TSK

TSK · दानि 7:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

अलीशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि परमेश्वराच्या नावाने त्यांना शाप दिला. त्यानंतर दोन अस्वलींनी वनातून बाहेर येऊन त्यांच्यातली बेचाळीस मुले फाडून टाकली.

पाहा, मी त्यांच्याविरुद्ध माद्य लोकांस हल्ला करण्यासाठी उठवीन, ते रुप्याबद्दल पर्वा करणार नाहीत किंवा ते सोन्याने आनंदीत होणार नाही.

रानातील सर्व वन्य पशूंनो, जंगलातील सर्व पशूंनो या व खाऊन टाका!

प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “हे मानवाच्या मुला, तू सर्व पंख असलेल्या पक्ष्यांस व रानातील सर्व वन्यपशूस सांग, माझा यज्ञ, जो मोठा यज्ञ मी इस्राएलाच्या पर्वतावर तुम्हासाठी करतो, त्याकडे तुम्ही चोहोकडून एकत्र होऊन मांस खावे आणि रक्त प्यावे.

परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी आणि पारसी हयांना दिले आहे.”

मी पाहिले तो एक एडका पश्चिमेस नंतर उत्तरेस आणि नंतर दक्षिणेस धडक मारत होता, कोणी पशू त्यासमोर उभा राहू शकला नाही. त्याच्या तावडीतून कोणी सोडवण्यास सबळ नव्हता त्यास जे पाहिजे ते तो करी आणि तो महान झाला.

जिची पिल्ले चोरी झाली, अशा अस्वली सारखा मी तुमच्यावर हल्ला करीन, मी तुमचे उर फाडीन, आणि सिंहिनीप्रमाणे तुम्हास खाऊन टाकेन, जसा वनपशू तुम्हास फाडून टाकतो.