TSK

TSK · 2 इति 33:25

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

परंतु तुमच्या रक्तासाठी, जे रक्त तुमचे जीवन आहे, त्याबद्दल मी आवश्यक भरपाई घेईन. प्रत्येक प्राण्याच्या हातून मी ती घेईन. मनुष्याच्या हातून, म्हणजे ज्याने आपल्या भावाचा खून केला आहे त्याच्या हातून, त्या मनुष्याच्या जिवाबद्दल मी भरपाईची मागणी करीन.

¶ ज्या देशात तुम्ही रहाल तो भ्रष्ट करू नका. कारण खुनाने देश भ्रष्ट होतो आणि रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्चित होऊ शकत नाही.

¶ अमस्याचा पुत्र उज्जीया याला यहूदाच्या लोकांनी अमस्याच्या गादीवर बसवले. उज्जीया तेव्हा सोळा वर्षांचा होता.

¶ यहूदाच्या लोकांनी यरूशलेमेचा नवा राजा म्हणून यहोआहाजाची निवड केली; योआहाज हा योशीयाचा पुत्र.