TSK

TSK · 2 इति 16:10

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तिला आपल्याकडे घेऊन यायला दावीदाने निरोप्याला पाठवले. ती आल्यावर दावीदाने तिच्याशी शरीरसंबंध केला, नंतर स्नान करून शुध्द होऊन ती पुन्हा आपल्या घरी परतली.

राब्बा नगरातील लोकांसही त्याने बाहेर नेले त्यांना कुऱ्हाडी, करवती, लोखंडी दाताळी यांनी काम करायला ठेवले. त्यांच्याकडून जबरदस्तीने वीट कामही करून घेतले. सर्व अम्मोनी नगरांमध्ये दावीदाने असेच केले. नंतर दावीद आपल्या सैन्यासह यरूशलेमेला परतला.

राजाने जेव्हा देवाच्या मनुष्याचे हे वेदीबद्दलचे बोलणे बेथेल येथे ऐकले. तेव्हा यराबामाने वेदीवरील आपला हात उचलून त्या मनुष्याकडे निर्देश करत म्हटले, “पकडा त्याला” मग ज्या हाताने त्याने त्या मनुष्याकडे निर्देश केला होता तो हे बोलत असताना लुळा पडला. त्यास तो हलवता येईना

अमस्या संदेष्ट्याच्या या बोलण्यावर म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार म्हणून नेमलेले नाही, तेव्हा तू गप्प रहावे हे चांगले नाहीतर जिवाला मुकशील.” संदेष्टा गप्प बसला पण नंतर म्हणाला, “देवाने तुझा नाश करायचे निश्चित केले आहे. कारण तू करु नये त्या गोष्टी केल्यास आणि माझे ऐकले नाहीस.”

कारण त्याने गरीबांना कष्ट दिले. त्यांना वाईट वागवले. त्याने त्यांची काळजी घेतली नाही. त्यांच्या वस्तू हिसकावून घेतल्या. दुसऱ्यांनी बांधलेली घरे त्यांनी बळकावली.

जो निंदकाला सुबोध करतो तो अप्रतिष्ठेला आंमत्रण करतो, आणि जो दुर्जन मनुष्यास बोल लावतो तो आपले नुकसान करून घेतो.

म्हणून पशहूराने यिर्मया या संदेष्ट्याला मारले व परमेश्वराच्या मंदिरात, बन्यामीनच्या वरच्या प्रवेशद्वाराच्या खोड्यात त्यास घातले.

यरूशलेम म्हणते, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने मला खाऊन टाकले आहे. त्याने मला निचरून कोरडे केले आहे आणि मला रिकामे पात्र करून ठेवले आहे. त्याने मला अजगराप्रमाणे गिळून टाकले आहे.

हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरूंगात टाकले होते.

मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेचे नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला.