TSK

TSK · अनु 29:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

या ग्रंथात नसलेले उपद्रव आणि रोगसुद्धा परमेश्वर तुमच्या मागे लावील. तुमचा समूळ नाश होईपर्यंत तो हे करील.

माझा हात जे खोटे भाकीत करणाऱ्यां विरुध्द आहे, आणि खोटे दर्शन बघणाऱ्यां विरुध्द आहे, ते लोक माझ्या लोकांच्या सभेत येणार नाहीत, त्यांच्या नावाची नोंदणी इस्राएलाच्या घराण्यात होणार नाही, ते इस्राएलाच्या भूमीत निश्चित जाणार नाहीत. मग तुम्हास कळेल की मी परमेश्वर देव आहे.

‹मग मालक त्या चाकराचे तुकडे करील. त्या चाकराला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील आणि त्याठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.›

‹मग राजा जे आपल्या डाव्या बाजूला आहेत त्यांस म्हणेल, माझ्यापासून दूर जा. तुम्ही शापित आहात, सार्वकालिक अग्नीत जा, हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे.›