TSK

TSK · 2 इति 7:22

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व अन्य लोकांच्या देवांच्या नादी लागले, आणि त्यांच्या पाया पडले. त्यांनी परमेश्वरास क्रोधाविष्ट केले.

आणि मी त्यांच्याविरुद्ध माझा निर्णय घोषित करीन, कारण त्यांनी मला सोडून इतर देवतांपुढे धूप जाळला, आणि आपल्या हातांच्या कामांची पूजा केली, या त्यांच्या दुष्टाईबद्दल मी त्यांच्याविरुद्ध शिक्षा सांगेन.

तुझे सर्व शत्रू तुझ्याविरुध्द मोठे तोंड वासून तुझी थट्टा करतात. ते शिळ घालून दात-ओठ खातात व म्हणतात, “आम्ही तिचे प्राशन केले आहे. खात्रीने आम्ही याच दिवसाची वाट पाहत होतो. आम्ही तो दिवस शोधला! आणि तो पहिला आहे!”

तेव्हा त्यांचे मार्ग आणि कार्य पाहून तुम्हास दिलासा मिळेल, त्यांचे मी जे काही केले ते सगळे मी निरर्थक केले नाही. हे तुम्हास कळेल असे परमेश्वर देव म्हणतो.

¶ परमेश्वराने आमच्या आणि आमच्या शासकाच्या विरोधात बोललेल्या वचनाची खात्री आमच्यावर अरिष्ट पाठवून केली आहे. यरूशलेमेवर जे संकट आले तसे आकाशाखाली कोठेही झाले नाही.