TSK

TSK · उत्प 43:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

अब्राम म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्क शहरातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?”

त्या भावांच्याबरोबर योसेफाने बन्यामिनास पाहिले. तेव्हा तो आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “या लोकांस माझ्या घरी आण. पशू मारून भोजन तयार कर, कारण हे सर्वजण दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.”

‹संध्याकाळी द्राक्षमळ्याचा मालक मुकादमाला म्हणाला, ‘मजुरांना बोलवा आणि त्यांना त्यांची मजुरी देऊन टाका, मी ज्यांना अगदी शेवटी कामावर आणले त्यांना अगोदर मजुरी द्या, नंतर बाकीच्या सर्वांना मजुरी द्या, मी कामावर रोजगारीने पहिल्याने बोलावलेल्यांना सर्वात शेवटी मजुरी द्या.’›