TSK

TSK · 2 इति 18:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तेव्हा परमेश्वराचा दूत बलामास म्हणाला, नाही! तू या लोकांबरोबर जाऊ शकतोस. पण सावध रहा. मी जे सांगेन तेच शब्द बोल. म्हणून बलाम बालाकाने पाठवलेल्या पुढाऱ्यांबरोबर गेला.

बलामाने बालाकाला उत्तर दिले, मी तुला आधीच सांगितले होते की परमेश्वर जे सांगेल तेच मला बोलता येईल.

पण मीखाया म्हणाला, “नाही, कदापि नाही. जे परमेश्वर माझ्याकडून वदवतो तेच मी सांगेन. माझी तशी प्रतिज्ञाच आहे.”

¶ मग यिर्मया संदेष्टा त्यांना म्हणाला, “मी तुमचे ऐकले आहे. पाहा, मी तुमच्या विनंतीप्रमाणे तुमचा देव परमेश्वराकडे प्रार्थना करीन. जे काही परमेश्वर उत्तर देईल, मी तुम्हास सांगीन. मी तुमच्यापासून काहीही लपविणार नाही.”

“तुम्ही भविष्य सांगू नका, असे ते म्हणतात, या गोष्टीविषयी भविष्य सांगू नये; अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.”

¶ कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हास दिले. प्रभू येशूचा, ज्या रात्री विश्वासघात करण्यात आला. त्याने भाकर घेतली,

¶ मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवीत असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.