TSK

TSK · 2 शमु 22:46

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

परमेश्वर जेव्हा पृथीवर हाहाकार करण्यास उठेल तेव्हा परमेश्वराच्या भयामुळे व त्याच्या तेजाच्या भव्यतेमुळे लोक खडकातील गुहेत व जमिनीतील भगदाडात शिरतील.

कारण आम्ही सगळे त्या प्रमाणे झालो आहोत जे अशुद्ध आहे. आणि आमच्या सर्व नीतिमान कृती या मासिक पाळीच्या चिंध्यांसारख्या आहेत, आम्ही सर्व पानांप्रमाणे सुकून जातो; आमच्या पापांनी आम्हास, वारा जसा पाचोळा दूर वाहून नेतो, तसे दूर नेले आहे.

ते सापाप्रमाणे धुळ चाटतील, भूमीतल्या सरपटणाऱ्यांप्रमाणे ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर निघतील. परमेश्वर आमचा देव याच्याकडे ती भयभीत होऊन येतील, आणि ते तुझ्यामुळे घाबरतील.