TSK

TSK · दानि 1:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

फारो राजाने योसेफाला “सापनाथ-पानेह” असे दुसरे नाव दिले. फारोने ओन शहराचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ ही योसेफाला पत्नी करून दिली. योसेफ सर्व मिसर देशावर अधिकारी झाला.

बाबेलाच्या राजाने मत्तन्या याला राजा केले. हा यहोयाखीनाचा काका. त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले.

प्रमुख अधिकारी दानीएलास म्हणाला, “मला माझा स्वामी, राजांचे भय आहे त्याने तुम्ही काय खावे व काय प्यावे ह्याची आज्ञा केली आहे, तुमच्या वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुम्ही अधिक वाईट का दिसावे? तुमच्यामुळे तो माझे डोके छाटून टाकेल.”

दानीएलाने राजास केलेल्या विनंतीवरुन, राजाने शद्रुख, मेशख आणि अबेदनगो ह्यास बाबेलाच्या प्रांताचे प्रशासक नेमले पण दानीएल राजदरबारीच राहिला.

मी स्वप्न पाहिले आणि घाबरलो मी त्यावेळी आपल्या पलंगावर पडलो होतो. त्या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले.

उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नांचा उलगडा करणे, कोडी स्पष्ट करणे, आणि अडचणी सोडवणे, या गुंणवत्ता ज्या दानीएलात आढळल्या त्यास बेल्टशस्सर नाव दिले. आता त्या दानीएलाला बोलवा म्हणजे तो अर्थ सांगेल.”