TSK

TSK · प्रेषि 8:14

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

‹चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.›

‹जो माझा अवमान करतो आणि माझी वचने स्वीकारीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी, त्याचा न्याय करील.›

¶ पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस दुपारच्या तीन वाजता वर परमेश्वराच्या भवनात जात होते.

¶ यहूदी नसलेल्या लोकांनीसुद्धा देवाच्या वचनाचा स्वीकार केला आहे हे यहूदीया प्रांतातील प्रेषितांनी व बंधूनी ऐकले.

नंतर ते यरूशलेम शहरास आल्यावर तेथील मंडळी, प्रेषित व वडील ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले, तेव्हा आपण देवाच्या सहवासांत असतांना त्याने जे जे केले ते त्यांनी सांगितले.

आणि त्यांनी मला दिलेले कृपादान ओळखून, याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ होते त्यांनी मला व बर्णबाला उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यांत सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांनी सुंता झालेल्याकडे जावे.

आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हास स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वाढीविषयी उपदेश करावा;