी माझ्या मार्गांचा विचार केला आणि माझे पाऊल तुझ्या साक्षीकडे परतविले. मी तयार झालो आणि ढिलाई केली नाही — तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी. दुष्टांचे दोर माझ्याभोवती गुंडाळले; तरीही मी तुझा नियम विसरलो नाही. मध्यरात्री मी उठून तुझे आभार मानीन — तुझ्या न्याय्य न्यायांबद्दल. जे तुझी भीती बाळगतात आणि तुझ्या आज्ञा राखतात — त्यांच्याशी मी सोबती होतो. हे प्रभु, तुझ्या दयेने पृथ्वी भरली आहे — मला तुझे न्याय शिकव. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(9) तू आपल्या दासाबरोबर भला केलास, हे प्रभु, तुझ्या वचनाप्रमाणे. मी चांगुलपणा, शिस्त व ज्ञान शीक — कारण मी तुझ्या आज्ञांवर विश्वास ठेवला आहे. मी नम्र होण्यापूर्वी — मी भटकलो; म्हणून मी तुझे वचन पाळले. तू चांगला आहेस, हे प्रभु — तुझ्या चांगुलपणाने मला तुझे नियम शिकव. अभिमान्यांनी माझ्यावर खूप अन्याय केला; पण मी सर्व हृदयाने तुझ्या आज्ञांचा शोध घेतला. त्यांचे मन दुधासारखे जाड झाले; पण मी तुझ्या नियमात ध्यान केले. तू मला नम्र केलेस हे माझ्यासाठी चांगले — की मी तुझे नियम शिकू. तुझ्या मुखाचा नियम माझ्यासाठी हजारो सोन्या-चांदीपेक्षा अधिक चांगला आहे. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(10) तुझे हातांनी मला घडविले आणि बनविले; मला समज दे की मी तुझ्या आज्ञा शिकू. जे तुझी भीती बाळगतात ते मला पाहून आनंदित होतील; कारण मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे. हे प्रभु, मी जाणतो की तुझे न्याय न्याय्य आहेत; आणि तू मला नीतिमत्तेने नम्र केलेस. तुझ्या दयेने — तुझ्या वचनाप्रमाणे — मला सांत्वन मिळो. तुझी दया माझ्यावर येऊ दे — की मी जिवंत राहीन; कारण तुझा नियम माझे ध्यान आहे. अभिमान्यांना लाज वाटो — कारण त्यांनी अन्यायाने माझ्यावर अत्याचार केला; पण मी तुझ्या आज्ञांवर ध्यान करीन. जे तुझी भीती बाळगतात आणि तुझे साक्षी जाणतात — ते माझ्याकडे परत येवोत. माझे हृदय तुझ्या न्यायांत निर्दोष होवो — की मी लज्जित होऊ नये. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(11) माझा जीव तुझ्या तारणासाठी कंस काढतो; आणि मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे. तुझ्या वचनाच्या प्रतिक्षेत माझे डोळे थकले — म्हणत: कधी तू मला सांत्वन देशील? मी धुराच्या कुपीसारखा झालो; तरी मी तुझे नियम विसरलो नाही. तुझ्या दासाचे किती दिवस? — जे मला छळतात त्यांच्याविरुद्ध तू माझ्यासाठी कधी न्याय करशील? नियमभंग करणारे माझ्याशी मूर्खपणाने बोलले; पण तुझा नियम, हे प्रभु, तसाच नाही — कारण तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. अन्यायाने त्यांनी मला छळले — मला मदत कर. त्यांनी पृथ्वीवर मला जवळजवळ नष्ट केले; पण मी तुझ्या आज्ञा सोडल्या नाहीत. तुझ्या दयेप्रमाणे मला जिवंत कर — आणि मी तुझ्या मुखाच्या साक्षी राखीन. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(12) हे प्रभु, तुझे वचन स्वर्गात सदैव स्थिर आहे; आणि पिढ्यानपिढ्या तुझी विश्वासार्हता. तू पृथ्वीची स्थापना केलीस — म्हणून ती ठाम उभी आहे. तुझ्या नियमांनुसार ते आजपर्यंत उभे आहेत; कारण सर्व वस्तू तुझी सेवक आहेत. जर तुझा नियम माझे ध्यान नसता, तर मी माझ्या क्लेशात नष्ट झालो असतो. मी तुझ्या आज्ञा कधीही विसरणार नाही; कारण त्यांच्यामुळेच तू मला जिवंत केले आहेस. मी तुझाच आहे — मला तार; कारण मी तुझ्या आज्ञांचा शोध घेतला आहे. दुष्टांनी मला नष्ट करण्यासाठी वाट पाहिली; पण मी तुझ्या साक्षीकडे लक्ष दिले. सर्व परिपूर्णतेला मी सीमा पाहिली; पण तुझ्या आज्ञा फार विस्तृत आहेत. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(13) हे प्रभु, तुझे नाव माझ्यास प्रिय आहे; तेच माझे दिवसभर ध्यान आहे. तुझ्या आज्ञांनी मला माझ्या शत्रूंपेक्षा अधिक शहाणपण दिले — कारण त्या सदैव माझ्याबरोबर आहेत. ज्यांनी मला शिकवले त्याहून मी अधिक समजून घेतले — कारण तुझ्या साक्षी माझे ध्यान आहेत. वृद्धांहून मी अधिक समजलो — कारण मी तुझ्या आज्ञांचा शोध घेतला. प्रत्येक वाईट मार्गापासून मी माझे पाय आवरले — की मी तुझे वचन पाळू. मी तुझ्या न्यायांपासून वळलो नाही — कारण तूच मला शिकवले आहेस. तुझे वचन माझ्या घशास किती गोड आहे! — माझ्या तोंडाला मधापेक्षाही गोड. तुझ्या आज्ञांपासून मला समज आली; म्हणून मी प्रत्येक अन्यायाचा मार्ग द्वेष केला. (कारण तू माझ्यासाठी नियम ठेवला आहेस.) (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(14) तुझे वचन हे माझ्या पावलांसाठी दीपक आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश. मी शपथ घेतली आहे आणि ते पाळीन — तुझ्या न्याय्य न्यायांची राखण करीन. मी फार खचलेलो आहे, हे प्रभु — तुझ्या वचनाप्रमाणे मला जिवंत कर. माझ्या तोंडाच्या अर्पणांना स्वीकार, हे प्रभु — आणि मला तुझे न्याय शिकव. माझा जीव सर्वकाळ माझ्या हातात आहे; तरी मी तुझा नियम विसरलो नाही. दुष्टांनी माझ्यासाठी सापळे लपविले; तरी मी तुझ्या आज्ञांपासून भटकलो नाही. मी तुझ्या साक्षींचा वारसा सदैव घेतला आहे — कारण त्या माझ्या हृदयाचा आनंद आहेत. तुझ्या धार्मिकतेसाठी माझ्या हृदयाला वाकविले आहे — सदैव. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(15) मी नियमभंग करणाऱ्यांचा द्वेष केला; पण तुझा नियम मी प्रेम केला. तू माझा आसरा व माझा ढाल आहेस; मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे. दुष्टांनो, माझ्यापासून दूर व्हा; मी माझ्या देवाच्या आज्ञांचा शोध घेईन. तुझ्या वचनाप्रमाणे मला आधार दे, की मी जगो; आणि माझी आशा फोल जाऊ देऊ नकोस. मला आधार दे — की मी तारला जाईन; आणि मी सतत तुझ्या आज्ञांवर ध्यान करीन. जे तुझ्या आज्ञांपासून भटकलो — सर्वांना तू नाकारलेस — कारण त्यांचे विचार असत्य आहेत. पृथ्वीवरील सर्व अधर्मी जनांना तू अयशस्वी ठरविले — म्हणून मी तुझ्या साक्षी प्रेम केल्या. तुझ्या भीतीने माझे मांस थरथरते — कारण मी तुझ्या न्यायांबद्दल घाबरतो. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(16) मी न्याय व नीती केली — मला माझ्या छळणाऱ्यांना देऊ नकोस. तुझ्या दासासाठी भला हमीदार हो; अभिमान्यांनी माझ्यावर अन्याय करू नयेत. तुझ्या तारणाची आणि तुझ्या न्याय्य वचनाची वाट पाहून माझे डोळे थकले. तुझ्या दासाबरोबर तुझ्या दयेप्रमाणे कर; आणि मला तुझे नियम शिकव. मी तुझा दास आहे — मला समज दे; की मी तुझ्या साक्षी जाणू. आता तो काळ आहे जेव्हा प्रभु कृती करील — कारण त्यांनी तुझा नियम तोडला आहे. म्हणून मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, उत्कृष्ट सोनेपेक्षा अधिक प्रेम केल्या. म्हणून तुझ्या सर्व आज्ञांनुसार मी सरळ उभा राहिलो; आणि प्रत्येक अन्यायाच्या मार्गाचा मी द्वेष केला. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(17) तुझ्या साक्षी अद्भुत आहेत — म्हणून माझा जीव त्यांना राखतो. तुझ्या वचनाचे उलगडणे प्रकाश देते; आणि निरागसांना समज देते. मी माझे तोंड उघडून सास घेतला — कारण मी तुझ्या आज्ञांसाठी तडफडलो. माझ्याकडे पाह आणि माझ्यावर दया कर — तुझ्या नावावर प्रेम करणाऱ्यांप्रमाणे. तुझ्या वचनाप्रमाणे माझे पाऊल ठरव; आणि कोणताही अधर्म माझ्यावर राज्य करू नये. मला मनुष्यांच्या अन्यायापासून मुक्त कर — की मी तुझ्या आज्ञा पाळीन. तुझ्या सेवकावर तुझे मुखकमल प्रकाशमान कर; आणि मला तुझे नियम शिकव. त्यांनी तुझा नियम पाळला नाही म्हणून माझे डोळे पाण्याच्या प्रवाहांनी वाहिले. