TSK

TSK · उत्प 22:11

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या मालकिणीकडे परत जा आणि तिच्या अधिकारात तिच्या अधीनतेत राहा.”

¶ या गोष्टी झाल्यानंतर देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली. तो अब्राहामाला म्हणाला, “अब्राहामा!” अब्राहाम म्हणाला, “हा मी येथे आहे.”

आणि म्हटले, हे परमेश्वराचे शब्द आहेत, “मी परमेश्वर आपलीच शपथ वाहून म्हणतो की, तू ही जी गोष्ट केली आहे, म्हणजे तू आपल्या एकुलत्या एका मुलाला राखून ठेवले नाही,

रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?”

¶ परमेश्वराचा दूत गिलगालाहून वर बोखीमास चढून आला आणि तो म्हणाला, “मी तुम्हाला मिसरातून काढले आणि तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही;

आणि परमेश्वर आला आणि उभा राहिला; त्याने पहिल्या वेळेप्रमाणे, “शमुवेला शमुवेला,” अशी हाक मारली. तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोल तुझा दास ऐकत आहे.”

शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, ‹“शौला, शौला, तू माझा छळ का करतोस?”›