TSK

TSK · उत्प 35:12

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

लोट अब्राहापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू जेथे उभा आहेस त्या ठिकाणापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे पाहा.

या देशात उपरी म्हणून राहा आणि मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला आशीर्वाद देईन; कारण हे सर्व देश मी तुझ्या वंशजाला देईन, आणि तुझ्या बाप अब्राहाम याला शपथ घेऊन जे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन.

पाहा, तिच्यावरती परमेश्वर उभा होता, आणि तो म्हणाला, “मी परमेश्वर, तुझा बाप अब्राहाम याचा देव व इसहाकाचा देव आहे. तू ज्या भूमीवर झोपला आहेस, ती मी तुला व तुझ्या वंशजांना देईन.

देवाने त्यांचे कण्हणे ऐकले आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराची त्यास आठवण झाली.

¶ इस्राएल सैन्याच्या भीतीमुळे यरीहोची सर्व प्रवेशद्वारे मजबूत लावून घेण्यात आली होती; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.