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(18) हे प्रभु, तू न्यायी आहेस; आणि तुझे न्याय सरळ आहेत. तू तुझ्या साक्षींना न्याय व सत्यात फारशा आज्ञा दिल्या आहेत. माझ्यावर जलन झाली आहे — कारण माझे शत्रू तुझ्या शब्दांना विसरले आहेत. तुझे वचन फारच शुद्ध आहे; म्हणून तुझ्या दासाने ते प्रेम केले. मी लहान व तुच्छ आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही. तुझी धार्मिकता सदैवची धर्म आहे; आणि तुझे वचन सत्य आहे. संकट व क्लेश माझ्यावर आले; तरी तुझ्या आज्ञा माझे ध्यान आहे. तुझ्या साक्षी सदैव न्याययुक्त आहेत; मला समज दे — की मी जगो. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(19) मी सर्व हृदयाने हाक मारली — मला उत्तर दे, हे प्रभु; मी तुझे नियम शोधीन. मी तुला हाक मारली — मला तार; आणि मी तुझ्या साक्षी राखीन. मी पहाटे उठून ओरडलो; कारण मी तुझ्या वचनावर आशा ठेवली होती. रात्रीच्या पहाटे माझे डोळे तुझ्या वचनात ध्यान करण्यासाठी जागृत होते. माझा आवाज ऐक, हे प्रभु — तुझ्या दयेप्रमाणे; आणि तुझ्या न्यायांप्रमाणे मला जिवंत कर. जे मला पाठलाग करतात ते दुष्टतेने जवळ आले; ते तुझ्या नियमापासून दूर आहेत. हे प्रभु, तू जवळ आहेस; आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. तुझ्या साक्षींपासून मी अगदी प्रथमपासून जाणले की तू त्यांना सदैवाकरता बांधून ठेवले आहेस. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(20) माझी दु:ख पहा व मला सोडा — कारण मी तुझा नियम विसरलो नाही. माझ्या प्रकरणाचा निर्णय कर व मला तार; तुझ्या वचनाप्रमाणे मला जिवंत कर. दुष्टांसाठी तारण दूर आहे — कारण ते तुझे नियम शोधत नाहीत. तुझ्या दया फार आहेत, हे प्रभु; तुझ्या न्यायांप्रमाणे मला जिवंत कर. माझे अनेक छळणारे व संकट देणारे आहेत; तरी मी तुझ्या साक्षींपासून विचलित झालो नाही. मी मूर्ख पाहिले आणि निराश झालो — कारण त्यांनी तुझे वचन पाळले नाही. पाहा, हे प्रभु — मी तुझ्या आज्ञा प्रेम केल्या; तुझ्या दयेप्रमाणे मला जिवंत कर. तुझे वचन आरंभीपासून सत्य आहे; आणि तुझ्या सर्व न्याय्य न्यायांचा शेवटपर्यंत टिकाव आहे. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(21) अधिपतींनी मला विनाकारण छळले; पण तुझ्या वचनामुळे माझे हृदय थरथरले. मी तुझ्या वचनात आनंद मानतो — जसा एखादा मोठ्या लुटीचा शोध लावतो. मी खोटेपणाचा तिरस्कार केला आणि घृणा केली — पण तुझा नियम मी प्रेम केला. दिवसातून सात वेळा मी तुझे स्तवन करतो — तुझ्या न्याय्य न्यायांबद्दल. जे तुझा नियम प्रेम करतात — त्यांना मोठी शांती असो — आणि त्यांना ठेच लागू नये. हे प्रभु, मी तुझ्या तारणाची आशा धरली; आणि तुझ्या आज्ञा प्रेम केल्या. माझ्या आत्म्याने तुझ्या साक्षी राखल्या; आणि मी त्यांना फार प्रेम केले. मी तुझ्या आज्ञा आणि तुझ्या साक्षी राखल्या; कारण माझे सर्व मार्ग तुझ्या समोर आहेत, हे प्रभु. (Doxa ci Vilan`;rwpe: गौरव तुझा असो, हे मानवजातीवर प्रेम करणाऱ्या)
(22) माझी विनवणी तुझ्या समोर येऊ दे, हे प्रभु; तुझ्या वचनाप्रमाणे मला समज दे. माझी प्रार्थना तुझ्या सान्निध्यात येऊ दे, हे प्रभु; तुझ्या वचनाप्रमाणे मला जिवंत कर. जेव्हा तू मला तुझे नियम शिकवशील तेव्हा माझे ओठ स्तुती ओतीन; माझी जीभ तुझ्या वचनांची घोषणा करील — कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत. तुझा हात माझ्या तारण्यासाठी असू दे, कारण मी तुझ्या आज्ञांची इच्छा केली आहे. हे प्रभु, मी तुझ्या तारणाची आकांक्षा केली; आणि तुझा नियम हा माझा ध्यान आहे. माझा जीव जगो आणि तुला स्तुति करो; आणि तुझे न्याय मला सहाय्य करो. मी हरवलेल्या मेंढराप्रमाणे भटकलो — तुझ्या दासाचा शोध घे; कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही. अल्लेलूया.
(मत्तय 25:1-13) त्या वेळी, स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल, ज्यांनी आपली दिवटी घेतली आणि वराला भेटण्यास गेल्या. त्यांपैकी पाच मूर्ख आणि पाच शहाण्या होत्या. मूर्खांनी दिवटी घेतल्या, पण सोबत तेल घेतले नाही. पण शहाण्यांनी आपल्या दिवट्यांबरोबर भांड्यात तेल घेतले. वर उशीर केला म्हणून त्या सर्व झोपल्या आणि निद्रिस्त झाल्या. मध्यरात्री एक हाक झाली: पाहा, वर येत आहे; त्याला भेटण्यास बाहेर या. मग त्या सर्व कुमारी उठल्या आणि आपापल्या दिवट्या व्यवस्थित केल्या. मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, आमच्यास थोडे तेल द्या; कारण आमच्या दिवट्या विझत आहेत. शहाण्यांनी उत्तर दिले, कदाचित आम्हांस आणि तुम्हांस पुरेल असे नसेल; म्हणून विक्रेत्यांकडे जा आणि स्वतःसाठी घ्या. त्या जात असताना वर आला, आणि तयारी करून ठेवलेल्या त्या त्याच्यासोबत विवाहात गेल्या; आणि दार बंद झाले. नंतर उरलेल्या त्या कुमारीही आल्या आणि म्हणाल्या, आमच्या स्वामी, आमच्या स्वामी, आम्हांस उघड. पण त्याने उत्तर दिले, खरे सांगतो, मी तुम्हांस ओळखीत नाही. म्हणून जागते राहा; कारण मनुष्यपुत्र कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी येईल ते तुम्हांस ठाऊक नाही. (आणि सर्वदा देवाला गौरव असो).
विभाग
पाहा, वर मध्यरात्री येतो. जो दास जागता आढळेल तो धन्य. पण जो उदासीन आढळेल — तो त्याच्यासोबत जाण्यास अयोग्य. म्हणून, हे माझ्या आत्म्या, झोपेने भारावू नकोस — नाहीतर तू राज्याबाहेर फेकली जाशील. पण जागती रहा आणि हाका मार, म्हणत: पवित्र, पवित्र, पवित्र — तू देव — देवाची माता याच्या निमित्ताने आमच्यावर दया कर. (दोक्सा पत्री कै इयो कै आगियो प्नेव्माती Δόξα Πατρί καὶ Υἱῷ καὶ Ἁγίῳ Πνεύματι - पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास गौरव असो).
हे माझ्या आत्म्या, त्या भयंकर दिवसाचे स्मरण कर, आणि जागती हो; आणि आनंदाच्या तेलाने तुझी दिवटी प्रज्वलित कर. कारण तुला माहीत नाही केव्हा तुझ्याकडे तो आवाज येईल: पाहा, वर आला आहे. म्हणून, हे आत्म्या, झोपू नकोस; नाहीतर तू बाहेर उभी राहशील, पाच मूर्ख कुमारिकांप्रमाणे दार ठोठावत. पण विनवणी करून जागती राहा, की तू प्रभु ख्रिस्तास रसाळ तेलाने भेटशील; आणि त्याच्या खऱ्या, दैवी गौरवाच्या विवाहात तो तुला कृपा करो. (के नून, के आएई, के इस्तूस एओनास तोन एओनोन आमीन Καὶ νῦν καὶ ἀεὶ καὶ εἰς τοὺς αἰῶνας τῶν αἰώνων. Ἀμήν - आता आणि सदैव आणि सर्व युगांच्या युगांपर्यंत, आमेन).
तू आमच्या तारणाचा तटबंदी भिंत आहेस, हे देवाची माता कुमारी — अभेद्य दृढ दुर्ग. शत्रूंच्या युक्त्या व्यर्थ कर; आणि तुझ्या दासांचा शोक आनंदात बदल; आमच्या नगराला (आमच्या मठाला) बळकट कर; आणि आमच्या राजांसाठी (आमच्या प्रमुखांसाठी) संग्राम कर; आणि जगाच्या शांततेकरिता विनवणी कर; कारण तूच आमची आशा आहेस, हे देवाची माता. (के नून, के आएई, के इस्तूस एओनास तोन एओनोन आमीन Καὶ νῦν καὶ ἀεὶ καὶ εἰς τοὺς αἰῶνας τῶν αἰώνων. Ἀμήν - आता आणि सदैव आणि सर्व युगांच्या युगांपर्यंत, आमेन).
हे स्वर्गीय राजा, सांत्वनकर्ता, सत्याचा आत्मा; जो सर्वत्र उपस्थित आहे आणि सर्व काहीने परिपूर्ण आहे; चांगुलपणाचा खजिना आणि जीवनदाता — ये, कृपया, आमच्यात वास कर; आणि हे चांगल्या, आम्हांला सर्व अशुद्धतेपासून शुद्ध कर, आणि आमच्या आत्म्यांचे उध्दार कर. (दोक्सा पत्री कै इयो कै आगियो प्नेव्माती Δόξα Πατρί καὶ Υἱῷ καὶ Ἁγίῳ Πνεύματι - पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास गौरव असो).
जसा तू तुझ्या शिष्यांसोबत होतास, हे तारणहारा, आणि त्यांना शांती दिलीस, तसेच आमच्यासोबतही रहा; आम्हांला तुझी शांती दे, आम्हांला वाचव, आणि आमच्या आत्म्यांचे उध्दार कर. (के नून, के आएई, के इस्तूस एओनास तोन एओनोन आमीन Καὶ νῦν καὶ ἀεὶ καὶ εἰς τοὺς αἰῶνας τῶν αἰώνων. Ἀμήν - आता आणि सदैव आणि सर्व युगांच्या युगांपर्यंत, आमेन).
जेव्हा आम्ही तुझ्या पवित्र मंदिरात उभे राहतो, तेव्हा आम्हांस स्वर्गात उभे असल्यासारखे मानले जाते. हे देवाची माता, तू स्वर्गाचा दरवाजा आहेस; आमच्यासाठी दयेचा दरवाजा उघड.
Κύριε ἐλέησον क्यिरिये एलेइसोन (प्रभु, दया कर) 41 वेळा
पवित्र, पवित्र, पवित्र
पवित्र, पवित्र, पवित्र — सैन्यांचा प्रभु. आकाश व पृथ्वी तुझ्या गौरवाने व मानाने परिपूर्ण आहेत. हे देव पिता, सर्वशक्तिमान, आमच्यावर दया कर. हे पवित्र त्रित्व, आमच्यावर दया कर. हे सेनाधीश प्रभु देवा, आमच्यासोबत राह; कारण आमच्या संकटात व क्लेशांत तुझ्याशिवाय आमचा कोणीही सहाय्यकारी नाही.
हे देवा, आमच्या अपराधांबद्दल आम्हांला मुक्त कर, क्षमा कर, आणि सोडव; जे आम्ही स्वेच्छेने केले आणि जे अनवधानाने केले; जे आम्ही जाणूनबुजून केले आणि जे अज्ञानाने केले; गुप्त आणि उघड — हे प्रभु, तुझ्या पवित्र नावासाठी, जे आमच्यावर उद्घोषित आहे, ते सर्व आम्हांला क्षमा कर; तुझ्या दयेप्रमाणे, प्रभु — आमच्या पापांप्रमाणे नव्हे.
आणि आम्हांला पात्र कर की आम्ही कृतज्ञतेने म्हणू: आमच्या स्वर्गस्थ पित्या..
दुसरी रखवाली
स्तोत्र 118 (VIII)
ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते आशीर्वादित आहेत.
जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात, जे संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात ते आशीर्वादित आहेत.
ते चुकीचे करीत नाहीत; ते त्याच्या मार्गात चालतात.
तुझे विधी आम्ही काळजीपूर्वक पाळावे म्हणून तू आम्हास आज्ञा दिल्या आहेत.
मी नेहमी तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे.
मी जेव्हा तुझ्या सर्व आज्ञांचा विचार करीन तेव्हा मी कधीही लाजणार नाही.
मी जेव्हा तुझे न्याय्य निर्णय शिकेन, तेव्हा मी मनःपूर्वक तुला धन्यवाद देईन.
मी तुझे नियम पाळीन; मला एकट्याला सोडू नकोस.
तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील? तुझ्या वचनाचे पालन करण्याने.
मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.
मी तुझ्याविरुध्द पाप करू नये म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे.
हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; मला तुझे नियम शिकव.
मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडचे सर्व योग्य निर्णय जे तू प्रकट केले ते जाहीर करीन.
तुझ्या आज्ञेच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व धनसंपत्ती असे मानून मी त्यामध्ये अत्यानंद करतो.
मी तुझ्या नियमांचे मनन करीन, आणि तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन.
मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही.
आपल्या सेवकावर दया कर याकरिता की; मी जिवंत रहावे, आणि तुझे वचन पाळावे.
माझे डोळे उघड म्हणजे तुझ्या नियमशास्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
मी या देशात परका आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपवू नकोस.
तुझ्या योग्य निर्णयांची सतत उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव चिरडून गेला आहे.
तू गर्विष्ठांना रागावतोस, तुझ्या आज्ञापासून भरकटतात ते शापित आहेत.
माझ्यापासून लाज आणि मानहानी दूर कर, कारण मी तुझ्या कराराची आज्ञा पाळली आहे.
अधिपतीही माझ्याविरूद्ध कट रचतात आणि निंदा करतात, तुझा सेवक तुझ्या नियमांचे मनन करतो.
तुझ्या कराराची आज्ञा मला आनंददायी आहे, आणि ते माझे सल्लागार आहेत.
माझा जीव धुळीस चिकटून आहे; आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
मी तुला आपले मार्ग सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस; तू मला आपले नियम शिकव.
मला तुझ्या विधींचा मार्ग समजावून दे. यासाठी की, मी तुझ्या आश्चर्यकारक शिक्षणाचे मनन करावे.
माझा जीव दुःखाने गळून जातो; आपल्या वचनाने मला उचलून धर.
असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; कृपाकरून तुझे नियमशास्त्र मला शिकीव.
मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे; मी तुझे योग्य निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत.
मी तुझ्या कराराच्या निर्बंधास चिकटून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस.
मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन, कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारित करतोस.
हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन.
मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन.
तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे.
माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे, आणि अन्याय्य लाभापासून दूर कर.
निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. मला तुझ्या मार्गात पुर्नजीवीत कर.
तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन, आपल्या सेवकासंबंधाने खरे कर.
ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत.
पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे.
हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो.
जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल, कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे.
तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको, कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो.
मी सदैव तुझे नियमशास्त्र, सदासर्वकाळ आणि कायम पाळीन.
मी सुरक्षितपणे चालेन, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.
मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन, आणि मी लज्जित होणार नाही.
मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन, ज्या मला अतिशय प्रिय आहेत.
ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन; मी तुझ्या नियमांचे मनन करीन.
तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. कारण तू मला आशा दिली आहेस.
माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते;
गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे, तरी मी तुझ्या नियमशास्रापासून भरकटलो नाही.
हे परमेश्वरा, प्राचीन काळच्या तुझ्या निर्णयाविषयी मी विचार करतो, आणि मी आपले समाधान करतो.
दुष्ट तुझे नियमशास्त्र नाकारतात, म्हणून संताप माझा ताबा घेतो.
ज्या घरात मी तात्पुरता राहतो; तुझे नियम मला माझे गीत झाले आहेत.
हे परमेश्वरा, रात्रीत मी तुझ्या नावाची आठवण करतो, आणि मी तुझे नियमशास्त्र पाळतो.
हे मी आचरिले आहे, कारण मी तुझे विधी पाळले आहेत.
परमेश्वर माझा वाटा आहे; तुझे वचन पाळण्याचा मी निश्चय केला आहे.
मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझ्या अनुग्रहासाठी कळकळीची विनंती करतो; तुझ्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर;
मी आपल्या मार्गाचे परीक्षण केले, आणि तुझ्या कराराकडे आपले पावली वळवीली.
मी तुझ्या आज्ञा पाळण्याची घाई केली, आणि मी उशीर केला नाही.
दुष्टाच्या दोऱ्यांनी मला जाळ्यात पकडले आहे; तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
मी मध्यरात्री तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.
तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, तुझे विधी पाळणाऱ्यांचा, मी साथीदार आहे.
हे परमेश्वरा, तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने सर्व पृथ्वी भरली आहे. तू आपले नियम मला शिकव.
हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे, आपल्या सेवकाचे चांगले केले आहेस.
योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान आणि बुद्धी तू मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझा विश्वास आहे.
पीडित होण्यापूर्वी मी बहकलो होतो, परंतु आता मी तुझे वचन पाळीत आहे.
तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस. मला तुझे नियम शिकव.
गर्विष्ठांनी माझ्यावर लबाडीने चिखलफेक केली आहे, पण मी तुझे विधी अगदी मनापासून पाळीन.
त्यांचे हृदय कठीण झाले आहे, पण मला तुझ्या नियमशास्त्रात आनंद आहे.
मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले; त्यामुळे, मी तुझे नियमशास्त्र शिकलो.
सोने आणि रुपे ह्यांच्या हजारो तुकड्यापेक्षा, मला तुझ्या तोंडचे नियमशास्त्र अधिक मोलवान आहेत.
तुझ्या हातांनी मला निर्माण केले आणि आकार दिला; मला बुद्धी दे म्हणजे मी तुझ्या आज्ञा शिकेन.
तुझा सन्मान करणारे मला पाहून हर्ष करतील, कारण मला तुझ्या वचनात आशा सापडली आहे.
हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत हे मला माहित आहेत, आणि तुझ्या सत्यतेने मला पीडिले आहे.
तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार, आपल्या कराराच्या विश्वसनीयतेने सांत्वन कर.
मला कळवळा दाखव यासाठी की, मी जिवंत राहीन, कारण तुझे नियमशास्त्र माझा आनंद आहे.
गर्विष्ठ लज्जित होवोत, कारण त्यांनी माझी निंदानालस्ती केली आहे; पण मी तुझ्या विधींचे मनन करीन;
तुझा सन्मान करणारे माझ्याकडे वळोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील.
मी लज्जित होऊ नये याकरिता माझे हृदय आदराने, तुझ्या निर्दोष नियमाकडे लागू दे.
मी तुझ्या विजयासाठी उत्कंठा धरतो; मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे.
माझे डोळे तुझे वचन पाहण्यास आसुसले आहेत; तू माझे सांत्वन कधी करशील?
कारण मी धुरात ठेविलेल्या बुधलीसारखा झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही.
तुझ्या सेवकाचे किती वेळ वाट पाहावी लागणार आहे? जे माझा छळ करतात. त्यांचा न्याय तू कधी करशील?
गार्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेविल्या आहेत, तुझे नियमशास्त्र झुगारले आहे.
तुझ्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत; ते लोक माझा छळ अनुचितपणे करत आहेत; मला मदत कर.
त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ सर्वनाश केला; पण मी तुझे विधी नाकारले नाहीत.
तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने वचन दिल्याप्रमाणे मला नवजीवन दे, याकरिता की, मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन.
हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे; तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे.
तुझी सत्यता सदासर्वदा सर्व पिढ्यानपिढ्यासाठी आहे; तू पृथ्वीची स्थापना केलीस आणि म्हणून ती टिकून राहते.
त्या सर्व गोष्टी आजपर्यंत, तुझ्या निर्णयात म्हटल्याप्रमाणे राहिली आहेत, कारण सर्व गोष्टी तुझी सेवा करतात.
जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता, तर माझ्या दुःखात माझा नाश झाला असता.
मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही, कारण त्याद्वारे तू मला सजीव ठेवले आहे.
मी तुझाच आहे; माझा उध्दार कर. कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.
दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे, पण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचा शोध घेईन.
प्रत्येकगोष्टीला त्याची मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझ्या आज्ञा व्यापक, मर्यादे पलीकडे आहेत.
अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत! दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो.
तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात, कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत.
माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे. कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो.
वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते; कारण मी तुझे विधी पाळतो.
तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो. या करता, मी तुझे वचन पाळावे.
मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्याबाजूला वळलो नाही, कारण तू मला शिकविले आहे.
तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत, होय माझ्या मुखाला मधापेक्षा गोड आहेत.
तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते; यास्तव मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो.
तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.
तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, व ती पक्की केली आहे.
मी फार पीडित आहे; हे परमेश्वरा तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला जिवीत ठेव.
हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्वीकार कर, आणि मला तुझे निर्णय शिकव.
माझे जीवन नेहमीच धोक्यात असते, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे, पण मी तुझ्या विधीपासून भरकटलो नाही.
तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो.
तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे.
परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.
मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
वाईट करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर जा, यासाठी की, मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन.
तू आपल्या वचनानुसार मला आधार दे म्हणजे मी जगेन, आणि माझ्या आशा लज्जित होऊ देऊ नकोस.
मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन; मी नेहमीच तुझ्या नियमांवर मनन करीन.
तुझ्या नियमापासून बहकले आहेत त्यांना तू नाकारतोस, कारण हे लोक फसवणारे आणि अविश्वसनीय आहेत.
पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तू गाळाप्रमाणे दूर करतो; म्हणून मी तुझ्या विधीवत करारावर प्रेम करतो.
तुझ्या भितीने माझे शरीर थरथरते, आणि तुझ्या न्याय्य निर्णयाची भिती वाटते.
मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो; माझा छळ करणाऱ्याकडे मला सोडून देऊ नको.
तू आपल्या सेवकाच्या कल्याणार्थ जामीन हो. गर्विष्ठांना मला जाचू देऊ नकोस.
तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतिक्षा करून माझे डोळे थकले आहेत.
तुझ्या सेवकाला कराराची विश्वसनियता दाखव आणि मला तुझे नियम शिकव.
मी तुझा सेवक आहे, मला तुझ्या कराराच्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे.
ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे, कारण लोकांनी तुझे नियमशास्त्र मोडले आहे.
खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.
यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.
तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत; म्हणूनच मी ते पाळतो.
तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने अशिक्षितास ज्ञान प्राप्त होते.
मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या, कारण मी तुझ्या आज्ञेची उत्कंठा धरली.
तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, जशी तुझ्या नावावर प्रीती करणाऱ्यावर तू दया करतोस.
तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर; माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको.
मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर याकरिता की, मी तुझे विधी पाळीन.
तू आपला मुखप्रकाश आपल्या सेवकावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव.
माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात; कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत.
हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, आणि तुझे निर्णय योग्य आहेत.
तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत.
रागाने माझा नाश केला आहे, कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत.
तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे.
मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही.
तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे, आणि नियमशास्त्र सत्य आहे.
मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे.
तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.
मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे, मी तुझे नियम पाळीन.
मी तुला हाक मारतो; तू मला तार आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन.
मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो. तुझ्या वचनात माझी आशा आहे.
तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात.
तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव.
जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत, पण ते तुझ्या नियमशास्रापासून फार दूर आहेत.
हे परमेश्वरा, तू जवळ आहेस आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत.
तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.
माझे दु:ख पाहा आणि मला मदत कर, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर. तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
दुष्टपासून तारण फार दूर आहे, कारण त्यांना तुझे नियम प्रिय नाहीत.
हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे, तू आपल्या निर्णयास अनुसरुन मला नवजीवन दे.
मला छळणारे माझे शत्रू पुष्कळ आहेत, तरी मी तुझ्या कराराच्या निर्बंधापासून मागे वळलो नाही.
विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे. कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत.
तुझ्या विधींना मी किती प्रिय मानितो ते पाहा; हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे कराराच्या विश्वसनीयतेने मला जिवंत ठेव.
तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे; तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे.
अधिपती विनाकारण माझ्या पाठीस लागले आहेत; तुझे वचन न पाळल्यामुळे माझे हृदय भितीने कापते.
ज्याला मोठी लूट सापडली त्याच्यासारखा मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो.
मी असत्याचा द्वेष आणि तिरस्कार करतो, पण मला तुझे नियमशास्त्र प्रिय आहे.
मी दिवसातून सात वेळा तुझ्या न्याय्य, निर्णयांसाठी तुझी स्तुती करतो.
तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यास मोठी शांती असते, त्यास कसलेच अडखळण नसते.
हे परमेश्वरा, मी तुझ्या उध्दाराची वाट पाहत आहे आणि तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत.
मी तुझ्या विधीवत आज्ञांप्रमाणे वागलो, आणि मला ते अत्यंत प्रिय आहेत.
मी तुझे निर्बंध आणि तुझे विधीवत आज्ञा पाळल्या आहेत, कारण मी जी प्रत्येकगोष्ट केली ते सर्व तुला माहित आहे.
हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची आरोळी ऐक. तू आपल्या वचनाप्रमाणे मला बुद्धी दे.
माझी विनंती तुझ्यासमोर येवो; तू वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर.
तू मला आपले नियम शिकवितोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो.
माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत.
तुझा हात माझे साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण तुझे निर्बंध मी निवडले आहेत.
हे परमेश्वरा, मी तुझ्या तारणाची उत्कंठा धरली आहे आणि तुझ्या नियमशास्त्रत मला आनंद आहे.
माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला मदत करो.
मी हरवलेल्या मेंढराप्रमाणे भरकटलो आहे; तू आपल्या सेवकाचा शोध कर, कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.
स्तोत्र 118 (IX)
माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, आणि त्याने मला उत्तर दिले.
हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.
हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार?
तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.
मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.
शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे.
मी शांतीप्रिय मनुष्य आहे, पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात.
स्तोत्र 118 (X)
मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कोठून येईल?
परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते.
तो तुझा पाय घसरू देत नाही; जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही.
पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही.
परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे.
दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही.
परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.
परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील, त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.
स्तोत्र 118 (XI)
आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.
हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.
कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.
यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.
तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.
माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.
परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.
स्तोत्र 118 (XII)
स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या, तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो.
पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात.
हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत.
सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा, आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.
स्तोत्र 118 (XIII)
आता इस्राएलाने म्हणावे, जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता,
जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले, तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते,
जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला, त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते.
जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते; प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते.
मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते.
परमेश्वराचा धन्यवाद होवो, त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही.
पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.
पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते.
स्तोत्र 118 (XIV)
जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात; ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत.
यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती आता आणि सर्वकाळ आहे.
नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही. नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील.
हे परमेश्वरा, जे चांगले आहेत, आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर.
पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात, परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल. इस्राएलांवर शांती असो.
स्तोत्र 118 (XV)
सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले, तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले.
मग आमचे मुख हास्याने, आणि आमची जीभ गायनाने भरली. नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले; परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत.
परमेश्वराने आमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत; आम्ही किती हर्षित झालो आहोत!
परमेश्वरा, नेगेब येथील प्रवाहाप्रमाणे आम्हास बंदिवासातून परत आण.
जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील.
जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल.
स्तोत्र 118 (XVI)
परमेश्वर जर घर बांधीत नाही, तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे. जर परमेश्वर नगर रक्षित नाही, तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे.
तुम्ही पहाटे लवकर उठता, रात्री उशीराने घरी येता, किंवा कठोर परिश्रम करून भाकर खाता हे सर्व व्यर्थ आहे कारण परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो.
पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे, आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे.
तरुणपणाची मुले हे वीराच्या हातातील बाणांसारखी आहेत.
ज्या मनुष्याचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता, ते फजीत होणार नाहीत.
स्तोत्र 118 (XVII)
जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे.
तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील; तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल.
तुझी पत्नी तुझ्या घरात फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या जैतूनाच्या रोपांसारखी होतील.
होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो, तो असा आशीर्वादित होईल.
परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो; तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेची उन्नती तुझ्या दृष्टीस पडो.
तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्राएलावर शांती असो.
स्तोत्र १२७
धन्य आहेत सर्व जे प्रभुची भीती बाळगतात, जे त्याच्या मार्गांनी चालतात. तू तुझ्या हातांच्या परिश्रमाचे फळ खाशील; तू धन्य होशील आणि तुझे भले होईल. तुझी पत्नी तुझ्या गृहाच्या कडेवर फलद्रूप द्राक्षवेलीप्रमाणे असेल; तुझे पुत्र तुझ्या मेजाभोवती लावलेल्या तरुण ऑलिव्हच्या रोपांसारखे असतील. पाहा, प्रभुची भीती बाळगणाऱ्या मनुष्याला असे आशीर्वाद मिळतात. प्रभु तुला सियोनहून आशीर्वाद देवो; आणि तू आयुष्याच्या सर्व दिवसांत यरुशलेमचे कल्याण पाहो; आणि तुझे नातवंडे पाहो. इस्राएलवर शांती असो. अल्लेलूया.
स्तोत्र १२८
बाल्यापासून त्यांनी मला अनेक वेळा छळले — इस्राएल म्हणो — बाल्यापासून त्यांनी मला अनेक वेळा छळले; तरी त्यांनी माझ्यावर मात केली नाही. पाप्यांनी माझ्या पाठीवर नांगर चालविला आणि आपल्या रेषा लांब केल्या. प्रभु न्यायी आहे — तो पाप्यांच्या जूचा कण कापतो. सियोनाला द्वेष करणारे सर्व लज्जित होवोत आणि उलटे फिरोत. ते छपरावरील गवतासारखे होवोत — जे उचलण्यापूर्वीच कोमेजून जातो; ज्याच्यापासून कापणाऱ्याने आपला हात भरत नाही, किंवा गरबा बांधणाऱ्याने आपला कुशीत भर घेत नाही; आणि जे जात आहेत ते असे म्हणत नाहीत: प्रभुचे आशीर्वाद तुमच्यावर असोत; आम्ही तुम्हांला प्रभुच्या नावाने आशीर्वाद देतो. अल्लेलूया.
