TSK

TSK · उप 2:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मित्रांच्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला. तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी तुमच्यावर कष्टाचे जू लादले. मी तर तुम्हास आणखीच कामाला लावीन. त्यांनी तुमच्यावर आसूड उगवले, पण ती तर तुम्हास विंचवानी शिक्षा करील.”

रहबाम त्यांच्याशी यावेळी उद्धटपणे बोलला. मोठ्यांचा सल्ला त्याने मानला नाही.

नंतर मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे जी मी पार पाडली होती, आणि कार्य साधायला मी जे श्रम केले होते त्याकडे पाहिले, परंतु पुन्हा सर्वकाही व्यर्थ होते आणि वायफळ प्रयत्न करणे असे होते; भूतलावर त्यामध्ये तेथे काही लाभ नाही.

¶ हे ज्ञानही मी भूतलावर पाहिले आहे आणि हे मला फार महत्वाचे वाटते.

प्रत्येक उत्तम दान व परिपूर्ण देणगी देवाकडून आहे. जो बदलत नाही व फिरण्याने छायेत नाही अशा स्वर्गीय प्रकाश असणाऱ्या पित्यापासून ते उतरते.