TSK

TSK · अनु 32:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मी माझे बोलणे संपवल्यानंतर ऐकणाऱ्यांना आणखी काही बोलायचे नसे. माझे शब्द त्यांच्या कानावर हळूवारपणे पडत.

कारण जसे पाऊस आणि बर्फ आकाशातून खाली पडतात आणि पुन्हा भूमी भिजवल्याशिवाय आणि उत्पन्न करण्यास व अंकुर व पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय आकाशात परत जात नाही.

मी इस्राएलास दहीवरासारखा होईल, तो भुकमळासारखा फुलेल आणि लबानोनात देवदारूप्रमाणे मुळ धरील.

जसे परमेश्वराकडून दहिवर येते, जशा गवतावर सरी येतात आणि त्या मनुष्याची वाट पाहत नाही व मनुष्याच्या मुलाची वाट पाहत नाही, तसे याकोबचे उरलेले लोक पुष्कळ लोकांच्यामध्ये होतील.

मी बी लावले, अपुल्लोसाने त्यास पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली.