TSK

TSK · प्रेषि 7:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

नंतर देव अब्राहामाला पुढे म्हणाला, “आता या करारातील तुझा भाग हा असा, तू माझा करार पाळावा, तू आणि तुझ्या मागे तुझ्या वंशजांनी पिढ्यानपिढ्या पाळावयाचा माझा करार पाळावा.

इसहाकाने आपल्या पत्नीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली कारण ती निःसंतान होती, आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली, आणि रिबका त्याची पत्नी गरोदर राहिली.

¶ मग ते बेथेल येथून पुढे निघाले, ते एफ्राथ गावापासून काही अंतरावर आले असताना तेथे राहेलीस प्रसूतीवेदना सुरू झाल्या. तिला प्रसुतीच्या असह्य वेदना होत होत्या.

¶ त्यास लेआपासून झालेले पुत्र: याकोबाचा ज्येष्ठ मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून.

¶ इसहाक हा अब्राहामाचा पुत्र. एसाव आणि इस्राएल हे इसहाकाचे पुत्र.

अब्राहामास इसहाक झाला, इसहाकास याकोब, याकोबास यहूदा व त्याचे भाऊ झाले.

¶ “बंधुजनहो, कुलाधिपति दावीद: ह्याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे.

कारण वचनाचा शब्द असा आहे की, ‘मी या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल.’

आणि, मी हे म्हणतो की, देवाने तो करार आधीच स्थापल्यावर चारशेतीस वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द करू होत नाही.