तासिक प्रार्थना

सध्याचा तास

वेइल प्रार्थना

कॉम्प्लिन व मध्यरात्रीच्या प्रार्थनेच्या मधे केली जाणारी ही वेइल-प्रार्थना झोपण्यापूर्वी आत्मपरीक्षणासाठी संन्यासी, याजक व बिशप प्रामुख्याने करतात.

संध्याकाळची ती प्रार्थना जिला अंध:काराचे आच्छादन किंवा सितार (सीत्‍तार) म्हणतात; हिची वेळ रात्रीची पहिली अंधुकता — आणि ती विशेषतः संन्याशांसाठी आहे.

आमचा पिता

¶ ‹म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः› ‹हे आमच्या स्वर्गातील पित्या, › ‹तुझे नाव पवित्र मानले जावो.›

‹तुझे राज्य येवो, › ‹जसे स्वर्गात› ‹तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.›

‹आमची रोजची भाकर आज आम्हास दे.›

‹जशी आम्ही आमच्या ऋण्यांस त्यांची ऋणे सोडली आहेत, › ‹तशीच तू आमची ऋणे आम्हांस सोड.›

‹आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस› ‹तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.)›

कृतज्ञतेची प्रार्थना

¶ ‹म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः› ‹हे आमच्या स्वर्गातील पित्या, › ‹तुझे नाव पवित्र मानले जावो.›

‹तुझे राज्य येवो, › ‹जसे स्वर्गात› ‹तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.›

‹आमची रोजची भाकर आज आम्हास दे.›

‹जशी आम्ही आमच्या ऋण्यांस त्यांची ऋणे सोडली आहेत, › ‹तशीच तू आमची ऋणे आम्हांस सोड.›

‹आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस› ‹तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.)›

स्तोत्र 50

थोर परमेश्वर देव, बोलला आहे. आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत हाक मारली.

सौंदर्य परिपूर्णता सियोनेमधून देव प्रकाशला आहे.

आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही, त्याच्यासमोर आग नाश करत चालली आहे, आणि त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.

त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली, म्हणजे तो त्याच्या लोकांचा न्यायनिवाडा करील.

देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा. ज्यांनी यज्ञाच्या व्दारे माझ्याशी करार केला आहे.”

आकाश त्याच्या चांगुलपणाविषयी सांगत असते. कारण देव स्वतः न्यायधीश आहे.

हे माझ्या लोकांनो, ऐका, आणि मी बोलेन, मी देव आहे, तुमचा देव आहे.

मी तुमच्या होमार्पणाबद्दल तक्रार करीत नाही. तुमची होमार्पणे निरंतर माझ्यापुढे आहेत,

मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही. किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही.

कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे, हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.

उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे आणि भूमीवरील वन्य पशू माझे आहेत.

मी भुकेला असलो तरी तुला बोलणार नाही, कारण जग माझेच आहे, आणि त्यातील सर्वकाही माझेच आहे.

मी बैलाचे मांस खाणार का? मी बकऱ्यांचे रक्त पिणार का?

देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर, आणि परत्पराकडे आपले नवस फेड.

तू संकटात असता मला हाक मार, आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील.

देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे? आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस?

कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस, आणि माझी वचने झुगारून देतोस?

तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता.

तू वाईटाला आपले मुख देतोस, आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते.

तुम्ही बसता आणि आपल्या भावाविरूद्ध बोलता. तू आपल्या सख्या भावाची निंदा करतोस.

तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प राहिलो. मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले, परंतू मी तुझा निषेध करणार आणि तुझ्या डोळ्यापुढे ओळीने सर्वकाही मांडणार.

तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हास फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हास कोणीही वाचवू शकणार नाही.

जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो, आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो, त्यास मी देवाचे तारण दाखवेन.

वेइलची धन्य प्रार्थना,

थोर परमेश्वर देव, बोलला आहे. आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत हाक मारली.

सौंदर्य परिपूर्णता सियोनेमधून देव प्रकाशला आहे.

आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही, त्याच्यासमोर आग नाश करत चालली आहे, आणि त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.

त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली, म्हणजे तो त्याच्या लोकांचा न्यायनिवाडा करील.

देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा. ज्यांनी यज्ञाच्या व्दारे माझ्याशी करार केला आहे.”

आकाश त्याच्या चांगुलपणाविषयी सांगत असते. कारण देव स्वतः न्यायधीश आहे.

हे माझ्या लोकांनो, ऐका, आणि मी बोलेन, मी देव आहे, तुमचा देव आहे.

मी तुमच्या होमार्पणाबद्दल तक्रार करीत नाही. तुमची होमार्पणे निरंतर माझ्यापुढे आहेत,

मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही. किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही.

कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे, हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.

उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे आणि भूमीवरील वन्य पशू माझे आहेत.

मी भुकेला असलो तरी तुला बोलणार नाही, कारण जग माझेच आहे, आणि त्यातील सर्वकाही माझेच आहे.

मी बैलाचे मांस खाणार का? मी बकऱ्यांचे रक्त पिणार का?

देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर, आणि परत्पराकडे आपले नवस फेड.

तू संकटात असता मला हाक मार, आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील.

देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे? आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस?

कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस, आणि माझी वचने झुगारून देतोस?

तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता.

तू वाईटाला आपले मुख देतोस, आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते.

तुम्ही बसता आणि आपल्या भावाविरूद्ध बोलता. तू आपल्या सख्या भावाची निंदा करतोस.

तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प राहिलो. मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले, परंतू मी तुझा निषेध करणार आणि तुझ्या डोळ्यापुढे ओळीने सर्वकाही मांडणार.

तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हास फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हास कोणीही वाचवू शकणार नाही.

जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो, आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो, त्यास मी देवाचे तारण दाखवेन.

स्तोत्र 4

मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा. संकटात मी असता, तेव्हा तू मला मुक्त केले, माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक.

अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार? किती काळ तुम्ही व्यर्थतेची आवड धरणार, आणि खोट्याचा शोध घेणार? सेला

परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे. मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल.

भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका! तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चितंन कर आणि शांत राहा.

न्यायीपणाचे यज्ञ अर्पण करा आणि परमेश्वरावर आपला विश्वास ठेवा.

बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हांवर तुझा मुखप्रकाश पाड.”

त्यांच्या धनधान्याची आणि द्राक्षरसाची समृध्दी असते, तेव्हा त्यांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू मला दिला आहे.

मी अंथरूणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो, कारण परमेश्वरा, तुच माझे रक्षण करतोस आणि मला सुरक्षित ठेवतोस.

स्तोत्र 6

हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस, किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस.

हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत.

माझा जीव फार घाबरला आहे. परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे?

हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव! तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार.

कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही. मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार?

मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे. रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो. मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो.

शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत. माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत.

अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.

परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे; त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे.

माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील. ते माघारे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील.

स्तोत्र 8

हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे.

तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून, बाळांच्या आणि तान्ह्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली.

तुझ्या हातांच्या बोटांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे, चंद्र आणि ताऱ्यांकडे मी जेव्हा बघतो.

तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी? किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे?

तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा थोडेसेच कमी केले आहेस. आणि गौरवाने व आदराने तू त्यास मुकुट घातला आहे.

तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे तू त्यांना अधिपत्य दिलेस. तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस.

सर्व मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशूसुद्धा.

आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व.

हे परमेश्वरा, आमच्या देवा, सर्व पृथ्वीत तुझे नाव किती उत्कृष्ट आहे!

स्तोत्र 12

हे परमेश्वरा, साहाय्य कर! कारण भक्तिमान नाहीसा झाला आहे. विश्वासू गायब झाला आहे.

प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो, प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो.

परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको.

हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ, जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?”

परंतु परमेश्वर म्हणतो, “गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो; ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन.”

परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत, पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत.

हे परमेश्वरा, तुच त्यांना सांभाळशील, या पिढीपासून तू त्यांना सर्वकाळ राखशील.

मनुष्यांच्या संतानांमध्ये निचपणाला थोरवी मिळते तेव्हा दुष्ट चोहोंकडे हिंडत राहतात.

स्तोत्र 15

हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?

जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो.

