TSK

TSK · दानि 2:46

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

हे करा यासाठी की, त्यांनी स्वर्गातील देवाला अर्पण आणावे आणि राजासाठी, माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करावी.

जेव्हा पेत्र आत गेला, तेव्हा कर्नेल्य त्यास भेटला, कर्नेल्याने पेत्राच्या पाया पडून आदराने त्यास नमन केले.

त्या बेटावरील लोकांस पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरून पडेल असे वाटत होते, बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना, तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले.

आणि, मी त्यास नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवानीचा आत्मा आहे.”