TSK

TSK · निर्ग 32:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या वंशजांना देईन.” ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वरासाठी वेदी बांधली.

मग त्याने त्यास बाहेर आणले, आणि म्हटले, “या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्यास म्हणाला, “असे तुझे संतान होईल.”

त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार केला. तो म्हणाला, “मिसर देशाच्या नदीपासून फरात महानदीपर्यंतचा

आणि म्हटले, हे परमेश्वराचे शब्द आहेत, “मी परमेश्वर आपलीच शपथ वाहून म्हणतो की, तू ही जी गोष्ट केली आहे, म्हणजे तू आपल्या एकुलत्या एका मुलाला राखून ठेवले नाही,

या देशात उपरी म्हणून राहा आणि मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला आशीर्वाद देईन; कारण हे सर्व देश मी तुझ्या वंशजाला देईन, आणि तुझ्या बाप अब्राहाम याला शपथ घेऊन जे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन.

तुझे वंशज पृथ्वीवरील मातीच्या कणाइतके होतील, आणि तुझा विस्तार पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे व दक्षिणकडे होईल. तुझ्यामध्ये व तुझ्या वंशजांमध्ये पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील.

तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता, तोच या मुलांना आशीर्वाद देवो. आता या मुलांना माझे नाव व वडील अब्राहाम व इसहाक यांचे नाव देण्यात येवो. ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे, कुळे व राष्ट्रे होवोत.”

तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी आठवेन तसेच इसहाकाशी केलेला करार व अब्राहाम ह्याच्याशी केलेला करार यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन.

अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुझ्या सेवकांना तू शब्द दिला आहेस तो आठव. त्यांचा ताठरपणा विसरून जा. त्यांची पापे किंवा दुराचार यांच्याकडे दुर्लक्ष कर.

¶ जेव्हा देवाने अब्राहामाला वचन दिले, तेव्हा त्याच्यापेक्षा कोणी मोठा नसल्याने देवाने स्वतःच्याच नावाने शपथ वाहिली.