TSK

TSK · 2 इति 25:27

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

त्यानंतर लिब्ना सोडून सर्व इस्राएलासह यहोशवा लाखीशावर चालून गेला. त्याने त्यासमोर तळ दिला आणि त्याच्याविरुध्द लढला.

त्यांनी यरूशलेमामध्ये अमस्याविरुध्द कट केला, तेव्हा तो लाखीश येथे पळाला. पण त्यांनी त्यांच्यामागे लाखीशास माणसे पाठवून तेथे त्यास जिवे मारले.

अजऱ्या आसाच्या भेटीला गेला आणि म्हणाला, “आसा मी काय म्हणतो ते ऐक. यहूदा आणि बन्यामीन लोकहो, तुम्हीही ऐका. जर तुम्ही परमेश्वराबरोबर राहिलात तर तो तुमच्याबरोबर राहील. जर तुम्ही त्याचा शोध केलात तर तो तुम्हास भेटेल. पण तुम्ही त्यास सोडलेत तर तो ही तुम्हास सोडेल.

अरामी सेना योवाशाला घायाळ अवस्थेत सोडून गेले तेव्हा योवाशाच्या सेवकांनीच त्याच्याविरुध्द कट केला. यहोयादा या याजकाच्या पुत्राला, जखऱ्याला योवाशाने जीवे मारल्यामुळे ते या कारस्थानाला प्रवृत्त झाले. योवाशाला त्यांनी त्याच्या शय्येवरच ठार केले. दावीद नगरात लोकांनी त्यास मूठमाती दिली. पण राजांच्या दफन भूमीत त्याचे दफन केले नाही.