(लूक 7:36-50) मग फरीशींपैकी एकाने त्याला आपल्या घरी जेवावयास आमंत्रित केले. तो फरीशीच्या घरी शिरला व टेबलाजवळ टेकला. आणि पाहा, शहरातील एक स्त्री, जी पापी होती; तिला कळले की तो फरीशीच्या घरी टेबलावर आहे; तिने संगमरवरी सुभाषित असलेली कुपी घेतली, आणि त्याच्या मागे, त्याच्या पायांजवळ उभी राहून रडू लागली; आणि आपल्या अश्रूंनी त्याचे पाय ओली करून आपल्या केसांनी त्यांना पुसू लागली; आणि त्याचे पाय चुंबन करू लागली व सुभाषिताने त्यांना अभिषेक करू लागली. ज्याने त्याला आमंत्रित केले त्या फरीश्याने हे पाहिले, तो मनात म्हणाला, हा मनुष्य संदेष्टा असता तर त्याला ठाऊक झाले असते की जी स्त्री त्याला स्पर्श करते ती कोण आहे आणि कशी आहे — ती पापी आहे. येशूने त्याला म्हणाला, शिमोन, माझ्याकडे तुझ्याकरिता काही बोलणे आहे. तो म्हणाला, गुरो, सांग. तो म्हणाला, एका सावकाराकडे दोन देणेकर होते — एकाकडे पाचशे दीनार आणि दुसऱ्याकडे पन्नास; आणि त्यांच्याकडे फेडण्यास काही नसल्यामुळे त्याने दोघांना माफ केले. त्यांपैकी कोण त्याच्यावर अधिक प्रेम करेल? शिमोन म्हणाला, मला वाटते — ज्याला त्याने अधिक माफ केले. येशूने त्याला म्हटले, तू बरोबर न्याय केला आहेस. मग त्या स्त्रीकडे वळून तो शिमोनाला म्हणाला, तू या स्त्रीला पाहतोस का? मी तुझ्या घरी आलो; माझ्या पायांसाठी तू पाणी दिले नाही; पण हिने अश्रूंनी माझे पाय धुतले आणि आपल्या केसांनी पुसले. तू मला चुंबन दिले नाही; पण मी तुझ्या घरी शिरल्यापासून हिने माझे पाय चुंबन करणे सोडले नाही. तू माझ्या मस्तकावर तेल लावले नाही; पण हिने माझ्या पायांवर सुभाषित लावले. म्हणून मी तुला सांगतो, हिची बरीच पापे माफ झाली आहेत — कारण तिने फार प्रेम केले; पण ज्याला थोडे माफ होते तो थोडे प्रेम करतो. मग त्याने त्या स्त्रीला सांगितले, तुझी पापे माफ झाली. तेथील जे टेकले होते त्यांनी आपापसांत म्हणण्यास सुरुवात केली, हा कोण आहे की पापेही माफ करतो? पण त्याने त्या स्त्रीला सांगितले, तुझ्या विश्वासाने तुला तारले — शांति घेऊन जा. (आणि सर्वदा देवाला गौरव असो.)
विभाग
हे प्रभु, मला विपुल अश्रूंचे झरे दे; जसे तू पूर्वीच्या पापी स्त्रीला दिलेस. आणि मला पात्र कर की मी तुझे ते पाय ओले करू — ज्यांनी मला भ्रमाच्या मार्गापासून मुक्त केले; आणि मी तुला अतिशय सुगंधीत अर्पण अर्पण करीन; आणि मी पश्चात्तापाने शुद्ध जीवन प्राप्त करीन; की मी तो आनंदाने भरलेला आवाज ऐकू: तुझ्या विश्वासाने तुला तारले. (दोक्सा पत्री कै इयो कै आगियो प्नेव्माती Δόξα Πατρί καὶ Υἱῷ καὶ Ἁγίῳ Πνεύματι - पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास गौरव असो).
जेव्हा मी माझ्या वाईट कृत्यांची विपुलता जाणतो, आणि त्या भयंकर न्यायाचा विचार माझ्या हृदयात येतो, तेव्हा मला थरकाप होतो; मग मी तुझ्याकडे पळतो, हे देव, मानवजातीवर प्रेम करणाऱ्या. माझ्याकडून तुझे मुखकमल लपवू नकोस; मी तुझ्याकडे आर्त विनवणी करतो; तूच पापरहित आहेस. शेवट येण्यापूर्वी माझ्या दीन आत्म्यास नम्रता प्रदान कर, आणि मला तार. (के नून, के आएई, के इस्तूस एओनास तोन एओनोन आमीन Καὶ νῦν καὶ ἀεὶ καὶ εἰς τοὺς αἰῶνας τῶν αἰώνων. Ἀμήν - आता आणि सदैव आणि सर्व युगांच्या युगांपर्यंत, आमेन).
हे अनुग्रहाने परिपूर्ण, कुमारी व वधूविरहित — स्वर्ग तुला धन्य म्हणतो. आणि आम्हीही तुझ्या अगोचर जन्माचे गौरव करतो. हे देवाची माता, करुणे व तारणाची आई, आमच्या आत्म्यांच्या तारणाकरिता मध्यस्थी कर. (के नून, के आएई, के इस्तूस एओनास तोन एओनोन आमीन Καὶ νῦν καὶ ἀεὶ καὶ εἰς τοὺς αἰῶνας τῶν αἰώνων. Ἀμήν - आता आणि सदैव आणि सर्व युगांच्या युगांपर्यंत, आमेन).
हे स्वर्गीय राजा, सांत्वनकर्ता, सत्याचा आत्मा; जो सर्वत्र उपस्थित आहे आणि सर्व काहीने परिपूर्ण आहे; चांगुलपणाचा खजिना आणि जीवनदाता — ये, कृपया, आमच्यात वास कर; आणि हे चांगल्या, आम्हांला सर्व अशुद्धतेपासून शुद्ध कर, आणि आमच्या आत्म्यांचे उध्दार कर. (दोक्सा पत्री कै इयो कै आगियो प्नेव्माती Δόξα Πατρί καὶ Υἱῷ καὶ Ἁγίῳ Πνεύματι - पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास गौरव असो).
जसा तू तुझ्या शिष्यांसोबत होतास, हे तारणहारा, आणि त्यांना शांती दिलीस, तसेच आमच्यासोबतही रहा; आम्हांला तुझी शांती दे, आम्हांला वाचव, आणि आमच्या आत्म्यांचे उध्दार कर. (के नून, के आएई, के इस्तूस एओनास तोन एओनोन आमीन Καὶ νῦν καὶ ἀεὶ καὶ εἰς τοὺς αἰῶνας τῶν αἰώνων. Ἀμήν - आता आणि सदैव आणि सर्व युगांच्या युगांपर्यंत, आमेन).
जेव्हा आम्ही तुझ्या पवित्र मंदिरात उभे राहतो, तेव्हा आम्हांस स्वर्गात उभे असल्यासारखे मानले जाते. हे देवाची माता, तू स्वर्गाचा दरवाजा आहेस; आमच्यासाठी दयेचा दरवाजा उघड.
Κύριε ἐλέησον क्यिरिये एलेइसोन (प्रभु, दया कर) 41 वेळा
त्रिसागिऑन
पवित्र देव, पवित्र सामर्थ्यवान, पवित्र अमर — जो कुमारीतून जन्मला — आमच्यावर दया कर. पवित्र देव, पवित्र सामर्थ्यवान, पवित्र अमर — जो आमच्यासाठी क्रूसावर खिळला — आमच्यावर दया कर. पवित्र देव, पवित्र सामर्थ्यवान, पवित्र अमर — जो मृतांतून उठला आणि स्वर्गात आरोहण केले — आमच्यावर दया कर. पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास गौरव असो, आता आणि सदैव आणि सर्व युगांच्या युगांपर्यंत. आमेन. हे पवित्र त्रित्व, आमच्यावर दया कर. हे पवित्र त्रित्व, आमच्यावर दया कर. हे पवित्र त्रित्व, आमच्यावर दया कर.
हे प्रभु, आमची पापे क्षमा कर. हे प्रभु, आमचे अपराध क्षमा कर. हे प्रभु, आमचे अपराधी पाऊल घसरणे क्षमा कर. हे प्रभु, तुझ्या पवित्र नावाकरता तुझ्या लोकातील आजारी यांना भेट — त्यांना आरोग्य दे. आमचे पितर आणि भाऊ जे निद्रिस्त झाले, हे प्रभु, त्यांच्या आत्म्यांना विश्रांती दे. हे जो पापरहित आहेस, प्रभु, आमच्यावर दया कर. हे पापरहित, प्रभु, आम्हांला सहाय्य कर; आणि आमच्या विनंत्या तुझ्याकडे स्वीकार; कारण तुझ्याकडेच गौरव, मान, आणि त्रिगुण पवित्रता आहे. प्रभु, दया कर. प्रभु, दया कर. प्रभु, आशीर्वाद दे. आमेन.
आणि आम्हांला पात्र कर की आम्ही कृतज्ञतापूर्वक म्हणू: आमच्या स्वर्गस्थ पित्या....
आम्ही तुझी उपासना करतो, हे ख्रिस्ता, तुझ्या हितकर पित्याबरोबर व पवित्र आत्म्यासोबत; कारण तू आला आहेस व आम्हाला तारले आहेस
इस्राएलाने आता म्हणावे की, माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे.
त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, तरी ते मला पराजित करू शकले नाहीत.
नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; त्यांनी आपली तासे लांब केली.
परमेश्वर न्यायी आहे; त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत.
जे सियोनेचा तिरस्कार करतात, ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत.
ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत.
त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.
त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.”
तेव्हा उपासक प्रार्थना करतो:
हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.
हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत.
हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?
पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.
मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.
पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. कारण परमेश्वर दयाळू आहे, आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे.
तोच इस्राएलास त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करीन.
पवित्र, पवित्र, पवित्र
हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही. मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही, किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही.
खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे; जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते; तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे.
हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ तू परमेश्वरावर आशा ठेव.
प्रत्येक प्रहराचा समारोप
हे परमेश्वरा, दावीदाकरता त्याच्या सर्व दुःखांची आठवण कर.
त्याने परमेश्वराकडे कशी शपथ वाहिली, त्याने याकोबाच्या समर्थ प्रभूला कसा नवस केला, याची आठवण कर.
तो म्हणाला “मी आपल्या घरात किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही.
मी आपल्या डोळ्यांवर झोप किंवा आपल्या पापण्यास विसावा देणार नाही.
परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या सर्वसमर्थ देवासाठी निवासमंडप सापडेपर्यंत मी असेच करीन.”
पाहा, आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले; आम्हास तो जारच्या रानात सापडला.
आम्ही देवाच्या निवासमंडपात जाऊ; आम्ही त्याच्या पदासनापाशी आराधना करू आणि म्हणू.
हे परमेश्वरा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रांतीस्थानी ये,
तुझे याजक नितीमत्तेचे वस्रे पांघरोत; तुझे विश्वासू आनंदाने जयघोष करोत.
तुझा सेवक दावीदाकरिता, तू आपल्या अभिषिक्त राजापासून निघून जाऊ नकोस.
परमेश्वराने विश्वसनीय दावीदाजवळ शपथ वाहिली आहे; तो त्याच्या शपथेपासून माघार घेणार नाही, मी तुझ्या वंशातून तुझ्या राजासनावर एकाला बसवीन.
जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला, आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले, तर त्यांची मुलेसुद्धा तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील.
खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे; त्याच्या वस्तीसाठी त्याने इच्छा धरली आहे.
“ही जागा सर्वकाळ माझ्या विसाव्याची आहे; मी येथे राहीन, कारण माझी इच्छा आहे.
मी तिला विपुलतेने अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन; मी तिच्या गरीबांना भाकरीने तृप्त करीन.
