माझ्यासमोर तुला इतर कोणतेही दुसरे देव नसावेत.
TSK
TSK · 1 योहा 5:21
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
त्यांच्यापैकी काहीजण मूर्तीपुजक होते तसे होऊ नका. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “लोक खाण्यापिण्यास खाली बसले आणि ते मूर्तीसमोर शरीरासंबंधाच्या हेतूने नाच करण्यासाठी उठले.”
आणि देवाच्या निवासस्थानाचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे निवास्थान आहात कारण देवाने म्हणले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’
¶ माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हास या गोष्टी लिहीत आहे, पण जर तुम्हांपैकी एखादा पाप करतो तर त्याच्यासाठी पित्याजवळ आपला कैवारी येशू ख्रिस्त जो नीतिमान तो आहे.
आणि त्यास त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणाऱ्यांना फसवतो आणि ज्या पशूला तलवारीचा घाव लागला असताही जो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणाऱ्यांस सांगतो.