TSK

TSK · उत्प 47:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तुम्ही माझ्याजवळ गोशेन प्रांतात राहा. आणि तुम्ही, तुमची मुले, नातवंडे तसेच तुमची शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि जे काही तुमचे आहे ते माझ्याजवळ राहील.

¶ याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली.

तेव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हास गोशेन प्रांतात राहू देईल. मिसरी लोकांस मेंढपाळ आवडत नाहीत.”

गोशेन प्रांतात इस्राएल लोक राहत होते तेथे गारांचा मुळीच वर्षाव झाला नाही.