TSK

TSK · 2 शमु 22:40

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग दावीद व त्याची माणसे कईला येथे जाऊन पलिष्ट्यांशी लढली आणि त्यांनी त्यांची गुरेढोरे नेली व त्यांचा मोठा वध केला; असे दावीदाने कईलकरास तारले.

कारण युद्धाकरिता तू सामर्थ्याने माझी कंबर बांधली आहे, जे माझ्याविरूद्ध उठले होते त्यांना तू खाली पाडले आहे.

तो माझा दयानिधी व माझा दुर्ग, माझा उंच बुरुज आणि मला सोडवणारा, माझी ढाल आहे आणि मी त्याचा आश्रय घेतो; तो लोकांस माझ्या सत्तेखाली आणतो.

ज्यांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील, ते तुझ्या पायावर झुकतील. ते तुला परमेश्वराचे नगर म्हणतील, इस्राएलाच्या पवित्राचे सियोन म्हणून संबोधतील.

¶ आणि त्यांनी नवे गाणे गाईलेः “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने खंडणी भरून प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रांतून देवासाठी माणसे विकत घेतली आहेत.