जो आपल्या जीभेने चुगली करत नाही, किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही, किंवा आपल्या शेजाऱ्याचा अपमान करत नाही.

अधमाचा तिरस्कार करतो, परंतु जे परमेश्वराचे भय धरतात त्यांचा सन्मान करतो, जो वचन देऊन आपले अहीत झाले तरी मागे हटत नाही,

जेव्हा तो पैसे उधार देतो तेव्हा व्याज घेत नाही, जो निर्दोष लोकांविरूद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही. तो, जो या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.

स्तोत्र 24

भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत.

कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला, आणि जलांवर त्याने ती स्थापली.

परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो?

ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही.

तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल, आणि त्यालाच त्याच्या तारणाऱ्या देवापासून न्यायीपण मिळेल.

हिच पिढी त्यास शोधणारी आहे, जी याकोबाच्या देवाचे मुख शोधते.

अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा. पुर्वकालीन द्वारांनो, उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.

गौरवशाली राजा कोण आहे? तोच परमेश्वर, सामर्थ्यशाली आणि थोर आहे.

वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. सर्वकाळच्या दरवाजांनो, तुम्ही उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.

तो गौरवशाली राजा कोण आहे? सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे, तोच तो गौरवशाली राजा आहे.

स्तोत्र 26

हे परमेश्वरा, माझा न्याय कर. कारण मी प्रामाणिकपणाने चाललो आहे. मी परमेश्वरावर न डगमगता विश्वास ठेवला आहे.

हे परमेश्वरा, मला पारख आणि माझे परिक्षण कर. माझ्ये हृदय आणि आतील मन निरखून पाहा.

कारण तुझी प्रेमदया सदैव माझ्या डोळ्यांपुढे आहे, आणि मी तुझ्या सत्यात चाललो आहे.

कपटी लोकांबरोबर मी सहयोगी झालो नाही, किंवा मी अप्रामाणिक लोकांत मिसळलो नाही.

मी त्या दुष्टांच्या सभेचा तिरस्कार करतो. आणि मी दुष्टांसोबत राहत नाही.

मी आपले हात निर्दोषतेने धुईन, आणि परमेश्वरा मी तुझ्या वेदीकडे वळीन.

अशासाठी की, मी तुझी स्तुती मोठ्याने करावी आणि तू केलेल्या आश्चर्याची कृत्ये सांगावी.

परमेश्वरा, तुझे राहण्याचे घर आणि तुझे गौरव जिथे असते, ते घर मला आवडते.

पाप्यांसोबत किंवा रक्तपात करणाऱ्यांसोबत माझा प्राण काढून घेऊ नकोस.

त्यांच्या हातात कट आहे, आणि त्यांचा उजवा हात लाच घेण्याने भरला आहे.

पण मी तर प्रामाणिकपणाने वागेन, माझ्यावर दया कर आणि मला तार.

माझा पाय सपाट ठिकाणी उभा आहे, सभेमध्ये मी परमेश्वराची स्तुती करीन.

स्तोत्र 66

अहो पृथ्वीवरील सर्वजणहो देवाचा जयजयकार करा;

त्याच्या नावाचा महिमा गा; त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा.

देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत, तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात.

सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील; आणि तुझी स्तोत्रे गातील; ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.

अहो या, आणि देवाची कार्ये पहा; तो मनुष्यांच्या मुलांस आपल्या कृत्यांनी धाक बसवतो.

त्याने समुद्र पालटून कोरडी भूमी केली; ते नदीतून पायांनी चालत गेले; तेथे आम्ही त्याच्यात आनंद केला.

तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ राज्य करतो; तो आपल्या डोळ्यांनी सर्व राष्ट्रांचे निरीक्षण करतो; बंडखोरांनी आपल्यास उंच करू नये.

अहो लोकांनो, आमच्या देवाला धन्यवाद द्या, आणि त्याची स्तुती ऐकू येईल अशी करा.

तो आमचा जीव राखून ठेवतो, आणि तो आमचे पाय सरकू देत नाही.

कारण हे देवा, तू आमची परीक्षा केली आहे; रुप्याची परीक्षा करतात तशी तू आमची परीक्षा केली आहे.

तू आम्हास जाळ्यात आणले; तू आमच्या कमरेवर अवजड ओझे ठेवले.

तू आमच्या डोक्यावरून लोकांस स्वारी करण्यास लावले. आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून गेलो, परंतु तू आम्हास बाहेर काढून प्रशस्त जागी आणले.

मी होमार्पणे घेऊन तुझ्या घरात येईन; मी तुला केलेले नवस फेडीन.

संकटात असता जे मी आपल्या ओठांनी उच्चारले आणि जे मी आपल्या तोंडाने बोलल,

मी तुला मेंढ्याच्या धूपासहित पुष्ट पशूंचे होमार्पणे मी तुला अर्पीण; बोकड आणि गोऱ्हे अर्पीण.

जे सर्व तुम्ही देवाचे भय धरता, या आणि ऐका, आणि त्याने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हास सांगतो.

मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला, आणि माझ्या जीभेवर त्याची स्तुती होती.

जर माझ्या मनात अन्यायाकडे मी पाहिले असते, तर प्रभूने माझे ऐकले नसते.

पण देवाने खचित ऐकले आहे; त्याने माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे लक्ष दिले आहे.

देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझ्या प्रार्थनांपासून आपले मुख फिरविले नाही, किंवा त्याच्या कराराच्या विश्वासूपणापासून आपली दृष्टी वळविली नाही.

स्तोत्र 69

हे देवा, मला तार; कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन पोहचले आहे.

मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, तेथे पुराचे पाणी माझ्यावरून वाहत आहे.

माझ्या रडण्याने मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; माझ्या देवाची वाट पाहता माझे डोळे शिणले आहेत.

विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही अधिक आहेत; जे अन्यायाने माझे वैरी असून मला कापून काढायला पाहतात ते बलवान आहेत; जे मी चोरले नव्हते, ते मला परत करावे लागले.

हे देवा, तू माझा मूर्खापणा जाणतो, आणि माझी पापे तुझ्यापासून लपली नाहीत.

हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतिक्षा करतात, त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये. हे इस्राएलाच्या देवा, जे तुला शोधतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये.

कारण तुझ्याकरता मी निंदा सहन केली आहे; लाजेने माझे तोंड झाकले आहे.

मी आपल्या बंधूला परका झालो आहे, आपल्या आईच्या मुलांस विदेशी झालो आहे.

कारण तुझ्या मंदीराविषयीच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे, आणि तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेल्या निंदा माझ्यावर पडल्या आहेत.

जेव्हा मी रडलो आणि उपवास करून माझ्या जिवाला शिक्षा केली, तेव्हा ते जसे माझ्या स्वतःची निंदा होती.

जेव्हा मी गोणपाट आपले वस्र केले, तेव्हा मी त्यांना उपहास असा झालो.

जे नगराच्या वेशीत बसतात; ते माझी निंदा करतात; मी मद्यप्यांचा गीत झालो.

पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपल्या तारणाच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.

मला चिखलातून बाहेर काढ, आणि त्यामध्ये मला बुडू देऊ नकोस; माझा तिरस्कार करणाऱ्यापासून मला वाचव. खोल पाण्यापासून मला काढ.

पुराच्या पाण्याने मला पूर्ण झाकून टाकू नकोस, खोल डोह मला न गिळो. खाच आपले तोंड माझ्यावर बंद न करो.

हे परमेश्वरा, मला उत्तर दे, कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे.

आपल्या सेवकापासून आपले तोंड लपवू नकोस, कारण मी क्लेशात आहे; मला त्वरीत उत्तर दे.

माझ्या जिवाजवळ ये आणि त्यास खंडून घे; माझ्या शत्रूंमुळे खंडणी भरून मला सोडव.

तुला माझी निंदा, माझी लाज आणि माझी अप्रतिष्ठा माहित आहे; माझे विरोधक माझ्यापुढे आहेत;

निंदेने माझे हृदय तुटले आहे; मी उदासपणाने भरलो आहे; माझी कीव करणारा कोणीतरी आहे का हे मी पाहिले, पण तेथे कोणीच नव्हता; मी सांत्वनासाठी पाहिले, पण मला कोणी सापडला नाही.

त्यांनी मला खाण्यासाठी विष दिले; मला तहान लागली असता आंब दिली

त्यांचे मेज त्यांच्यापुढे पाश होवोत; जेव्हा ते सुरक्षित आहेत असा विचार करतील, तो त्यांना सापळा होवो.

