TSK

TSK · 1 इति 21:14

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

रात्रीच्या वेळी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिसराचे लोक जागे झाले आणि मिसर देशात मोठा हाहा:कार उडाला, कारण ज्यात कोणी मरण पावले नाही असे एकही घर राहिले नाही.

या मरीमुळे एकून चोवीस हजार लोक मरण पावले.

तेव्हा परमेश्वराने इस्राएलवर रोगराई ओढवू दिली. सकाळी तिची सुरुवात होऊन नेमलेल्या काळपर्यंत ती राहिली. दानपासून बैर-शेबापर्यंत सत्तर हजार माणसे मृत्युमुखी पडली.

सरुवेचा पुत्र यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली पण तो ते काम पूर्ण करु शकला नाही. देवाचा इस्राएलाच्या लोकांवर कोप झाला. त्यामुळे ही मोजणी दावीद राजाच्या बखरीत नोंदवलेली नाही.