TSK

TSK · 2 इति 5:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ परमेश्वराच्या पर्वतापासून तीन दिवसाचा प्रवास करीत गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्यासाठी जागा शोधायला तीन दिवसाच्या वाटेवर त्यांच्यापुढे गेला.

तरीपण दावीदाने सियोन किल्ला घेतला. दावीदपुर असे त्याचे नाव पडले.

¶ इस्राएलमधील सगळी वडिलधारी मंडळी, सर्व घराण्यांचे प्रमुख आणि वंशातील मुख्य यांना राजा शलमोनाने आपल्याबरोबर यरूशलेम येथे यायला सांगितले. दावीद नगरातून म्हणजे सियोनेतून वरती परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिरात आणण्यासाठी त्यांना त्याने बोलावले.

मग दावीदाने परमेश्वराच्या कोशासाठी जे ठिकाण तयार केले होते तेथे तो वर आणण्यासाठी सर्व इस्राएल लोकांस यरूशलेमेत एकत्र जमा केले.

¶ अशाप्रकारे दावीद, इस्राएलमधील वडीलजन, हजारांवरचे सरदार हे परमेश्वराच्या कराराचा कोश ओबेद-अदोमाच्या घरातून उत्साहाने आणण्यासाठी तिकडे गेले.

¶ आणि लेव्यांतला लेखक, नथनेलाचा पुत्र शमाया याने राजा व अधिकारी, सादोक याजक, अब्याथारचा पुत्र अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख ह्याच्यासमोर त्यांची नावे लिहिली. चिठ्ठ्या टाकून एलाजाराच्या कुळाच्या वंशातून निवड करण्यात येई आणि पुढच्या वेळेला इथामार यांच्या कुळातील वंशातून निवड करण्यात येई.

¶ दावीद राजा व पित्याच्या प्रमुखांनी व हजारांचे व शंभरांचे सेनापती आणि सैन्याचे सरदार यांनी मंदिरासाठी समर्पित केलेल्या वस्तूच्या भांडारावर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद देखरेख करत होते.

दाविदाने देवाचा कोश किर्याथ-यारीमाहून वर यरूशलेम येथे आणला होता. यरूशलेमेमध्ये तो ठेवण्यासाठी दाविदाने जागा तयार केली होती. कराराच्या कोशासाठी त्याने यरूशलेमेमध्ये एक तंबू उभारला होता.

मग सर्व लेवी गायक वेदीच्या पूर्वेला उभे राहिले आसाफ, हेमान आणि यदूथूनचे सर्व गायक वर्ग हजर होते. त्यांचे पुत्र आणि भाऊबंददेखील आले होते. यासर्वांनी शुभ्र तलम वस्त्रे घातली होती झांजा, सारंग्या आणि वीणा ही वाद्ये हातात घेवून वेदीच्या पुर्व टोकाकडे उभे होते. या लेवी गायकांबरोबर ऐकशे वीस याजक होते आणि ते कर्णे वाजवत होते.

याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे.