TSK

TSK · 2 इति 4:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

आणि मी तुला पर्वतावर दाखवलेल्या नमुन्याप्रमाणेच या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे.

शुद्ध सोन्याच्या समया. (या परमपवित्र गाभाऱ्यासमोर उजवीडावीकडे पाच पाच लावलेल्या होत्या) सोन्याची फुले, दिवे आणि चिमटे ही सोन्याची करवली होती.

सोन्याच्या पात्रांसाठी, सर्व प्रकारच्या सेवेच्या सर्व पात्रांसाठी सोन्याचे वजन दिले. रुप्याच्या सर्व पात्रांसाठी सर्व प्रकारच्या सेवेच्या पात्रांसाठी रुप्याचे वजन दिले.

दावीद म्हणाला, “हे सर्व कार्य मी परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्या सर्व रुपरेषा त्याने मला समजावून सांगितलेल्या आहेत त्या मी लिहून ठेवल्या आहेत.”

मग मी (जखऱ्या) त्यास म्हणालो, “दिपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूस एकेक जैतूनाचे झाड काय आहेत?”

¶ पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, ‹“मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”›

‹जे सात तारे तू माझ्या हातात पाहिलेस आणि ज्या सात सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्यांचा गुपित अर्थ हा आहे की सात समया या सात मंडळ्या आहेत आणि सात तारे हे सात मंडळ्यांचे देवदूत आहेत.”›