त्यांचे डोळे आंधळे होवोत यासाठी की, त्यांना काही दिसू नये; आणि त्यांची कंबर नेहमी थरथर कापावी असे कर.

तू त्यांच्यावर आपला संताप ओत, आणि तुझ्या संतापाची तीव्रता त्यांना गाठो.

त्यांची ठिकाणे ओसाड पडो; त्यांच्या तंबूत कोणीही न राहो.

कारण ज्याला तू दणका दिला त्याचा ते छळ करतात; तू ज्यांस जखमी केलेस त्यांच्या वेदनेविषयी ते दुसऱ्याला सांगतात.

ते अन्यायानंतर अन्याय करतात त्यांना दोष लाव; तुझ्या न्यायाच्या विजयात त्यांना येऊ देऊ नको.

जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत, आणि नितिमानांबरोबर त्यांची नावे लिहिली न जावोत.

पण मी गरीब आणि दु:खी आहे; हे देवा, तुझे तारण मला उंचावर नेवो.

मी देवाच्या नावाची स्तुती गाणे गाऊन करीन, आणि धन्यवाद देऊन त्यास उंचाविन.

ते बैलापेक्षा, शिंगे असलेल्या, किंवा दुभागलेल्या खुराच्या गोऱ्ह्यांपेक्षा परमेश्वरास आवडेल.

लीनांनी हे पाहिले आहे आणि हर्षित झाले; जे देवाचा शोध घेतात त्या तुमचे हृदय जिवंत होवो.

कारण परमेश्वर गरजवंताचे ऐकतो आणि आपल्या बंदिवानांचा तिरस्कार करत नाही.

आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यामध्ये संचार करणारे प्रत्येकगोष्ट त्याची स्तुती करा.

कारण देव सियोनेला तारील आणि यहूदाची नगरे पुन्हा बांधील; लोक तेथे राहतील आणि ते त्यांच्या मालकीचे होईल.

त्याच्या सेवकाचे वंशजही ते वतन करून घेतील; आणि ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते तेथे राहतील.

खालील स्तोत्रे तिसऱ्या प्रहरातून निवडली आहेत:

हे देवा, मला तार; कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन पोहचले आहे.

मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, तेथे पुराचे पाणी माझ्यावरून वाहत आहे.

माझ्या रडण्याने मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे; माझ्या देवाची वाट पाहता माझे डोळे शिणले आहेत.

विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही अधिक आहेत; जे अन्यायाने माझे वैरी असून मला कापून काढायला पाहतात ते बलवान आहेत; जे मी चोरले नव्हते, ते मला परत करावे लागले.

हे देवा, तू माझा मूर्खापणा जाणतो, आणि माझी पापे तुझ्यापासून लपली नाहीत.

हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतिक्षा करतात, त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये. हे इस्राएलाच्या देवा, जे तुला शोधतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये.

कारण तुझ्याकरता मी निंदा सहन केली आहे; लाजेने माझे तोंड झाकले आहे.

मी आपल्या बंधूला परका झालो आहे, आपल्या आईच्या मुलांस विदेशी झालो आहे.

कारण तुझ्या मंदीराविषयीच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे, आणि तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेल्या निंदा माझ्यावर पडल्या आहेत.

जेव्हा मी रडलो आणि उपवास करून माझ्या जिवाला शिक्षा केली, तेव्हा ते जसे माझ्या स्वतःची निंदा होती.

जेव्हा मी गोणपाट आपले वस्र केले, तेव्हा मी त्यांना उपहास असा झालो.

जे नगराच्या वेशीत बसतात; ते माझी निंदा करतात; मी मद्यप्यांचा गीत झालो.

पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपल्या तारणाच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.

मला चिखलातून बाहेर काढ, आणि त्यामध्ये मला बुडू देऊ नकोस; माझा तिरस्कार करणाऱ्यापासून मला वाचव. खोल पाण्यापासून मला काढ.

पुराच्या पाण्याने मला पूर्ण झाकून टाकू नकोस, खोल डोह मला न गिळो. खाच आपले तोंड माझ्यावर बंद न करो.

हे परमेश्वरा, मला उत्तर दे, कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे.

आपल्या सेवकापासून आपले तोंड लपवू नकोस, कारण मी क्लेशात आहे; मला त्वरीत उत्तर दे.

माझ्या जिवाजवळ ये आणि त्यास खंडून घे; माझ्या शत्रूंमुळे खंडणी भरून मला सोडव.

तुला माझी निंदा, माझी लाज आणि माझी अप्रतिष्ठा माहित आहे; माझे विरोधक माझ्यापुढे आहेत;

निंदेने माझे हृदय तुटले आहे; मी उदासपणाने भरलो आहे; माझी कीव करणारा कोणीतरी आहे का हे मी पाहिले, पण तेथे कोणीच नव्हता; मी सांत्वनासाठी पाहिले, पण मला कोणी सापडला नाही.

त्यांनी मला खाण्यासाठी विष दिले; मला तहान लागली असता आंब दिली

त्यांचे मेज त्यांच्यापुढे पाश होवोत; जेव्हा ते सुरक्षित आहेत असा विचार करतील, तो त्यांना सापळा होवो.

त्यांचे डोळे आंधळे होवोत यासाठी की, त्यांना काही दिसू नये; आणि त्यांची कंबर नेहमी थरथर कापावी असे कर.

तू त्यांच्यावर आपला संताप ओत, आणि तुझ्या संतापाची तीव्रता त्यांना गाठो.

त्यांची ठिकाणे ओसाड पडो; त्यांच्या तंबूत कोणीही न राहो.

कारण ज्याला तू दणका दिला त्याचा ते छळ करतात; तू ज्यांस जखमी केलेस त्यांच्या वेदनेविषयी ते दुसऱ्याला सांगतात.

ते अन्यायानंतर अन्याय करतात त्यांना दोष लाव; तुझ्या न्यायाच्या विजयात त्यांना येऊ देऊ नको.

जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत, आणि नितिमानांबरोबर त्यांची नावे लिहिली न जावोत.

पण मी गरीब आणि दु:खी आहे; हे देवा, तुझे तारण मला उंचावर नेवो.

मी देवाच्या नावाची स्तुती गाणे गाऊन करीन, आणि धन्यवाद देऊन त्यास उंचाविन.

ते बैलापेक्षा, शिंगे असलेल्या, किंवा दुभागलेल्या खुराच्या गोऱ्ह्यांपेक्षा परमेश्वरास आवडेल.

लीनांनी हे पाहिले आहे आणि हर्षित झाले; जे देवाचा शोध घेतात त्या तुमचे हृदय जिवंत होवो.

कारण परमेश्वर गरजवंताचे ऐकतो आणि आपल्या बंदिवानांचा तिरस्कार करत नाही.

आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यामध्ये संचार करणारे प्रत्येकगोष्ट त्याची स्तुती करा.

कारण देव सियोनेला तारील आणि यहूदाची नगरे पुन्हा बांधील; लोक तेथे राहतील आणि ते त्यांच्या मालकीचे होईल.

त्याच्या सेवकाचे वंशजही ते वतन करून घेतील; आणि ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते तेथे राहतील.

स्तोत्र 22

माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? मला तारायला आणि माझ्या वेदनांचा शब्द ऐकायला तू दूर का आहेस?

माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस, आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही.

तरी तू पवित्र आहेस, जो इस्राएलाच्या स्तवनामध्ये वसतोस.

आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस.

देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी आरोळी केली आणि त्यांना तू सोडवले, त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांची निराशा झाली नाही.

परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही, जो मनुष्यांनी निंदिलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे.

सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात.

ते म्हणतात “तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तर परमेश्वर त्यास सोडवो. त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.”

परंतु मला उदरांतून बाहेर काढणारा तुच आहेस, मी माझ्या आईच्या स्तनांवर असता, तू मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवले.

मी गर्भातूनच तुझ्यावर सोपवून दिलेला होतो. माझ्या आईच्या उदरात असतानाच तू माझा देव आहेस.

माझ्यापासून दूर नको राहू, कारण संकट जवळच आहे. आणि मला मदत करायला कोणीही नाही.

खुप बैलांनी मला वेढले आहे, बाशानाच्या बळकट बैलांनी मला वेढले आहे.

जसा सिंह आपले तोंड त्याच्या भक्ष्यास फाडण्यास उघडतो, तसे त्यांनी आपले तोंड माझ्या विरूद्ध उघडले आहे.

मी पाण्यासारखा ओतला जात आहे, आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत. माझे हृदय मेणासारखे झाले आहे. जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे.

फुटलेल्या खापराप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली आहे. माझी जीभ टाळूला चिकटली आहे. तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहे.

“कुत्री” मला वेढून आहेत, मला दुष्टांच्या घोळक्यांनी घेरले आहे. त्यांनी माझ्या हातापायाला छेदले आहे.

मी माझी सर्व हाडे मोजू शकतो. ते माझ्याकडे टक लावून बघतात.

त्यांनी माझे कपडे त्यांच्यात वाटून घेतली आहेत, आणि माझ्या कपड्यांसाठी ते चिठ्‌या टाकतात.

परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तुच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर.

परमेश्वरा माझे आयुष्य तलवारीपासून वाचव, माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांच्या पंज्यापासून वाचव.

सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. जंगली बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर.

परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझे नाव सांगेन. सभेत मी तुझे गुणगान गाईन.

जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा! याकोबाच्या सर्व वंशजांनो, त्यास मान द्या! इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.

कारण परमेश्वराने संकटात सापडलेल्यांच्या दु:खाला तुच्छ मानले नाही आणि किळस केला नाही. आणि त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून लपवले नाही. जेव्हा पिडीतांनी त्यास आरोळी केली, त्याने ऐकले.

परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करीन. तुझे भय धरणाऱ्यांपुढे मी आपले नवस फेडीन.

गरीब लोक खातील आणि समाधानी राहतील. जे लोक परमेश्वरास शोधत आहेत, ते त्याची स्तुती करतील. तुझे हृदय सर्वकाळ जिवंत राहो.

सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील. सर्व राष्ट्रातील कुटूंब तुला नमन करतील.

कारण राज्य परमेश्वरचे आहे, तो जगावर अधिकार करणारा आहे.

पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील. जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत, ते त्यास नमन करतील.

येणारी पिढी त्याची सेवा करणार. ते त्यांच्या पुढच्या पिढीला प्रभूबद्दल सांगतील.

ते येतील आणि जे जन्मतील त्यांना ते त्याचे न्यायीपण प्रगट करतील, ते म्हणतील त्यानेच हे केले आहे.

स्तोत्र 29

स्वर्गदूतहो, परमेश्वरास गौरव आणि सामर्थ्य आहे असे कबूल करा.

परमेश्वरास त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या; पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.

परमेश्वराचा आवाज जलांवरून ऐकण्यात आला, गौरवशाली देव गर्जत आहे, परमेश्वर पुष्कळ जलांवर गर्जत आहे.

परमेश्वराचा आवाज सामर्थशाली आहे, परमेश्वराचा आवाज चमत्कारीक आहे.

परमेश्वराची वाणी देवदार वृक्षाला तोडते, परमेश्वर लबानोनाच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.

तो लबानोनला वासराप्रमाणे आणि सिर्योनला तरुण बैलाप्रमाणे बागडायला लावतो.

परमेश्वराची वाणी अग्नी ज्वालासह हल्ला करते.

परमेश्वराची वाणी वाळवंटाला कंपित करते कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या वाणीने हादरते.

परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवयास लावते आणि अरण्य पर्णहीन करते. पण त्याच्या मंदिरात सर्व “महिमा!” गातात

महापुरावर परमेश्वर राजा बसला आहे, आणि परमेश्वरच सर्वकाळचा राजा म्हणून बसला आहे.

परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्य देतो, परमेश्वर त्याच्या लोकांना शांतीने आशीर्वादित करतो.

स्तोत्र 42

जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते, तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो.

माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन?

जेव्हा माझे शत्रू नेहमी मला म्हणतात की, “तुझा देव कोठे आहे?” तेव्हा रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.

हर्षानादाने आणि स्तुती करत, सण साजरा करणाऱ्या पुष्कळांबरोबर, कसा मी त्या गर्दीला नेतृत्व करत देवाच्या घरात घेऊन जात असे, हे आठवून माझा जीव माझ्याठायी ओतला जात आहे.

हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस? माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण त्याच्या उपस्थितीने होणाऱ्या तारणामुळे मी त्याची अजून स्तुती करीन.

माझ्या देवा, माझ्याठायी माझा जीव निराश झाला आहे, म्हणून यार्देनच्या प्रदेशापासून, हर्मोनच्या डोंगराच्या तीन शिखरावरून आणि मिसहारच्या टेकडीवरून मी तुझे स्मरण करतो.

तुझ्या धबधब्याच्या अवाजाने ओघ ओघाला हाक मारतो. तुझ्या सर्व लहरी आणि मोठ्या लाटा माझ्यावरून गेल्या आहेत.

तरी परमेश्वर त्याची प्रेमदया दिवसा अज्ञापील, आणि रात्री त्याचे गीत, म्हणजे माझ्या जीवाच्या देवाला केलेली प्रार्थना माझ्यासोबत असेल.

मी देवाला म्हणेल, माझ्या खडका, तू का मला सोडले आहे? शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करू?

“तुझा देव कुठे आहे?” असे बोलून माझे शत्रू तलवारीने माझ्या हाडात भोसकल्याप्रमाणे पूर्ण दिवस मला दोष देत राहतात.

हे माझ्या जीवा तू का निराश झाला आहेस? माझ्यामध्ये तू तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण माझ्या मुखाचे तारण आणि माझा देव त्याची अजून मी स्तुती करीन.

खालील स्तोत्रे सहाव्या प्रहरातून निवडली आहेत:

हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो; दिवसभर तो माझ्याशी लढतो आणि अत्याचार करतो.

माझे शत्रू दिवसभर मला गिळून टाकण्याची इच्छा करतात; कारण उद्धटपणे माझ्याविरूद्ध लढणारे अनेक आहेत.

मी जेव्हा घाबरतो, तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन.

मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन, मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करील?

दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात; त्यांचे सर्व विचार माझ्याविरूद्ध माझ्या वाईटासाठी असतात.

ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात, जसे ते माझा जीव घेण्यासाठी वाट पाहतात.

त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको. हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण.

तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत; तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का?

मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील; हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे.

मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.

मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील?

हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे; मी तुला धन्यवादाची अर्पणे देईन.

कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे; तू माझे पाय पडण्यापासून राखले, यासाठी की, मी जीवनाच्या प्रकाशात देवापुढे चालावे.

स्तोत्र 56

हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो; दिवसभर तो माझ्याशी लढतो आणि अत्याचार करतो.

माझे शत्रू दिवसभर मला गिळून टाकण्याची इच्छा करतात; कारण उद्धटपणे माझ्याविरूद्ध लढणारे अनेक आहेत.

मी जेव्हा घाबरतो, तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन.

मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन, मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करील?

दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात; त्यांचे सर्व विचार माझ्याविरूद्ध माझ्या वाईटासाठी असतात.

ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात, जसे ते माझा जीव घेण्यासाठी वाट पाहतात.

त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको. हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण.

तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत; तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का?

मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील; हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे.

मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.

मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील?

हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे; मी तुला धन्यवादाची अर्पणे देईन.

कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे; तू माझे पाय पडण्यापासून राखले, यासाठी की, मी जीवनाच्या प्रकाशात देवापुढे चालावे.

स्तोत्र 85

हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस.

तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस. तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत.

तू आपला सर्व क्रोध काढून घेतला आहे; आणि आमच्यावरील भयंकर क्रोधापासून मागे फिरला आहेस.

हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास परत आण, आणि आमच्यावरचा तुझा असंतोष दूर कर.

सर्वकाळपर्यंत तू आमच्यावर रागावलेला राहशील का? पिढ्यानपिढ्या तू रागावलेला राहशील काय?

तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा, म्हणून तू आम्हास परत जिवंत करणार नाहीस का?

हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा अनुभव आम्हास येऊ दे; तू कबूल केलेले तारण आम्हास दे.

परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन. कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल, तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये.

खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव रहावे.

दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.

पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, आणि स्वर्गातून नितिमत्व खाली पाहत आहे.

जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि आमची भूमी आपले पिक देईल.

त्याच्यासमोर नितीमत्व चालेल, आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील.

