TSK

TSK · दानि 5:17

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तुझा दोरा, चपलेचा बंध, किंवा जे तुझे आहे त्यातून मी काहीच घेणार नाही, नाहीतर तू म्हणशील, ‘अब्रामाला मी धनवान केले.’

पण अलीशाने त्यांना उत्तर दिले, “ज्याच्यापुढे मी उभा राहतो त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ घेऊन सांगतो, मी काहीही घेणार नाही.” त्याने अलीशाला पुष्कळ आग्रह केला, पण त्याने नकार दिला.

मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन, आणि मी लज्जित होणार नाही.

¶ तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केली आणि त्यांना दानीएलास जांभळी वस्त्रे घालून त्याच्या गळयात सोन्याचा गोफ घातला आणि त्या विषयी राजाने जाहीर घोषणा केली की राज्यातील तिघा प्रशासकांपैकी हा एक आहे.