TSK

TSK · 2 इति 20:22

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

सातव्या वेळी याजक कर्णे वाजवीत असताना यहोशवा लोकांस म्हणाला, “जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे;

तेव्हा बन्यामिनातील गिब्यांतल्या शौलाच्या पहारेकऱ्यांनी पाहिले की पलिष्टी सैन्याचा जमाव पांगत आहे आणि ते इकडे तिकडे पळत आहेत.

त्यांनी माझी चेष्टा केली, पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला, आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला.

गायन आणि वादन एका सुरात चालले होते. एका सुरात त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले आणि त्यास धन्यवाद दिले. कर्णे, झांजा आणि इतर वाद्या सोबत त्यांनी उच्च स्वरात परमेश्वराची स्तुती केली. त्यांच्या गायनाचा आशय असा होता: “परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याची खरी प्रीती सर्वकाळ राहते.” तेव्हा परमेश्वराचे सर्व मंदिर मेघाने भरुन गेले.

मग अबीयाच्या सैन्यातील लोकांनी जयघोष केला त्याचवेळेस देवाने यराबामाच्या सैन्याचा पराभव केला. अबीयाच्या यहूदा सैन्याने यराबामाच्या इस्राएली सैन्याचा पाडाव केला.

मृत्यूच्या दोऱ्यांनी मला घेरीले, आणि नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले आहे.

देव म्हणतो, मी मिसऱ्यांना मिसराविरूद्ध चिथावेल, ते माणसे आपल्या भावाविरूद्ध, आणि आपल्या शेजाऱ्याविरूद्ध; नगर नगराविरूद्ध आणि राज्य राज्याविरूद्ध लढेल.