मी तिच्या याजकांना तारणाचे वस्त्र नेसवीन; तिचे भक्त आनंदाने मोठ्याने जयघोष करतील.
तेथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल असे मी करीन; तेथे मी आपल्या अभिषिक्तासाठी दिवा ठेविला आहे.
मी त्याच्या शत्रूंला लाजेचे वस्रे नेसवीन, परंतु त्याचा मुकुट चमकेल.”
दुसरा पहारा
पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे.
ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे, त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमूल्य तेलासारखे आहे.
सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.
स्तोत्र 119
ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते आशीर्वादित आहेत.
जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात, जे संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात ते आशीर्वादित आहेत.
ते चुकीचे करीत नाहीत; ते त्याच्या मार्गात चालतात.
तुझे विधी आम्ही काळजीपूर्वक पाळावे म्हणून तू आम्हास आज्ञा दिल्या आहेत.
मी नेहमी तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे.
मी जेव्हा तुझ्या सर्व आज्ञांचा विचार करीन तेव्हा मी कधीही लाजणार नाही.
मी जेव्हा तुझे न्याय्य निर्णय शिकेन, तेव्हा मी मनःपूर्वक तुला धन्यवाद देईन.
मी तुझे नियम पाळीन; मला एकट्याला सोडू नकोस.
तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील? तुझ्या वचनाचे पालन करण्याने.
मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.
मी तुझ्याविरुध्द पाप करू नये म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे.
हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; मला तुझे नियम शिकव.
मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडचे सर्व योग्य निर्णय जे तू प्रकट केले ते जाहीर करीन.
तुझ्या आज्ञेच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व धनसंपत्ती असे मानून मी त्यामध्ये अत्यानंद करतो.
मी तुझ्या नियमांचे मनन करीन, आणि तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन.
मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही.
आपल्या सेवकावर दया कर याकरिता की; मी जिवंत रहावे, आणि तुझे वचन पाळावे.
माझे डोळे उघड म्हणजे तुझ्या नियमशास्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
मी या देशात परका आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपवू नकोस.
तुझ्या योग्य निर्णयांची सतत उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव चिरडून गेला आहे.
तू गर्विष्ठांना रागावतोस, तुझ्या आज्ञापासून भरकटतात ते शापित आहेत.
माझ्यापासून लाज आणि मानहानी दूर कर, कारण मी तुझ्या कराराची आज्ञा पाळली आहे.
अधिपतीही माझ्याविरूद्ध कट रचतात आणि निंदा करतात, तुझा सेवक तुझ्या नियमांचे मनन करतो.
तुझ्या कराराची आज्ञा मला आनंददायी आहे, आणि ते माझे सल्लागार आहेत.
माझा जीव धुळीस चिकटून आहे; आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
मी तुला आपले मार्ग सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस; तू मला आपले नियम शिकव.
मला तुझ्या विधींचा मार्ग समजावून दे. यासाठी की, मी तुझ्या आश्चर्यकारक शिक्षणाचे मनन करावे.
माझा जीव दुःखाने गळून जातो; आपल्या वचनाने मला उचलून धर.
असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; कृपाकरून तुझे नियमशास्त्र मला शिकीव.
मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे; मी तुझे योग्य निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत.
मी तुझ्या कराराच्या निर्बंधास चिकटून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस.
मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन, कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारित करतोस.
हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन.
मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन.
तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे.
माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे, आणि अन्याय्य लाभापासून दूर कर.
निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. मला तुझ्या मार्गात पुर्नजीवीत कर.
तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन, आपल्या सेवकासंबंधाने खरे कर.
ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत.
पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे.
हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो.
जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल, कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे.
तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको, कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो.
मी सदैव तुझे नियमशास्त्र, सदासर्वकाळ आणि कायम पाळीन.
मी सुरक्षितपणे चालेन, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.
मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन, आणि मी लज्जित होणार नाही.
मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन, ज्या मला अतिशय प्रिय आहेत.
ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन; मी तुझ्या नियमांचे मनन करीन.
तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. कारण तू मला आशा दिली आहेस.
माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते;
गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे, तरी मी तुझ्या नियमशास्रापासून भरकटलो नाही.
हे परमेश्वरा, प्राचीन काळच्या तुझ्या निर्णयाविषयी मी विचार करतो, आणि मी आपले समाधान करतो.
दुष्ट तुझे नियमशास्त्र नाकारतात, म्हणून संताप माझा ताबा घेतो.
ज्या घरात मी तात्पुरता राहतो; तुझे नियम मला माझे गीत झाले आहेत.
हे परमेश्वरा, रात्रीत मी तुझ्या नावाची आठवण करतो, आणि मी तुझे नियमशास्त्र पाळतो.
हे मी आचरिले आहे, कारण मी तुझे विधी पाळले आहेत.
परमेश्वर माझा वाटा आहे; तुझे वचन पाळण्याचा मी निश्चय केला आहे.
मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझ्या अनुग्रहासाठी कळकळीची विनंती करतो; तुझ्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर;
मी आपल्या मार्गाचे परीक्षण केले, आणि तुझ्या कराराकडे आपले पावली वळवीली.
मी तुझ्या आज्ञा पाळण्याची घाई केली, आणि मी उशीर केला नाही.
दुष्टाच्या दोऱ्यांनी मला जाळ्यात पकडले आहे; तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
मी मध्यरात्री तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.
तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, तुझे विधी पाळणाऱ्यांचा, मी साथीदार आहे.
हे परमेश्वरा, तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने सर्व पृथ्वी भरली आहे. तू आपले नियम मला शिकव.
हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे, आपल्या सेवकाचे चांगले केले आहेस.
योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान आणि बुद्धी तू मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझा विश्वास आहे.
पीडित होण्यापूर्वी मी बहकलो होतो, परंतु आता मी तुझे वचन पाळीत आहे.
तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस. मला तुझे नियम शिकव.
गर्विष्ठांनी माझ्यावर लबाडीने चिखलफेक केली आहे, पण मी तुझे विधी अगदी मनापासून पाळीन.
त्यांचे हृदय कठीण झाले आहे, पण मला तुझ्या नियमशास्त्रात आनंद आहे.
मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले; त्यामुळे, मी तुझे नियमशास्त्र शिकलो.
सोने आणि रुपे ह्यांच्या हजारो तुकड्यापेक्षा, मला तुझ्या तोंडचे नियमशास्त्र अधिक मोलवान आहेत.
तुझ्या हातांनी मला निर्माण केले आणि आकार दिला; मला बुद्धी दे म्हणजे मी तुझ्या आज्ञा शिकेन.
तुझा सन्मान करणारे मला पाहून हर्ष करतील, कारण मला तुझ्या वचनात आशा सापडली आहे.
हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत हे मला माहित आहेत, आणि तुझ्या सत्यतेने मला पीडिले आहे.
तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार, आपल्या कराराच्या विश्वसनीयतेने सांत्वन कर.
मला कळवळा दाखव यासाठी की, मी जिवंत राहीन, कारण तुझे नियमशास्त्र माझा आनंद आहे.
गर्विष्ठ लज्जित होवोत, कारण त्यांनी माझी निंदानालस्ती केली आहे; पण मी तुझ्या विधींचे मनन करीन;
तुझा सन्मान करणारे माझ्याकडे वळोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील.
मी लज्जित होऊ नये याकरिता माझे हृदय आदराने, तुझ्या निर्दोष नियमाकडे लागू दे.
मी तुझ्या विजयासाठी उत्कंठा धरतो; मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे.
माझे डोळे तुझे वचन पाहण्यास आसुसले आहेत; तू माझे सांत्वन कधी करशील?
कारण मी धुरात ठेविलेल्या बुधलीसारखा झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही.
तुझ्या सेवकाचे किती वेळ वाट पाहावी लागणार आहे? जे माझा छळ करतात. त्यांचा न्याय तू कधी करशील?
गार्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेविल्या आहेत, तुझे नियमशास्त्र झुगारले आहे.
तुझ्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत; ते लोक माझा छळ अनुचितपणे करत आहेत; मला मदत कर.
त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ सर्वनाश केला; पण मी तुझे विधी नाकारले नाहीत.
तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने वचन दिल्याप्रमाणे मला नवजीवन दे, याकरिता की, मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन.
हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे; तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे.
तुझी सत्यता सदासर्वदा सर्व पिढ्यानपिढ्यासाठी आहे; तू पृथ्वीची स्थापना केलीस आणि म्हणून ती टिकून राहते.
त्या सर्व गोष्टी आजपर्यंत, तुझ्या निर्णयात म्हटल्याप्रमाणे राहिली आहेत, कारण सर्व गोष्टी तुझी सेवा करतात.
जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता, तर माझ्या दुःखात माझा नाश झाला असता.
मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही, कारण त्याद्वारे तू मला सजीव ठेवले आहे.
मी तुझाच आहे; माझा उध्दार कर. कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.
दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे, पण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचा शोध घेईन.
प्रत्येकगोष्टीला त्याची मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझ्या आज्ञा व्यापक, मर्यादे पलीकडे आहेत.
अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत! दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो.
तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात, कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत.
माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे. कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो.
वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते; कारण मी तुझे विधी पाळतो.
तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो. या करता, मी तुझे वचन पाळावे.
मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्याबाजूला वळलो नाही, कारण तू मला शिकविले आहे.
तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत, होय माझ्या मुखाला मधापेक्षा गोड आहेत.
तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते; यास्तव मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो.
तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.
तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, व ती पक्की केली आहे.
मी फार पीडित आहे; हे परमेश्वरा तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला जिवीत ठेव.
हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्वीकार कर, आणि मला तुझे निर्णय शिकव.
माझे जीवन नेहमीच धोक्यात असते, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे, पण मी तुझ्या विधीपासून भरकटलो नाही.
तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो.
तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे.
परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.
मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
वाईट करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर जा, यासाठी की, मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन.
तू आपल्या वचनानुसार मला आधार दे म्हणजे मी जगेन, आणि माझ्या आशा लज्जित होऊ देऊ नकोस.
मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन; मी नेहमीच तुझ्या नियमांवर मनन करीन.
तुझ्या नियमापासून बहकले आहेत त्यांना तू नाकारतोस, कारण हे लोक फसवणारे आणि अविश्वसनीय आहेत.
पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तू गाळाप्रमाणे दूर करतो; म्हणून मी तुझ्या विधीवत करारावर प्रेम करतो.
तुझ्या भितीने माझे शरीर थरथरते, आणि तुझ्या न्याय्य निर्णयाची भिती वाटते.
मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो; माझा छळ करणाऱ्याकडे मला सोडून देऊ नको.
