नंतर देवाने अबीमलेख व शखेमातली माणसे यांच्यामध्ये दुष्ट आत्मा पाठवला, म्हणून शखेमातले लोक अबीमलेखाशी कपटाने वागू लागले;
TSK
TSK · 2 इति 18:21
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
परमेश्वर म्हणाला, “इस्राएलचा राजा अहाब याला रामोथ-गिलादावर हल्ला करायला कोण बरे युक्तीने प्रवृत्त करील? म्हणजे अहाबाच्या तेथेच शेवट होईल.” आणि एकजण म्हणाला या मार्गाने दुसऱ्याने म्हटले त्या मार्गाने,
परमेश्वर सैतानास म्हणाला, “पाहा, त्याचे सर्व जे काही आहे ते तुझ्या अधिकारात आहे, फक्त त्यास तुझ्या हाताचा स्पर्श करू नको.” मग सैतान परमेश्वरापुढून निघून गेला.
त्यास शाप देणे आवडते, म्हणून तो परत त्याच्यावर आला. त्याने आशीर्वादाचा द्वेष केला; म्हणून त्याच्यावर आशीर्वाद आले नाहीत.
पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा कोणता आणि फसवणारा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.
आणि त्यास त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणाऱ्यांना फसवतो आणि ज्या पशूला तलवारीचा घाव लागला असताही जो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणाऱ्यांस सांगतो.