TSK

TSK · निर्ग 10:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

परमेश्वर म्हणतो, की मी परमेश्वर आहे हे त्यास यावरुन कळेल: मी नदीच्या पाण्यावर माझ्या हातातील काठीने मारीन तेव्हा त्याचे रक्त होईल.

जेव्हा तुमची मुलेबाळे तुम्हास विचारतील की या उपासनेचा अर्थ काय आहे?

पुढील काळी तुमची मुलेबाळे विचारतील की हे काय? तेव्हा त्यांना सांग, ‘मिसर देशातून गुलामगिरीतून परमेश्वराने आम्हांला आपल्या हाताच्या बलाने बाहेर काढले.

फारो व त्याचे रथ व त्यांचे स्वार यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट झाला म्हणजे मी परमेश्वर आहे हे मिसरी लोकांस कळेल.”

आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील.

हे देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी ते आम्हास सांगितले आहे, की पुरातन दिवसात तू, त्यांच्या दिवसात काय कार्य केलेस.

म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे; खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.”

ज्या आम्ही ऐकल्या आणि ज्या आम्हास समजल्या, त्या आमच्या वाडवडिलांनी आम्हास सांगितल्या.

त्याने ही आज्ञा यासाठी दिली की, पुढच्या पिढीने म्हणजे जी मुले जन्माला येतील, त्यांनी त्या आज्ञा जाणाव्या, त्या आपल्या स्वतःच्या मुलांना सांगाव्या.

त्यांच्या मिळालेल्या देणगी व्दारे मी त्यांना अशुद्ध केले. हे सर्व झाल्यामुळे त्यांना गर्भाशयातून प्रथम जन्मलेल्या बालकांचा अग्नीत होम केला, हे केल्याने त्यांनी भीती बाळगावी आणि समजावे की मी परमेश्वर देव आहे.

ह्याविषयी आपल्या मुलाबाळांना सांगा, आणि तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना सांगावे, व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस सांगावे.