TSK

TSK · प्रेषि 21:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तुमची बायकामुले तसेच लाकूड तोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्या छावणीतले सर्व उपरे ही आज याकरीता उभे आहेत.

जर परमेश्वर देवाची सेवा करणे हे जर तुम्हाला वाईट वाटते, तर तुम्ही ज्याची सेवा कराल, त्यास आज आपल्यासाठी निवडून घ्या; फरात नदीच्या पूर्वेकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली, त्यांची सेवा करा, किंवा ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांची सेवा करा, परंतु मी व माझ्या घरची माणसे आम्ही परमेश्वराचीच सेवा करू.”

यहूदातील सर्व मंडळी आपल्या पत्नी आणि तान्ह्या मुलांसकट सर्व अपत्यांना घेऊन परमेश्वरासमोर उभी होती.

याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्यास नमन करू;

¶ एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची त्यास विनंती केली. तो येशूला म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”

मग मंडळीने त्यांना पाठवल्यावर ते फेनीके व शोमरोन या शहरामधून गेले आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.

¶ आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली.