TSK

TSK · 2 राजे 21:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ तुम्ही आठवण ठेवून माझ्या नियमाप्रमाणे चालावे व माझ्या आज्ञा पाळाव्या,

¶ आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात व तुमचा देव परमेश्वर याची वाणी तुम्ही ऐकाल तर तुमचा देव परमेश्वर तुम्हास पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल.

माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली, त्यांना रुजवले त्यांना जागोजागी भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले.

¶ माझ्या इस्राएल लोकांस मी एक जागा नेमून देईन आणि त्यांना त्याठिकाणी स्थिर करीन, म्हणजे ते आपल्या स्वतःच्या जागी राहतील व त्यांना कसलाही त्रास होणार नाही. पूर्वीसारखे दुष्ट लोक त्यांच्यावर जुलूम करणार नाही.

परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर; देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर.

जर तुमची इच्छा असेल व तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर तुम्हास या भूमीपासून चांगले खावयास मिळेल.

मी त्यांना फक्त पुढील आज्ञा दिली. माझी आज्ञा पाळा मग मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. तर मी आज्ञा केलेल्या सर्व मार्गात चाला, म्हणजे तुमचे चांगले होईल.

मग हे मानवाच्या मुला, तू न्याय करशील का? शहराच्या रक्ताचा न्याय तू करतो काय? त्याच्या सर्व घृणास्पद कामाची माहिती तुला आहे.