TSK

TSK · प्रेषि 26:12

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

ईजबेलने मग काही पत्रे लिहिली. पत्रांवर तिने अहाबाची सही केली. अहाबाच्या शिक्का वापरुन पत्रांवर तो शिक्का उमटवला. मग तिने ही पत्रे नाबोथाच्या गावच्या वडिलधाऱ्या मंडळींना आणि थोरामोठ्यांना पाठवली.

जे कोणी अन्यायकारक कायदे करतात आणि पक्षपाती हुकूम काढतात त्यांना धिक्कार असो.

परमेश्वराने तुला यहोयादाच्या जागी याजक म्हणून नेमले आहे. यासाठी की, परमेश्वराच्या मंदिराचा तू अधिकारी असावे. जो कोणी वेडा होऊन आपणास संदेष्टा करतो, ते सर्व लोक तुझ्या नियंत्रणात आहेत. तू त्यांना खोड्यात अडकवून व बेडी घालावी.

आता मुख्य याजकांनी व परूश्यांनी तर त्यास धरण्याच्या हेतूने अशी आज्ञा केली होती की, तो कोठे आहे असे जर कोणाला समजले तर त्याने कळवावे.

त्याविषयी महायाजक व सगळा वडिलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरूशलेम शहरात शासन करावयास आणावे.