TSK

TSK · उत्प 47:29

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

अब्राहामाने त्याच्या सर्व मालमत्तेचा व घरादाराचा कारभार पाहणाऱ्या आणि त्याच्या घरातील सर्वांत जुन्या सेवकाला म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव,

याकोबाने फारोस उत्तर दिले, “माझ्या कष्टमय जीवनाची वर्षे फक्त एकशे तीस वर्षे आहेत. परंतु माझ्या पूर्वजांइतके दीर्घ आयुष्य मला लाभले नाही.”

‘माझा बाप मरावयास टेकला असताना त्याने मला शपथ घेण्यास सांगून म्हटले, “पाहा, मी मरणार आहे. माझी जी कबर मी आपणासाठी कनान देशात खणून ठेवली आहे तिच्यात तू मला नेऊन पूर.” तेव्हा कृपा करून माझ्या पित्यास पुरावयास जाऊ द्या; मग मी परत येईन.

योसेफाचे मरण जवळ आले तेव्हा तो आपल्या भावांना म्हणाला, “माझी मरण्याची वेळ जवळ आली आहे; परंतु देव तुमची काळजी घेईल हे मला माहीत आहे. तो देव तुम्हास या देशातून काढून अब्राहाम, इसहाक, व याकोब यांना जो देश देण्याचे वचन त्याने दिले होते त्या देशात घेऊन जाईल.”

तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू आता लवकरच मरण पावशील व आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून ते वेश्येसमान त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील.”

तर पाहा, आज मी सर्व जग जाते त्या वाटेने जात आहे; परंतु तुम्ही आपल्या संपूर्ण मनात व आपल्या संपूर्ण चित्तात जाणता की ज्या चांगल्या गोष्टी तुमचा देव परमेश्वराने तुमच्याविषयी सांगितल्या, त्या सर्वांतली एकही गोष्ट कमी पडली नाही; अवघ्या तुम्हाला प्राप्त झाल्या; त्यातली एकही गोष्ट कमी पडली नाही.

आपण सर्वच कधीतरी मरण पावणार आहोत. जमिनीवर पडलेल्या पाण्यासारखी आपली स्थिती होणार आहे. सांडलेले पाणी पुन्हा भरता येत नाही. देव क्षमाशील आहे हे तुम्ही जाणता. स्वसंरक्षणासाठी पळालेल्याच्या बाबतीतही देवाची काही योजना असते. देव त्यास आपल्यापासून पळायला लावत नाही.

“प्रत्येक मनुष्यास पृथ्वीवर खूप कष्ट करावे लागतात की नाही? त्याचे आयुष्य मजुराच्या आयुष्यासारखे असते कि नाही?

तू मला माझ्या मृत्यूकडे घेऊन जात आहेस हे मला माहीत आहे. प्रत्येक जिवंत मनुष्यास मरावे हे लागतेच.

त्यातील कोणीही आपल्या भावाला खंडून घेण्यास समर्थ नाही, किंवा त्याच्यासाठी देवाकडे खंडणी देववत नाही.

कोण जिवंत राहिल आणि मरणार नाही किंवा कोण आपला जीव अधोलोकातून सोडवील?

¶ ज्याअर्थी लोकांस एकदाच मरणे व नंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,