TSK

TSK · आमो 7:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

नंतर तेथून इसहाक बैर-शेबा येथे गेला.

तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल.

¶ यहूदाचा राजा अजऱ्या याच्या अडतिसाव्या वर्षी यराबामाचा मुलगा जखऱ्या याने इस्राएलवर शोमरोनात सहा महिने राज्य केले.

तुझी माणसे थोडाच वेळ तुझे पवित्र स्थान ताब्यात घेतील, पण आमच्या शत्रूंनी तुझे पवित्र मंदिर पायाखाली तुडवले.

दुष्टतेची श्रध्दास्थानाने आणि इस्राएलाची पापे नाश पावतील त्यांच्या वेदींवर काटे व काटेरी झुडपे उगवतील. लोक पर्वतास म्हणतील, “आम्हास झाका” आणि टेकडयास म्हणतील, “आमच्यावर पडा”

पण बेथेलास शरण जाऊ नका; गिल्गालला जाऊ नका; सीमा ओलांडून खाली बैर-शेबालाही जाऊ नका. गिलगालमधील लोकांस कैदी म्हणून नेले जाईल, आणि बेथेल नाहीसे होईल.

¶ मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले, आणि तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यावर मार, म्हणजे इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल. आणि त्यांच्या डोक्यावर मारून त्याचे तुकडे कर. कोणी जिवंत राहिल्यास, मी त्यास तलवारीने ठार मारीन. त्यांच्यातल्या एकालाही पळून जाता येणार नाही, आणि त्यांच्यातल्या एकालाही सुटता येणार नाही.