TSK

TSK · प्रेषि 26:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

प्रतिष्ठापनेच्या वेळी त्यांनी शंभर बैल, दोनशे मेंढे, चारशे कोकरे होमात अर्पण केले. तसेच इस्राएलाच्या पापार्पणासाठी बारा बकरेही अर्पण केले. इस्राएलाच्या बारा घराण्यासाठी प्रत्येकी एक असे ते होते.

परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या, जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या.

येशू म्हणाला, ‹“मी तुम्हास खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी राजासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात ते सर्व बारा राजासनावर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल.›

¶ तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी राहत होती. ती आशेर वंशातील फनूएलाची मुलगी असून ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली.

‹म्हणून तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि आसनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा.›

अग्रिप्पा महाराज, मी स्वतःला धन्य समजतो कारण यहूद्यांनी आपल्यासमोर माझ्याविरुद्ध केलेल्या आरोपांचा बचाव करण्याची संधी आज मिळाली.

आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो की, आम्ही तुम्हास तोंडोतोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासांतील उणे आहे ते पूर्ण करावे.

¶ याकोब, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याजकडून, जगभर पांगलेल्या, विश्वास ठेवणाऱ्या बारा यहूदी वंशांना नमस्कार.