TSK

TSK · उत्प 22:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

देव म्हणाला, “नाही! परंतु तुझी पत्नी सारा हिलाच मुलगा होईल, आणि त्याचे नाव तू इसहाक असे ठेव. मी त्याच्याशी निरंतरचा करार करीन; तो करार त्याच्यानंतर त्याच्या वंशजांसोबत निरंतर असेल.

परंतु देव अब्राहामाला म्हणाला, “मुलाकरता व तुझ्या दासी करता दुःखी होऊ नकोस. तुला ती या बाबतीत जे काही सांगते, ते तिचे सर्व म्हणणे ऐक. कारण इसहाकाद्वारेच तुझ्या वंशाला नाव देण्यात येईल.

आणि म्हटले, हे परमेश्वराचे शब्द आहेत, “मी परमेश्वर आपलीच शपथ वाहून म्हणतो की, तू ही जी गोष्ट केली आहे, म्हणजे तू आपल्या एकुलत्या एका मुलाला राखून ठेवले नाही,

मग दोन महिन्यांच्या शेवटी असे झाले की ती आपल्या बापाजवळ माघारी आली, नंतर त्याने आपण केलेल्या नवसाप्रमाणे तिचे केले. तिचा पुरुषाबरोबर कधीच शारीरीक संबंध आला नव्हता, आणि इस्राएलात अशी रित झाली की,

¶ यरूशलेम येथील मोरिया डोंगरावर शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. शलमोनाचे पिता दावीद यांना परमेश्वराने याच मोरिया डोंगरावर दर्शन दिले होते. दावीदाने योजनापुर्वक तयार करून ठेवलेल्या जागेवर शलमोनाने मंदिर बांधले. ही जागा म्हणजे अर्णान यबूसीचे खळे होय!

¶ ‹कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे.›

आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही, पण आपल्या सर्वांसाठी त्यास दिले, तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टीही का देणार नाही?

देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हास जीवन मिळावे. अशाप्रकारे त्याने त्याची आम्हावरील प्रीती दाखवली आहे.