मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “देवाला प्रश्र विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात.
TSK
TSK · 2 इति 34:21
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे जर तुम्ही ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व शाप तुमच्यामागे लागतील:
पण तुम्ही परमेश्वराकडे पाठ फिरवलीत, त्याचे ऐकले नाहीत, इतर दैवतांचे भजन पूजन केलेत;
पण यशुरुन पुष्ट होऊन लाथा झाडू लागला. तो धष्टपुष्ट झाला! तो लठ्ठ झाला, तो तुकतुकीत झाला आणि त्याने आपल्या तारणकर्त्या देवाचा त्याग केला! आपले तारण करणारा दुर्गासारखा परमेश्वर तुच्छ मानला.
यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजास म्हटले, “प्रथम आपण परमेश्वराचा सल्ला घेतला पाहिजे.”
“आता जाऊन परमेश्वराचा कौल घ्या. मी, आपले लोक आणि सर्व यहूदा यांच्या वतीने त्यास या पुस्तकातील वचनांविषयी विचारा. परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. कारण आपल्या पूर्वंजांनी या पुस्तकातील वचनांचा भंग केला आहे. आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या सर्व गोष्टी त्यांनी आचरणात आणल्या नाहीत.
म्हणून यहूदा व यरूशलेमेच्या लोकांवर परमेश्वर कोपला. त्याने लोकांस शासन केले. परमेश्वराचा क्रोध पाहून इतर लोक विस्मयचकित झाले आणि घाबरले. यहूदी लोकांबद्दल त्यांना तिरस्कार आणि शरम वाटली. ही वस्तुस्थिती तुम्हास माहीत आहे. तुम्ही ती पाहतच आहात.
त्याने एल्याकीम जो घरावर कारभारी होता, आणि शेबना चिटणीस आणि याजकातील वडील यांना गोणपाट घातलेले असे आमोजाचा मुलगा यशया संदेष्ट्याकडे पाठवले, त्या सगळ्यांनी खास शोकप्रदर्शक कपडे घातले.
“आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर, कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्यावर स्वारी करीत आहे, कदाचित् परमेश्वर पूर्वीप्रमाणे काही विस्मयकारक घटना घडवून आणील व त्यास आमच्यापासून परतवून लावेल.”
¶ इस्राएलाच्या वडीलांपैकी कित्येक माणसे माझ्याकडे आले व माझ्यापुढे बसले
¶ वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.
कारण नियमशास्त्र क्रोधाला कारण होते. पण जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघन नाही.