स्तोत्र 90

हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस.

पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच, अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस.

तू मनुष्यास पुन्हा मातीस मिळवतोस, आणि तू म्हणतोस, “अहो मनुष्याच्या वंशजांनो परत या.”

कारण हजारो वर्षे तुझ्या दृष्टीने, कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.

पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे ते आहेत.

सकाळी ते उगवते आणि वाढते; संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते.

खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो, आणि तुझ्या कोपाने आम्ही घाबरून जातो.

तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत. आमचे गुप्त पाप तुझ्या प्रकाशाच्या समक्ष ठेवले आहे.

तुझ्या क्रोधाखालून आमचे आयुष्य निघून जाते; आमची वर्षे उसाशाप्रमाणे त्वरेने संपून जातात.

आमचे आयुष्य सत्तर वर्षे आहे; किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे; पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु:ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो.

तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो?

म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.

हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ तू उशीर करशील? तुझ्या सेवकावर दया कर.

तू आपल्या दयेने आम्हास सकाळी तृप्त कर म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्षाने आणि आनंदाने घालवू.

जितके दिवस तू आम्हास पीडले त्या दिवसाच्या मानाने आणि जितकी वर्षे आम्ही समस्येचा अनुभव घेतला त्या वर्षाच्या मानाने आम्हांला आनंदित कर.

तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना बघू दे.

प्रभू, आमचा देव याची कृपा आम्हांवर असो. आमच्या हातच्या कामाला उन्नती दे; खरोखर, आमच्या हातच्या कामाला उन्नती दे.

स्तोत्र ११०

प्रभु माझ्या प्रभुला म्हणाला: माझ्या उजव्या हाताला बस; जोपर्यंत मी तुझे शत्रू तुझ्या पायपायथ्याखाली ठेवत नाही. सियोनहून प्रभु तुझ्यासाठी सामर्थ्याची काठी पाठवितो; तू तुझ्या शत्रूंच्या मध्यावर राज्य कर. तुझ्या सामर्थ्याच्या दिवशी तुला प्रजा स्वेच्छेने सादर होईल, पवित्रतेच्या शोभेत. पहाटेच्या ताऱ्यापूर्वी — गर्भापासून मी तुला जन्मलो आहे.

प्रभुने शपथ खाल्ली आहे आणि तो पश्चात्ताप करीत नाही: तू मेल्खिसेदेकाच्या क्रमाने याजक आहेस. तुझ्या उजव्या हाताला प्रभु आहे; तो आपल्या कोपाच्या दिवशी राजांना मोडील. तो राष्ट्रांमध्ये न्याय करील, देहांनी त्यांना भरेल; तो पृथ्वीवरील अनेकांचे मस्तक चिरडील. मार्गावर तो ओहळातील पाणी पिईल; म्हणून तो आपले मस्तक उंच करील. अल्लेलूया.

स्तोत्र 96

अहो, परमेश्वरास नवीन गीत गा; हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर.

परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या; दिवसेंदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा.

राष्ट्रात त्याचे गौरव, त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा.

कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे. सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे.

कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, पण परमेश्वराने तर स्वर्ग निर्माण केला.

वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत. सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत.

अहो तुम्ही लोकांच्या कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य सांगा.

परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा. अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या.

पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा. हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो.

राष्ट्रांमधील लोकांस सांगा की, परमेश्वर राज्य करतो. जगसुद्धा स्थिर स्थापिलेले आहे; ते हलविता येणे अशक्य आहे. तो सरळपणे लोकांचा न्याय करील.

आकाश आनंदित होवो, आणि पृथ्वी आनंदोत्सव करो; समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत.

शेत आणि त्यातील सर्वकाही आनंदोत्सव करोत. मग जंगलातील सर्व वृक्ष आनंदाने गजर करतील.

सगळी निर्मिती परमेश्वरापुढे आनंद करो, कारण तो येत आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा व त्याच्या सत्यतेने लोकांचा न्याय करील.

स्तोत्र 109

हे माझ्या स्तवनाच्या देवा, शांत राहू नको.

कारण दुष्ट आणि कपटी माझ्यावर हल्ला करतात; ते माझ्याविरूद्ध खोटे बोलतात.

त्यांनी मला वेढले आहे आणि माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगतात. आणि ते विनाकारण माझ्यावर हल्ला करतात.

माझ्या प्रेमाच्या बदल्यात ते माझी निंदानालस्ती करतात. पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो.

मी केलेल्या चांगल्यासाठी वाईट, आणि त्यांनी माझ्या प्रीतीची फेड द्वेषाने केली.

या लोकांवर तू दुर्जन मनुष्यास शत्रूसारखा नेम; त्यांच्या उजव्या हाताकडे आरोप करणाऱ्याला उभा ठेव.

जेव्हा त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी म्हणून सापडो; त्याची प्रार्थना पापच मानली जावो.

त्याचे दिवस थोडे होवोत; दुसरा त्याचा अधिकार घेवो;

त्याची मुले पितृहीन आणि त्याची पत्नी विधवा होवो.

त्याची मुले इकडे तिकडे भटकत आणि भीक मागत फिरोत, ती आपल्या ओसाड ठिकाणाहून दूर जाऊन निवेदन करोत.

सावकार त्यांचे सर्वस्व हिरावून घेवो; त्याची कमाई परके लुटून घेवोत;

त्यांना कोणीही दया देऊ नये; त्याच्या पितृहीन मुलांची कोणीही कीव करू नये.

त्याचे वंशज कापून टाकली जावोत; पुढच्या पिढीत त्याचे नाव खोडले जावो.

परमेश्वरास त्याच्या पूर्वजांच्या पापांची आठवण राहो. त्याच्या आईची पापे कधीही विसरली न जावोत.

परमेश्वरापुढे त्यांचे पातक सदैव असोत; परमेश्वर त्यांचे स्मरण पृथ्वीवरून काढून टाको.

कारण या मनुष्याने कधीही दया दाखविण्याची पर्वा केली नाही, परंतु त्याऐवजी पीडलेल्यांचा छळ आणि गरजवंत व धैर्य खचलेल्यांचा वध केला.

त्यास शाप देणे आवडते, म्हणून तो परत त्याच्यावर आला. त्याने आशीर्वादाचा द्वेष केला; म्हणून त्याच्यावर आशीर्वाद आले नाहीत.

त्याने त्याच्या वस्राप्रमाणे आपल्याला शापाचे वस्र पांघरले, आणि त्याचे शाप हे पाण्याप्रमाणे त्याच्या अंतर्यामात, तेलासारखे त्याच्या हाडात आले.

त्याचे शाप त्यास पांघरावयाच्या वस्राप्रमाणे होवो, ते नेहमी वापरावयाच्या कंबरपट्ट्याप्रमाणे तो त्यास वेढून राहो.

माझ्या आरोप्यास, माझ्याविरूद्ध वाईट बोलणाऱ्यास परमेश्वराकडून हेच प्रतिफळ आहे

हे परमेश्वरा, माझा प्रभू, कृपा करून तुझ्या नावाकरता मला वागवून घे. कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे म्हणून मला वाचव.

कारण मी पीडित आणि गरजवंत आहे, आणि माझे हृदय माझ्यामध्ये घायाळ झाले आहे.

मी संध्याकाळच्या सावल्यांप्रमाणे दिसेनासा झालो आहे; मी टोळाप्रमाणे हुसकावला जात आहे.

उपासाने माझे गुडघे अशक्त झाले आहेत; मी त्वचा आणि हाडे असा होत आहे.

माझा विरोध्यास मी निंदेचा विषय झालो आहे, ते जेव्हा माझ्याकडे बघतात, तेव्हा आपले डोके हालवतात.

हे माझ्या परमेश्वरा, माझ्या देवा, मला मदत कर; तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझा उध्दार कर.

हे परमेश्वरा, त्यांनी हे जाणावे की, ही तुझी करणी आहे, तूच हे केले आहेस.

जरी त्यांनी मला शाप दिला, पण कृपा करून मला आशीर्वाद दे; जेव्हा ते हल्ला करतील, तेव्हा ते लज्जित होतील, परंतु तुझा सेवक आनंदी होईल.

माझे विरोधी वस्राप्रमाणे लाज पांघरतील, आणि ते त्यांची लाज झग्याप्रमाणे पांघरतील.

