TSK

TSK · 2 इति 2:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

हे परमेश्वरा, देवांमध्ये तुजसमान कोण आहे? पवित्रतेने ऐश्वर्यवान, स्तवनात भयानक, अद्भुते करणारा असा तुजसमान कोण आहे?

हे मंदिर नामशेष होईल; ते पाहणारे स्तंभित होतील आणि म्हणतील, ‘परमेश्वराने या देशाचा आणि या मंदिराचे असे का केले बरे?’

¶ राजा दावीद सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “माझा पुत्र शलमोन यालाच देवाने निवडले आहे. तो अजून सुकुमार व अनुभवी आहे. पण हे काम फार महत्वाचे आहे. हे भवन काही मनुष्यांसाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे.

मी बांधायला घेतलेले मंदिर चांगले विशाल आणि सुंदर होणार असल्यामुळे मला मोठ्या प्रमाणावर लाकूड लागणार आहे.

तेव्हा पुत्रांनो आता, आळसात वेळ घालवू नका. परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी तुमची निवड केली आहे. मंदिरात त्याची सेवाचाकरी करणे, धूप जाळणे यासाठी तुम्हास त्याने निवडले आहे.”

परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे, आमचा प्रभू सर्व देवांच्या वर आहे.

आकाशावरील आकाशांनो आणि आकाशावरील जलांनो त्याची स्तुती करा.

परमेश्वर तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तू महान आहेस आणि तुझ्या नावातच सामर्थ्य आहे.

जो धन्यवादीत, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू,