TSK

TSK · आमो 6:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

आणि तुझा जो पुरुष मी आपल्या वेदीपासून काढून टाकणार नाही, त्यास जिवंत राखले जाईल यासाठी की, तो तुझे डोळे क्षीण करणारा व तुझ्या मनाला खेद देणारा होईल. आणि तुझ्या घराण्याची सर्व संतती ऐन तरुणपणात मरेल.

हे हामानाचे दहा पुत्र होते. हम्मदाथाचा पुत्र हामान यहूद्यांचा शत्रू होता. यहूद्यांनी या सर्वांना ठार केले खरे, पण त्यांची मालमत्ता लुटली नाही.

तेव्हा रानाकडून वादळी वारे आले आणि त्या घराच्या चार कोपऱ्यास धडकले, आणि ते त्या तरूणावर पडले आणि ते मरण पावले, केवळ मीच त्यातून बचावलो व तुला सांगण्यास इथे आलो.”

त्याचे वंशज कापून टाकली जावोत; पुढच्या पिढीत त्याचे नाव खोडले जावो.

परमेश्वर असे म्हणतो, “ज्या शहरातून हजार निघाले त्यामध्ये फक्त शंभर उरतील आणि ज्यातून शंभर असत त्यामध्ये इस्राएलाच्या घराण्याला दहा उरतील.”