मी आनंदाने आपल्या मुखाने मनापासून परमेश्वरास धन्यवाद देईन; लोकसमुदायासमोर मी त्याची स्तुती करीन.

कारण तो पीडितांना धमकी देणाऱ्यांपासून, त्यांचे तारण करायला तो त्यांच्या उजव्या हाताला उभा राहतो.

स्तोत्र 114

जेव्हा इस्राएल मिसरातून, याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले,

तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाले.

समुद्राने पाहिले आणि पळाला; यार्देन मागे हटली.

पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या.

हे समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देने तू का मागे हटलीस?

पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता? लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता?

हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, याकोबाच्या देवासमोर थरथर काप.

तो खडक पाण्याच्या तळ्यात, कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो.

स्तोत्र 115

हे परमेश्वरा, आमचे नको. आमचे नको, तर आपल्या नावाचा सन्मान कर, कारण तू दयाळू आणि सत्य आहेस.

ह्यांचा देव कोठे आहे, असे राष्ट्रांनी का म्हणावे?

आमचा देव स्वर्गात आहे; त्यास जे आवडते ते तो करतो.

राष्ट्रांच्या मूर्ती सोन्याच्या व रुप्याच्या आहेत. त्या मनुष्यांच्या हातचे काम आहेत.

त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत, पण त्यांना बघता येत नाही.

त्यांना कान आहेत, पण त्यांना ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे, पण त्यांना वास घेता येत नाही.

त्यांना हात आहेत, पण त्यांना स्पर्श करता येत नाही. त्यांना पाय आहेत पण त्या चालू शकत नाही; किंवा त्यांच्या मुखाने त्यांना बोलता येत नाही.

जे त्यांना बनवितात त्यांच्याप्रमाणेच, त्यांच्यावर भरवसा ठेवणारा प्रत्येकजन आहे.

हे इस्राएला, परमेश्वरावर विश्वास ठेव. तो त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे.

हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर विश्वास ठेव; तोच त्याचे सहाय्य आणि ढाल आहे.

अहो परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा; तोच त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे.

परमेश्वराने आमची दखल घेतली आहे आणि आम्हास आशीर्वाद देईल. तो इस्राएलाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. तो अहरोनाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.

जे परमेश्वराचा आदर करतात, त्या तरुण आणि वृद्ध या दोघांना तो आशीर्वाद देईल.

परमेश्वर तुम्हास अधिकाधिक वाढवो, तो तुमची आणि तुमच्या वंशजांची वाढ करो.

आकाश व पृथ्वी ही निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा तुम्हास आशीर्वाद असो.

स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण त्यांने मानवजातीला पृथ्वी दिली आहे.

मरण पावलेले म्हणजे निवांतस्थानी उतरलेले कोणीहि परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.

पण आम्ही आता आणि सदासर्वकाळ परमेश्वरास धन्यवाद देत राहू. परमेश्वराची स्तुती करा.

स्तोत्र १२९

खोलातून मी तुला आर्त हाक मारतो, हे प्रभु. हे प्रभु, माझा आवाज ऐक; माझ्या विनवणीचा आवाज ऐकण्यासाठी तुझे कान सजग असू दे. जर तू, हे प्रभु, पापांची नोंद ठेवशील — तर, हे प्रभु, कोण उभा राहील? पण तुझ्याजवळ क्षमा आहे — म्हणून तू भय करण्याजोगा आहेस. तुझ्या नावाकरता मी वाट पाहिली, हे प्रभु; माझ्या आत्म्याने तुझ्या वचनाची वाट पाहिली. माझ्या आत्म्याने प्रभुची वाट पहाटेच्या राखणदारांपेक्षा अधिक; होय, पहाटेच्या राखणदारांपेक्षा अधिक. इस्राएलने प्रभुची वाट पाहो; कारण प्रभुकडे दया आहे; आणि त्याच्याकडे मुबलक तारण आहे; आणि तो इस्राएलला त्यांच्या सर्व पापांपासून सोडवील. अल्लेलूया.

स्तोत्र 120

माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, आणि त्याने मला उत्तर दिले.

हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.

हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार?

तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.

मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.

शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे.

मी शांतीप्रिय मनुष्य आहे, पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात.

स्तोत्र १३१

हे प्रभु, दाविदाचा आणि त्याच्या सर्व कष्टांचा स्मरण कर; त्याने प्रभुस शपथ घेतली, याकोबाच्या देवाला व्रत केले: मी माझ्या घराच्या तंबूत शिरणार नाही, मी माझ्या शय्येवर जाणार नाही; मी माझ्या डोळ्यांना झोप देणार नाही, माझ्या पापण्यांना डुलकी देणार नाही, आणि माझ्या कपाळाला विश्रांती देणार नाही — जोपर्यंत मी प्रभुसाठी स्थान, याकोबाच्या देवाकरिता निवासस्थान शोधत नाही. पाहा, आम्ही ते एप्राथामध्ये ऐकले, आणि जंगलाच्या शिवारात आम्ही ते सापडले. आपण त्याच्या निवासस्थानी जाऊया; आणि त्या ठिकाणी नतमस्तक होऊया — जिथे त्याचे पाय उभे राहिले.

उठ, हे प्रभु, तुझ्या विश्रांतीकरिता — तू आणि तुझ्या सामर्थ्याचा संदूक. तुझे याजक न्यायाने परिधान करोत; आणि तुझे भक्त आनंद मानोत. दाविद तुझ्या दासाकरिता — तुझ्या अभिषिक्ताचा चेहरा परत वळवू नकोस. प्रभुने दाविदाला सत्याने शपथ खाल्ली आणि तो परत घेणार नाही: मी तुझ्या उदराच्या फलापैकी एकास तुझ्या सिंहासनावर बसवीन. तुझे पुत्र जर माझा करार व माझी साक्ष — जी मी त्यांना शिकवीन — राखतील; तर त्यांचे पुत्रही तुझ्या सिंहासनावर सदैवपर्यंत बसतील. कारण प्रभुने सियोनाची निवड केली आहे; तिला त्याने आपले निवासस्थान म्हणून अभिलाषा केली आहे: हे माझ्या विश्रांतीचे स्थान आहे — सदैवपर्यंत; मी येथे राहीन — कारण मी हिची इच्छा केली आहे. तिच्या धान्याला मी विपुल आशीर्वाद देईन; तिच्या गरिबांना मी भाकरीने तृप्त करीन. तिच्या याजकांना मी तारणाने परिधान करीन; आणि तिचे भक्त आनंदाने हर्षभरित होतील. मी तेथे दाविदाकरिता एक शिंग उभे करीन; माझ्या अभिषिक्ताकरिता एक दिवा तयार केला आहे. त्याच्या शत्रूंना मी लाजेने परिधान करीन; पण त्याच्यावर माझे पवित्रत्व फुलेल. अल्लेलूया.

स्तोत्र १३२

पाहा, बंधू एकत्र राहतात — किती चांगले आणि किती रम्य! मस्तकावरच्या उत्तम तेलाप्रमाणे — जे दाढीवर उतरते — हारोनच्या दाढीवर — त्याच्या वस्त्राच्या करवतीवर उतरते; आणि हर्मोनच्या दवाप्रमाणे — जो सियोनच्या पर्वतांवर पडतो; कारण तिथे प्रभुने आशीर्वाद आणि सदैवचे जीवन ठरविले आहे. अल्लेलूया.

स्तोत्र 129

इस्राएलाने आता म्हणावे की, माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे.

त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, तरी ते मला पराजित करू शकले नाहीत.

नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; त्यांनी आपली तासे लांब केली.

परमेश्वर न्यायी आहे; त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत.

जे सियोनेचा तिरस्कार करतात, ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत.

ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत.

त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.

त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.”

स्तोत्र 130

हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.

हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत.

हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?

पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.

मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.

पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.

हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. कारण परमेश्वर दयाळू आहे, आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे.

तोच इस्राएलास त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करीन.

स्तोत्र 131

हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही. मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही, किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही.

खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे; जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते; तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे.

हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ तू परमेश्वरावर आशा ठेव.

स्तोत्र 132

हे परमेश्वरा, दावीदाकरता त्याच्या सर्व दुःखांची आठवण कर.

त्याने परमेश्वराकडे कशी शपथ वाहिली, त्याने याकोबाच्या समर्थ प्रभूला कसा नवस केला, याची आठवण कर.