तू आपल्या सेवकाच्या कल्याणार्थ जामीन हो. गर्विष्ठांना मला जाचू देऊ नकोस.
तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतिक्षा करून माझे डोळे थकले आहेत.
तुझ्या सेवकाला कराराची विश्वसनियता दाखव आणि मला तुझे नियम शिकव.
मी तुझा सेवक आहे, मला तुझ्या कराराच्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे.
ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे, कारण लोकांनी तुझे नियमशास्त्र मोडले आहे.
खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.
यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.
तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत; म्हणूनच मी ते पाळतो.
तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने अशिक्षितास ज्ञान प्राप्त होते.
मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या, कारण मी तुझ्या आज्ञेची उत्कंठा धरली.
तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, जशी तुझ्या नावावर प्रीती करणाऱ्यावर तू दया करतोस.
तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर; माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको.
मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर याकरिता की, मी तुझे विधी पाळीन.
तू आपला मुखप्रकाश आपल्या सेवकावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव.
माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात; कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत.
हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, आणि तुझे निर्णय योग्य आहेत.
तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत.
रागाने माझा नाश केला आहे, कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत.
तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे.
मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही.
तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे, आणि नियमशास्त्र सत्य आहे.
मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे.
तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.
मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे, मी तुझे नियम पाळीन.
मी तुला हाक मारतो; तू मला तार आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन.
मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो. तुझ्या वचनात माझी आशा आहे.
तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात.
तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव.
जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत, पण ते तुझ्या नियमशास्रापासून फार दूर आहेत.
हे परमेश्वरा, तू जवळ आहेस आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत.
तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.
माझे दु:ख पाहा आणि मला मदत कर, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर. तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
दुष्टपासून तारण फार दूर आहे, कारण त्यांना तुझे नियम प्रिय नाहीत.
हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे, तू आपल्या निर्णयास अनुसरुन मला नवजीवन दे.
मला छळणारे माझे शत्रू पुष्कळ आहेत, तरी मी तुझ्या कराराच्या निर्बंधापासून मागे वळलो नाही.
विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे. कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत.
तुझ्या विधींना मी किती प्रिय मानितो ते पाहा; हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे कराराच्या विश्वसनीयतेने मला जिवंत ठेव.
तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे; तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे.
अधिपती विनाकारण माझ्या पाठीस लागले आहेत; तुझे वचन न पाळल्यामुळे माझे हृदय भितीने कापते.
ज्याला मोठी लूट सापडली त्याच्यासारखा मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो.
मी असत्याचा द्वेष आणि तिरस्कार करतो, पण मला तुझे नियमशास्त्र प्रिय आहे.
मी दिवसातून सात वेळा तुझ्या न्याय्य, निर्णयांसाठी तुझी स्तुती करतो.
तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यास मोठी शांती असते, त्यास कसलेच अडखळण नसते.
हे परमेश्वरा, मी तुझ्या उध्दाराची वाट पाहत आहे आणि तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत.
मी तुझ्या विधीवत आज्ञांप्रमाणे वागलो, आणि मला ते अत्यंत प्रिय आहेत.
मी तुझे निर्बंध आणि तुझे विधीवत आज्ञा पाळल्या आहेत, कारण मी जी प्रत्येकगोष्ट केली ते सर्व तुला माहित आहे.
हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची आरोळी ऐक. तू आपल्या वचनाप्रमाणे मला बुद्धी दे.
माझी विनंती तुझ्यासमोर येवो; तू वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर.
तू मला आपले नियम शिकवितोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो.
माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत.
तुझा हात माझे साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण तुझे निर्बंध मी निवडले आहेत.
हे परमेश्वरा, मी तुझ्या तारणाची उत्कंठा धरली आहे आणि तुझ्या नियमशास्त्रत मला आनंद आहे.
माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला मदत करो.
मी हरवलेल्या मेंढराप्रमाणे भरकटलो आहे; तू आपल्या सेवकाचा शोध कर, कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.
स्तोत्र 120
माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, आणि त्याने मला उत्तर दिले.
हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.
हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार?
तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.
मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.
शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे.
मी शांतीप्रिय मनुष्य आहे, पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात.
स्तोत्र 121
मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कोठून येईल?
परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते.
तो तुझा पाय घसरू देत नाही; जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही.
पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही.
परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे.
दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही.
परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.
परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील, त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.
स्तोत्र 122
आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.
हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.
कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.
यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.
तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.
माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.
परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.
स्तोत्र 123
स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या, तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो.
पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात.
हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत.
सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा, आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.
स्तोत्र 124
आता इस्राएलाने म्हणावे, जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता,
जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले, तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते,
जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला, त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते.
जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते; प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते.
मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते.
परमेश्वराचा धन्यवाद होवो, त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही.
पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.
पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते.
स्तोत्र 125
परमेश्वराची स्तुती करा, कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे; ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे.
परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो; तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो.
तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो.
तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो.
आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही.
परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो.
गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा. वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा.
तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, तो डोंगरावर गवत उगवतो.
तो प्राण्यांना आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो.
घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही.
जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो.
हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर; हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर.
कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत.
तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो.
तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो.
तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; तो राखेसारखे दवाचे कण विखरतो.
तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल?
तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते.
त्याने याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले.
त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही; आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा.
(10) स्तोत्र १४५
हे माझ्या आत्म्या, प्रभुची स्तुति कर. मी माझ्या आयुष्यात प्रभुचे स्तवन करीन; मी जिवंत असताना माझ्या देवाला गायन करीन. अधिपतींवर, मनुष्यांच्या पुत्रांवर — ज्यांच्यात तारण नाही — भरोसा ठेवू नका. त्यांचा श्वास निघून जातो, ते त्यांच्या मातीत परततात; त्या दिवशी त्यांचे सर्व विचार नष्ट होतात.
धन्य तो, ज्याचा सहाय्यक याकोबचा देव आहे; ज्याची आशा प्रभु त्याच्या देवावर आहे — ज्याने स्वर्ग, पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व काही निर्माण केले; जो न्याय सदैव राखतो; तो अन्यायींना न्याय देतो; तो उपाशी-पिडीतांना भाकरी देतो. प्रभु कैद्यांना मुक्त करतो; प्रभु वाकलेल्यांना उभे करतो; प्रभु अंधांना उजेड देतो; प्रभु धर्मींवर प्रेम करतो; प्रभु परदेशियांना राखतो; तो अनाथ व विधवेला आधार देतो; आणि दुष्टांचा मार्ग नाश करतो. प्रभु सदैव राज्य करतो; हे सियोन, तुझा देव पिढ्यानपिढ्या — अल्लेलूया.
(11) स्तोत्र १४६
प्रभुची स्तुति करा — कारण स्तोत्र चांगले आहे; आणि आपल्या देवाला स्तुति करणे मधुर आहे. प्रभु यरुशलेम बांधतो; तो इस्राएलच्या विखुरलेल्या लोकांना गोळा करतो. तो तुटलेल्या अंत:करणांना बरे करतो; आणि त्यांच्या जखमा बांधतो. तो असंख्य तारकांची संख्या मोजतो, आणि त्या सर्वांना नावे देतो. आमचा प्रभु महान आहे, त्याची शक्ती महान आहे; त्याची समज असीम आहे. प्रभु नम्रांना उंचावतो; आणि पाप्यांना जमिनीवर ढाकतो.
प्रभुला कृतज्ञतेने प्रारंभ करा; आपल्या देवाला वीणेवर स्तुति करा. जो आकाशाला ढगांनी झाकतो; जो पृथ्वीकरता पाऊस तयार करतो; जो पर्वतांवर गवत उगवतो; आणि मनुष्यांच्या सेवेसाठी हिरवाई देतो; जो जनावरांना त्यांचे भक्ष्य देतो; आणि जे कावळ्याची पिल्ले हाक मारतात त्यांनाही. तो घोड्याच्या शक्तीत आनंद मानत नाही; ना मनुष्याच्या पायांत आनंद मानतो; पण प्रभु त्याला आनंद मानतो — जे त्याची भीती बाळगतात आणि त्याच्या दयेची आशा धरतात — अल्लेलूया.
(12) स्तोत्र १४७
हे यरुशलेमा, प्रभुची स्तुति कर; हे सियोना, तुझ्या देवाची स्तुति कर. कारण त्याने तुझ्या दरवाज्यांच्या कड्यांना बलवान केले; आणि तुझ्या मध्येल्या मुलांना आशीर्वाद दिला. त्याने तुझ्या सीमा शांततेत केल्या; आणि तुला उत्तम गव्हाने तृप्त केले. तो आपले वचन पृथ्वीवर पाठवितो; त्याचे वचन अतिशय शीघ्रतेने धावते. तो बर्फाला लोकरीसारखे देतो; धुक्याला कराच्या राखेसारखे उधळतो; आणि त्याचा बर्फ किरमिजी तुकड्यांप्रमाणे टाकतो — त्याच्या गारठ्यापुढे कोण उभा राहील? तो आपले वचन पाठवितो आणि त्यांना वितळवितो; त्याचा वारा वाहतो आणि पाण्यांचे प्रवाह होतात. तो आपले वचन याकोबाला प्रगट करतो; आपले नियम व न्याय इस्राएलला. त्याने असे सर्व राष्ट्रांशी केले नाही; आणि त्याच्या न्यायांना त्यांनी जाणले नाही — अल्लेलूया.
(लूक 12:32-46) घाबरू नकोस, लहान कळप; कारण तुझ्या पित्याला राज्य तुम्हांला द्यावयास आवडले आहे. तुमची मालमत्ता विकून दान द्या; न म्लान होणाऱ्या पिशव्या करून घ्या; आणि स्वर्गात न नाश होणारा खजिना; जिथे चोर जवळ येत नाही आणि किडा नाश करत नाही. कारण जिथे तुमचा खजिना आहे — तिथेच तुमचे हृदयही असेल. तुमची कमरे कंबरपट्ट्याने बांधलेली असू दे, आणि तुमच्या दिवट्या पेटलेल्या असू देत; आणि तुम्ही त्या लोकांसारखे राहा — जे आपल्या स्वामीची वाट पाहतात — तो लग्नावरून परत येईल; आणि तो आला व दार ठोठाविले — मग लगेच त्याच्यासाठी उघडतील. ते दास धन्य आहेत — ज्यांना त्यांचा स्वामी येऊन जागता आढळतो; खरेंच, मी तुम्हांस सांगतो — तो कंबरपट्टा बांधेल, त्यांना टेबलावर बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. आणि तो दुसऱ्या पहाऱ्यात किंवा तिसऱ्या पहाऱ्यात आला — आणि त्यांना असे करताना सापडले — ते दास धन्य आहेत. पण हे जाणून ठेवा, की घरचा स्वामी जर जाणत असता की चोर कोणत्या वेळी येईल — तर तो जागता बसला असता, आणि त्याचे घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही तयार असा; कारण ज्या वेळी तुम्ही वाट पाहत नाही त्या वेळी मनुष्यपुत्र येईल.
