TSK

TSK · प्रेषि 13:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग कनानाचा पुत्र सिदकीया हा संदेष्टा मीखायाजवळ गेला. मीखायाच्या त्याने तोंडात मारले. सिद्कीया म्हणाला, “माझ्यातली परमेश्वराची शक्ती संपली आहे आणि तो आता तुझ्या मार्फतच बोलतो आहे अशी खरेच तुझी समजूत आहे?”

¶ परंतु हनन्या संदेष्ट्याने यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवरून जोखड काढून व तोडून टाकले.

त्यास त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला व त्यास म्हणाला, “आम्हास मसीहा (म्हणजे ख्रिस्त) सापडला आहे.”

¶ शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता, तो जादूचे प्रयोग करीत असे; त्याच्या प्रयोगामुळे शोमरोन प्रांतातील लोक आश्चर्यचकित होत असत, तो स्वतःला फार मोठा समजत असे.

ते संपूर्ण बेट पार करून पफे शहरास गेले, पफे येथे त्यांना एक यहूदी मनुष्य भेटला, तो जादूच्या करामती करीत असे, त्याचे नाव बर्येशू होते, तो खोटा संदेष्टा होता.

यान्नेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा, ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व विश्वास अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी माणसे आहेत.