TSK

TSK · उत्प 1:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

पाहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे, किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो! परंतू त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल?”

परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत.

जेव्हा तू आपला आत्मा पाठवतोस, तेव्हा ते उत्पन्न होतात, आणि तू भूप्रदेश पुन्हा नवीन करतोस.

आकाशाचा निर्माणकर्ता, तोच सत्य देव, ज्याने पृथ्वी निर्माण केली व घडवली, तिची स्थापना केली. ती त्याने उजाड अशी निर्मिली नाही, ज्याने ती वस्ती करण्यासाठी निर्माण केली, तो परमेश्वर असे म्हणतो, “मीच परमेश्वर आहे व दुसरा कोणी नाही.”

निनवे रिकामी आणि ओसाड झाली आहे. तिच्या हृदयाचे पाणी झाले आहे, पाय लटपटत आहेत, आणि प्रत्येकजण यातनेत आहे; त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडले आहेत.