TSK

TSK · 2 इति 20:28

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

दावीद आणि सर्व इस्राएल आपल्या सर्व शक्तीने देवापुढे जल्लोष करत चालले होते. ते स्तुतिगीते गात, वीणा, सतार, डफ झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते.

¶ हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.

दहा तारांचे वाद्य, वीणेवर आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे.

ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.

आणि अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी व मेघ गडगडाटाच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जसे वीणावादक आपल्या वीणा वाजवत आहेत अशी ती होती.