मग पेत्र म्हणाला, प्रभु, हे रूपक आमच्यासाठी आहे की सर्वांसाठी? प्रभु म्हणाला, मग तो कोण आहे — तो विश्वासू व शहाणा व्यवस्थापक — ज्याला त्याचा स्वामी सेवकांवर नेमेल — की त्यांना वेळेवर त्यांचे अन्न देईल? धन्य तो दास — ज्याला त्याचा स्वामी आल्यावर तसे करीतांना सापडेल. खरंच मी तुम्हांस सांगतो — तो त्याला आपल्या सर्व संपत्तीवर नेमेल. पण तो दुष्ट दास आपल्या मनात म्हणाला, माझा स्वामी उशीर करीत आहे; आणि तो सेवकांनाही व दासींनाही मारू लागला; खातो, पितो, नशा करतो — तर त्या दासाचा स्वामी त्या दिवशी येईल — ज्याची तो अपेक्षा करत नाही — आणि त्या वेळी — जी त्याला ठाऊक नाही; आणि तो त्याला फाडून टाकील — आणि त्याचा भाग अविश्वासूंमध्ये करील. (आणि सर्वदा देवाला गौरव असो)
संत लूकानुसार पवित्र सुवार्ता (7:36-50)
¶ तेव्हा परूश्यांपैकी कोणा एकाने, “तू माझ्याबरोबर जेवावे.” अशी येशूला विनंती केली. मग तो परूश्याच्या घरात जाऊन जेवायला बसला.
आणि पाहा, कोणीएक पापी स्त्री त्या नगरांत होती; येशू परूश्यांच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकू ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली.
आणि ती मागे त्याच्या पायांजवळ रडत उभी राहून आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली व तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून, त्याच्या पायांचे पुष्कळ मुके घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले.
तेव्हा ज्या परूश्याने येशूला बोलावले होते, त्याने हे पाहून आपल्या मनांत म्हटले, “हा संदेष्टा असता तर जी स्त्री त्यास स्पर्श करीत आहे ती कोण व कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्यास कळले असते.”
तेव्हा येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, ‹“शिमोना, तुझ्याशी मला काही बोलायचे आहे.”› तेव्हा तो म्हणाला, “गुरूजी बोला.”
येशूने म्हटले, ‹“एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला चांदीचे पाचशे नाणे व दुसऱ्याला पन्नास असे देणे होते.›
‹परंतु कर्ज फेडायला त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने दोघांना क्षमा केली. तर त्यांच्यापैकी कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?”›
तेव्हा शिमोनाने उत्तर देऊन म्हटले, “ज्याला अधिक माफ केले तो, असे मला वाटते.” मग येशू त्यास म्हणाला, ‹“ठीक ठरवलेस.” ›
तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, ‹“ही स्त्री तुला दिसते ना? मी तुझ्या घरात आलो, तू माझ्या पायांसाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवले आणि आपल्या केसांनी ते पुसले.›
‹तू माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही, ›
‹तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले आहे.›
‹या कारणासाठी मी तुला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे त्यांची क्षमा झाली आहे; कारण हिने पुष्कळ प्रीती केली; परंतु ज्याला थोडक्याची क्षमा होते तो थोडकी प्रीती करतो.”›
तेव्हा येशूने तिला म्हटले, ‹“तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”›
मग त्याच्याबरोबर जेवायला बसले होते ते आपसांत म्हणू लागले, “पापांची देखील क्षमा करणारा हा कोण आहे?”
मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, ‹“तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”›
Tenoo oasht emmok o piekhristos nem pekyot en aghathos nem pi epnevma ethowab je akee ak soati emmon nai nan
हे ख्रिस्ता, तुझ्या हितकर पित्याबरोबर व पवित्र आत्म्यासोबत आम्ही तुझी उपासना करतो; कारण तू आला आहेस व आम्हाला तारले आहेस.
1. मला, हे प्रभो, अनेक अश्रूंचे झरे दे, जसे तू पूर्वी पापी स्त्रीस दिलेस. मला तुझे पाय धुण्यास योग्य कर, ज्यांनी मला भरकटण्याच्या वाटेवरून सोडविले; आणि तुला मौल्यवान सुगंधी तेल अर्पण करू दे; आणि पश्चात्तापाद्वारे पवित्र जीवन मिळवू दे; ज्यायोगे मी आनंदाने परिपूर्ण तो स्वर ऐकेन: “तुझ्या विश्वासाने तुला तारण दिले.”
पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास महिमा असो.
पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास महिमा असो.
2. जेव्हा माझ्या अनेक दुष्ट कृत्यांची जाणीव मला होते, आणि त्या भयावह न्यायाचा विचार माझ्या हृदयात येतो, तेव्हा कंप मला ग्रासतो; आणि मी तुझ्याच शरण जातो, हे देवा, मनुष्यप्रेमी. म्हणून, तुझे मुख माझ्यापासून फिरवू नकोस, मी तुला विनवितो, हे एकमेव पापरहित. शेवट येण्यापूर्वी माझ्या दरिद्री आत्म्यास नम्रता दे, आणि मला तार.
आता आणि सदैव व युगानुयुगे, आमेन.
आता आणि सदैव व युगानुयुगे, आमेन.
3. स्वर्ग तुला आशीर्वाद देतो, हे कृपाभरित, जी वधू कधीही विवाहिता नव्हती. आणि आम्हीही तुझ्या अगम्य प्रसूतीचे गौरव करतो. हे देवजननी, दयेची व तारणाची माता, आमच्या आत्म्यांच्या तारण्यासाठी मध्यस्थी कर.
आता आणि सदैव व युगानुयुगे, आमेन.
आता आणि सदैव व युगानुयुगे, आमेन.
4. हे स्वर्गीय राजा, सांत्वनकर्ता, सत्याचा आत्मा, सर्वत्र उपस्थित व सर्वांना परिपूर्ण करणारा, सर्व उत्तम वस्तूंचा भंडार व जीवन‑दाता, कृपापूर्वक ये, आणि आमच्यात वास कर व सर्व अशुद्धतेपासून आम्हांस शुद्ध कर, हे कल्याणकर्ता, आणि आमच्या आत्म्यांचे तारण कर.
पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास महिमा असो.
पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास महिमा असो.
5. जसे तू तुझ्या शिष्यांबरोबर होतास, हे तारणारा, आणि त्यांना शांती दिलीस, तसेच कृपापूर्वक ये व आमच्याबरोबर राहा; आणि आम्हांस तुझी शांती दे, आणि आम्हांला तार, आणि आमच्या आत्म्यांची सुटका कर.
आता आणि सदैव व युगानुयुगे, आमेन.
आता आणि सदैव व युगानुयुगे, आमेन.
6. जेव्हा केव्हा आम्ही तुझ्या पवित्र देवालयात उभे राहतो, तेव्हा आम्ही स्वर्गात उभे आहोत असे मानले जाते. हे देवजननी, तू स्वर्गद्वार आहेस; आमच्यासाठी दयेचे द्वार उघड.
तेव्हा उपासक प्रार्थना करतो:
प्रभो, आम्हाला ऐक आणि आमच्यावर दया कर, आणि आमची पापे क्षमा कर. आमेन.
(प्रभो, दया कर) 41 वेळा
पवित्र ऑर्थोडॉक्स विश्वासघोषणा
खरंच, आम्ही एक देवावर विश्वास ठेवतो — देव पिता, सर्वशक्तिमान, स्वर्ग आणि पृथ्वीचा, दृश्य आणि अदृश्य सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता.
आणि एका प्रभू येशू ख्रिस्तावर — देवाचा एकुलता पुत्र — जो पित्यापासून सर्व युगांपूर्वी जन्मला, प्रकाशापासून प्रकाश, खरा देव खऱ्या देवापासून; जन्मला, निर्मिला नाही; पित्याशी तत्त्वाने समान; ज्याच्याद्वारे सर्व काही झाले. जो आमच्यासाठी मानवांसाठी आणि आमच्या उध्दाराकरता स्वर्गातून खाली आला; आणि पवित्र आत्म्यापासून आणि कुमारी मरियमपासून देह धारण करून मनुष्य झाला; आणि पोंतियुस पिलाताच्या काळात आमच्यासाठी क्रूसावर खिळला, दुःख भोगले व दफन करण्यात आला; आणि तिसऱ्या दिवशी शास्त्रांप्रमाणे मृतांतून उठला; आणि स्वर्गात गेला; आणि पित्याच्या उजवीकडे बसला; आणि तो पुन्हा येईल आपल्या गौरवात, जिवंत आणि मृतांची न्याय करण्यास; ज्याच्या राज्यास अंत नाही.
आणि आम्ही पवित्र आत्म्यावर — प्रभु आणि जीवनदायी — जो पित्यापासून प्रस्थान करतो — विश्वास ठेवतो; जो पित्याबरोबर व पुत्राबरोबर एकत्र वंदनीय आणि गौरवनीय आहे; ज्याने संदेष्ट्यांमध्ये बोलले.
आणि एका पवित्र, आम, प्रेषितीय चर्चवर.
आणि पापांची क्षमेसाठी एका बाप्तिस्म्यावर आम्ही अंगीकार करतो.
आणि आम्ही मृतांच्या पुनरुत्थानाची आणि येणाऱ्या युगाच्या जीवनाची प्रतीक्षा करतो. आमेन.
Κύριε ἐλέησον क्यिरिये एलेइसोन (प्रभु, दया कर) 41 वेळा
स्तोत्र 129
इस्राएलाने आता म्हणावे की, माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे.
त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, तरी ते मला पराजित करू शकले नाहीत.
नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; त्यांनी आपली तासे लांब केली.
परमेश्वर न्यायी आहे; त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत.
जे सियोनेचा तिरस्कार करतात, ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत.
ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत.
त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.
त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.”
स्तोत्र 131
हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही. मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही, किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही.
खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे; जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते; तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे.
हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ तू परमेश्वरावर आशा ठेव.
स्तोत्र 132