तो म्हणाला “मी आपल्या घरात किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही.

मी आपल्या डोळ्यांवर झोप किंवा आपल्या पापण्यास विसावा देणार नाही.

परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या सर्वसमर्थ देवासाठी निवासमंडप सापडेपर्यंत मी असेच करीन.”

पाहा, आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले; आम्हास तो जारच्या रानात सापडला.

आम्ही देवाच्या निवासमंडपात जाऊ; आम्ही त्याच्या पदासनापाशी आराधना करू आणि म्हणू.

हे परमेश्वरा, ऊठ; तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रांतीस्थानी ये,

तुझे याजक नितीमत्तेचे वस्रे पांघरोत; तुझे विश्वासू आनंदाने जयघोष करोत.

तुझा सेवक दावीदाकरिता, तू आपल्या अभिषिक्त राजापासून निघून जाऊ नकोस.

परमेश्वराने विश्वसनीय दावीदाजवळ शपथ वाहिली आहे; तो त्याच्या शपथेपासून माघार घेणार नाही, मी तुझ्या वंशातून तुझ्या राजासनावर एकाला बसवीन.

जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला, आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले, तर त्यांची मुलेसुद्धा तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील.

खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे; त्याच्या वस्तीसाठी त्याने इच्छा धरली आहे.

“ही जागा सर्वकाळ माझ्या विसाव्याची आहे; मी येथे राहीन, कारण माझी इच्छा आहे.

मी तिला विपुलतेने अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन; मी तिच्या गरीबांना भाकरीने तृप्त करीन.

मी तिच्या याजकांना तारणाचे वस्त्र नेसवीन; तिचे भक्त आनंदाने मोठ्याने जयघोष करतील.

तेथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल असे मी करीन; तेथे मी आपल्या अभिषिक्तासाठी दिवा ठेविला आहे.

मी त्याच्या शत्रूंला लाजेचे वस्रे नेसवीन, परंतु त्याचा मुकुट चमकेल.”

स्तोत्र 133

पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे.

ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे, त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमूल्य तेलासारखे आहे.

सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.

स्तोत्र 136

परमेश्वराची उपकारस्तुती करा; कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

देवांच्या देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

प्रभूंच्या प्रभूंची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

जो एकटाच महान चमत्कार करतो त्याची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

ज्याने बुद्धीने आकाश निर्माण केले त्याची, उपकारस्तुती करा, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

ज्याने जलावर पृथ्वी पसरवली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

ज्याने मोठा प्रकाश निर्माण केला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

दिवसावर राज्य करण्यासाठी त्याने सूर्याची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

त्याने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि ताऱ्यांची निर्मिती केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

त्याने मिसराचे पहिले जन्मलेले मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

आणि ज्याने इस्राएलाला त्यांच्यामधून बाहेर काढले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

ज्याने सामर्थ्यी हाताने आणि बाहू उभारून त्यांना बाहेर आणले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

ज्याने लाल समुद्र दुभागला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

ज्याने इस्राएलाला त्यामधून पार नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

ज्याने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात उलथून टाकले. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

ज्याने आपल्या लोकांस रानातून नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

ज्याने महान राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

आणि ज्याने प्रसिद्ध राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

ज्याने अमोऱ्यांच्या सीहोन राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

आणि ज्याने बाशानाच्या ओग राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

आणि ज्याने त्यांचा देश वतन असा दिला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

ज्याने तो इस्राएल त्याचा सेवक याला वतन म्हणून दिला. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

ज्याने आमच्या कठीन परिस्थितीत आमची आठवण केली आणि आम्हास मदत केली, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

ज्याने आम्हास आमच्या शत्रूंवर विजय दिला त्याची, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

जो सर्व जिवंत प्राण्यांना अन्न देतो. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

स्वर्गातील देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

स्तोत्र 140

हे परमेश्वरा, मला दुष्टांपासून सोडव; जुलमी मनुष्यापासून मला सुरक्षित ठेव.

ते आपल्या मनात वाईट योजना करतात; ते प्रत्येक दिवशी भांडणाला सुरुवात करतात.

त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते; त्यांच्या ओठाखाली विषारी सर्पाचे विष आहे.

हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव; मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव. त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे.

गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश व दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूला जाळे पसरले आहे; त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आहे.

मी परमेश्वरास म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे.

हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, माझ्या लढाईच्या दिवसात तू माझे शिरस्राण आहेस.

हे परमेश्वरा, दुष्टांच्या इच्छा पुरवू नको, त्यांच्या दुष्ट योजना यशस्वी होऊ देऊ नकोस. नाही तर ते उन्मत्त होतील.

ज्यांनी मला घेरले आहे; त्यांच्या ओठापासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो.

त्यांच्यावर जळते निखारे पडोत; त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर कधीही येता येणार नाही अशा खड्‌यात फेकण्यात येवो.

वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही; जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल.

परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे, आणि गरजवंताच्या वादाचे समर्थन करील हे मला माहित आहे.

खचित नितीमान तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील; सरळ मनाचे तुझ्या समक्षतेत राहतील.

स्तोत्र 145

माझ्या देवा, हे राजा, मी तुझी खूप स्तुती करीन; मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.

प्रत्येक दिवशी मी तुझा धन्यवाद करीन. मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचे स्तवन करीन.

परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे; त्याची महानता अनाकलनीय आहे.

एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील.

ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील, मी तुझ्या अद्भुत कार्यांचे मनन करीन.

ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील, मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन.

ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील, आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील.

परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.

परमेश्वर सर्वांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.

हे परमेश्वरा, तू केलेली सर्व कृत्ये तुला धन्यवाद देतील; तुझे भक्त तुला धन्यवाद देतील.

ते तुझ्या राज्याच्या गौरवाविषयी सांगतील, आणि तुझ्या सामर्थ्याविषयी बोलतील.

हे यासाठी की, त्यांनी देवाची पराक्रमी कृत्ये आणि त्याच्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळवावी.

तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. आणि तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे.

पडत असलेल्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, आणि वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो.

सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.

तू आपला हात उघडून प्रत्येक जिवंत प्राण्याची इच्छा तृप्त करतो.

परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे; आणि तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.

जे कोणी त्याचा धावा करतात, जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.

तो त्याचे भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो; तो त्यांची आरोळी ऐकून त्यांना वाचवतो.

परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो. परंतु तो वाईटांचा नाश करतो.

माझे मुख परमेश्वराची स्तुती करील. सर्व मानवजात त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद सदासर्वकाळ व कायम करो.

तुला प्रणाम

तुला शांती असो. आम्ही तुझी विनवणी करतो, हे गौरवाने परिपूर्ण अशी सदैवची कुमारी, देवाची माता, ख्रिस्ताची आई; आमच्या प्रार्थना तुझ्या प्रिय पुत्राकडे उंचाव, की तो आमची पापे क्षमा करो.

जिने आम्हांला खऱ्या प्रकाशाचा — ख्रिस्त आमचा देव — जन्म दिला, त्या पवित्र कुमारिकेला शांती असो. प्रभूला आमच्यासाठी विनव, की तो आमच्या आत्म्यांवर दया करो, आणि आमची पापे क्षमा करो.

हे कुमारी मरियम, देवाची माता, मानवजातीची विश्वासू मध्यस्थ पवित्र, तू प्रसवलेल्या ख्रिस्तासमोर आमच्यासाठी प्रार्थना कर; की तो आमच्या पापांची क्षमा आम्हांला कृपेने देवो.

हे कुमारी, खऱ्या राणी, तुला शांती असो; आमच्या वंशाचा अभिमान तुला शांती असो; तू आम्हांला इम्मानुएलास जन्म दिलास. आम्ही तुझी विनंति करतो: आम्हांस स्मर, हे विश्वस्त मध्यस्थ, आमच्या प्रभू येशू ख्रिस्तासमोर; की तो आमची पापे क्षमा करो.

संत योहानानुसार पवित्र सुवार्ता (6:15-23)

¶ मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.

¶ संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली सरोवराकडे गेले;

आणि एका तारवात बसून सरोवराच्या दुसर्‍या बाजूस कफर्णहूमकडे जाऊ लागले. इतक्यात अंधार झाला होता आणि येशू त्यांच्याकडे आला नव्हता.

आणि मोठा वारा सुटून सरोवर खवळू लागले होते.

