TSK

TSK · निर्ग 39:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ निवासमंडप दहा पडद्यांचा कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतापासून तयार करावेत. व त्यावर कुशल कारागिराकडून करुब काढावेत.

¶ त्यांनी सोन्याची जर आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड वापरून ही वस्रे तयार करावीत.

पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या पुत्रांची पवित्र वस्रे.”

पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या पुत्रांची वस्रे ही सर्व त्यांनी आणली;

जेव्हा याजक तेथे प्रवेश करतील, तेव्हा त्यांनी पवित्रस्थानातून बाहेरच्या अंगणात जाऊ नये तर ज्या वस्त्रांनी ते सेवा करतात ती त्यांनी बाजूला तेथेच उतरवून ठेवावी कारण ती वस्त्रे पवित्र आहेत. म्हणून त्यांनी लोकांपुढे जाण्याआधी दुसरी वस्रे घालावी.”

बकरे किंवा वासरु यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन; व त्याने सार्वकालिक खंडणी मिळवून एकदाच परमपवित्रस्थानात गेला;