TSK

TSK · उत्प 29:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

त्याने नगराबाहेरच्या विहिरीजवळ आपले उंट खाली बसवले. ती संध्याकाळ होती, त्या वेळी पाणी काढायला स्त्रिया तेथे येत असत.

आणि फारोने याविषयी ऐकले तेव्हा त्याने मोशेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मोशे फारोपासून दूर पळून गेला. तो मिद्यान देशात गेला आणि तेथे एका विहिरीजवळ बसला.

मी काळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका. कारण सूर्याने मी होरपळले आहे. माझे स्वतःचे भाऊ माझ्यावर रागावले होते. त्यांनी मला द्राक्षांच्या मळ्याची राखण करण्यास ठेवले. परंतु मी आपल्या स्वत:च्या द्राक्षमळ्याची काळजी घेतली नाही.

तेथे याकोबाची विहीर होती. म्हणून प्रवासाने दमलेला येशू तसाच त्या विहिरीजवळ बसला, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते.

कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा स्वतः त्यांचा मेंढपाळ होईल, आणि तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेईल; आणि देव स्वतः त्यांच्या डोळ्यातील सर्व अश्रू पुसून टाकील.