मग त्यांनी सुमारे सहा किलोमीटर वल्हवून गेल्यावर येशूला पाण्यावरून तारवाजवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले.

पण तो त्यांना म्हणाला, ‹“मी आहे, भिऊ नका.”›

म्हणून त्यास तारवात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्यांला जायचे होते त्याठिकाणी तारू किनाऱ्यास लावले.

¶ दुसर्‍या दिवशी जो लोकसमुदाय सरोवराच्या दुसर्‍या बाजूस उभा होता त्यांने पाहिले की, ज्या लहान होडीत त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरे तारू नव्हते आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या तारवावर चढला नव्हता. तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते.

तरी प्रभूने उपकार मानल्यावर त्यांनी जेथे भाकर खाल्ली त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरी लहान तारवे आले होते.

Tenoo oasht emmok o piekhristos

नेम पेक्योट एन अघाथोस नेम पी एप्नेव्मा एथोवाब जे आकी आक सोआती एम्‍मोन नाय नान

हे ख्रिस्ता, तुझ्या हितकर पित्याबरोबर व पवित्र आत्म्यासोबत आम्ही तुझी उपासना करतो; कारण तू आला आहेस व आम्हाला तारले आहेस.

1. प्रभो, माझ्या शत्रूंची जागरूकता तुला ठाऊक आहे; आणि माझ्या दुर्बलतेबद्दल, हे माझ्या सर्जनकर्ता, तू जाणतोस. म्हणूनच मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो. तुझ्या कल्याणाच्या पंखांनी मला झाकून ठेव, जेणेकरून मी मृत्यूपर्यंत झोपू नये. तुझ्या उदात्त वचनेच्या महानतेने माझे डोळे उजळव, आणि नेहमी मला तुझ्या गौरवासाठी उठव; कारण फक्त तूच चांगला आहेस आणि मनुष्यप्रेमी आहेस.

पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास महिमा असो.

पित्याला, पुत्राला आणि पवित्र आत्म्यास महिमा असो.

2. प्रभो, तुझा न्याय भयंकर आहे; जेव्हा मनुष्य घाईघाईने उभे केले जातील, देवदूत उभे राहतील, पुस्तके उघडली जातील, कृत्ये उघडकीस येतील, व विचारांची परीक्षा होईल—माझा न्याय कसा असेल, जो पापात गुरफटलेला आहे?! माझ्याभोवती असलेल्या अग्नीच्या ज्वाळा कोण शमेल? माझ्या अंध:काराला कोण प्रकाश देईल, तुझ्यावाचून, प्रभो? माझ्यावर दया कर; कारण तू मनुष्यावर दयाळू आहेस.

आता आणि सदैव व युगानुयुगे, आमेन.

आता आणि सदैव व युगानुयुगे, आमेन.

3. हे देवजननी, कारण आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला आहे, आम्ही लज्जित होणार नाही, तर तारण पावू. आणि कारण आम्हांस तुझे साहाय्य व मध्यस्थी लाभले आहे, हे निष्कलंक व सिद्ध, आम्ही भय करणार नाही, तर शत्रूंना दूर लोटू व त्यांना पांगवू. आणि सर्व गोष्टींमध्ये, आम्ही तुला महान साहाय्य म्हणून कवचाप्रमाणे घेऊन संरक्षण पावतो. आम्ही विनंती करतो व आर्जव करतो, हाका मारत, हे देवजननी, की तुझ्या मध्यस्थीतून आम्हांस तार; आणि आम्हांस गाढ झोपेतून उठव, ज्यायोगे आम्ही देह धारण करून आलेल्या देवास समर्थपणे गौरव देऊ.

Κύριε ἐλέησον क्यिरिये एलेइसोन (प्रभु, दया कर) 41 वेळा

पवित्र, पवित्र, पवित्र

पवित्र, पवित्र, पवित्र — सैन्यांचा प्रभु. आकाश व पृथ्वी तुझ्या गौरवाने व मानाने परिपूर्ण आहेत. हे देव पिता, सर्वशक्तिमान, आमच्यावर दया कर. हे पवित्र त्रित्व, आमच्यावर दया कर. हे सेनाधीश प्रभु देवा, आमच्यासोबत राह; कारण आमच्या संकटात व क्लेशांत तुझ्याशिवाय आमचा कोणीही सहाय्यकारी नाही.

हे देवा, आमच्या अपराधांबद्दल आम्हांला मुक्त कर, क्षमा कर, आणि सोडव; जे आम्ही स्वेच्छेने केले आणि जे अनवधानाने केले; जे आम्ही जाणूनबुजून केले आणि जे अज्ञानाने केले; गुप्त आणि उघड — हे प्रभु, तुझ्या पवित्र नावासाठी, जे आमच्यावर उद्‍घोषित आहे, ते सर्व आम्हांला क्षमा कर; तुझ्या दयेप्रमाणे, प्रभु — आमच्या पापांप्रमाणे नव्हे.

आणि आम्हांला पात्र कर की आम्ही कृतज्ञतेने म्हणू: आमच्या स्वर्गस्थ पित्या..

क्षमा

हे स्वामी, प्रभु येशू ख्रिस्त, आमच्या देव, आम्हांला आमच्या निद्रेस विश्रांती दे, आमच्या देहांना विश्राम दे, आणि आमच्या आत्म्यांना पवित्रता दे. पापाच्या अंध:कारापासून आम्हांला जप. कामुकतेची हालचाल थांबो; देहाची उष्णता शमू दे. देहाचा गोंधळ नष्ट होवो. आम्हांला जागृत मन दे; नम्र विचार दे; सद्गुणांनी परिपूर्ण चाल दे; बिघडारहित शय्या दे; स्वच्छ शयन दे.

आणि आम्हांला रात्रीच्या व प्रातःकाळच्या स्तुतीसाठी उठव; तुझ्या आज्ञांत स्थिर; आणि तुझ्या न्यायांच्या सततच्या स्मरणात आम्हांला जप. आम्हांला सारी रात्र गौरव अर्पण करणे दे; की आम्ही तुझे पवित्र नाव, गौरव आणि तेजाने परिपूर्ण, धन्य करू — तुझ्या चांगल्या पित्याबरोबर आणि जीवनदायी पवित्र आत्म्यासह — आता आणि सदैव आणि सर्व युगांच्या युगांपर्यंत, आमेन.

प्रत्येक प्रहराच्या शेवटी केली जाणारी विनवणी

हे देवा, आमच्यावर दया कर; मग पुन्हा दया कर. जो सर्वकाळ आणि प्रत्येक क्षणी, स्वर्गात आणि पृथ्वीवर, वंदनीय आणि गौरवित — आमचा चांगला ख्रिस्त देव — दीर्घशांतीचा, विपुल दयेचा, व अतिशय करुणामय; जो धर्मीजनांवर प्रेम करतो आणि पाप्यांवर दया करतो, ज्याचा मी पहिला आहे; जो पाप्याचा मृत्यू इच्छित नाही, तर त्याची परतफेड व जीवन इच्छितो; जो सर्वांना उध्दाराकडे बोलावतो, येणाऱ्या चांगल्या वस्तूंच्या वचनासाठी.

हे प्रभु, या क्षणी व प्रत्येक क्षणी आमच्या विनंत्या स्वीकार. आमचे जीवन सुलभ कर; आम्हांला तुझ्या आज्ञांचे पालन करण्यास मार्गदर्शित कर. आमच्या आत्म्यांना पवित्र कर. आमच्या देहांना शुद्ध कर. आमचे विचार उभे कर. आमच्या इच्छांना शुद्ध कर. आमच्या आजारांना आरोग्य दे आणि आमची पापे क्षमा कर. सर्व वाईट दु:ख व हृदयदुखण्यापासून आम्हांला सोडव. तुझ्या पवित्र दूतांनी आम्हांला वेढून ठेव, की त्यांच्या छावणीत आम्ही राखलेले व मार्गदर्शित होऊ; आणि आम्ही विश्वासाच्या ऐक्याला आणि तुझ्या अगम्य व अमर्याद गौरवाच्या ज्ञानाला पोहोचू — कारण तू अनंतकाळपर्यंत धन्य आहेस. आमेन.

हे देवा, आम्हांला पात्र कर की आम्ही कृतज्ञतापूर्वक म्हणू: आमच्या स्वर्गस्थ पित्या...

प्रत्येक प्रहराचा समारोप