TSK

TSK · उत्प 7:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

देवाने त्यास आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व प्रकारचे देहधारी प्राणी नर व मादी असे तारवात गेले. मग परमेश्वराने दार बंद केले.

परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सगळे काम केले.

मी जेव्हा तुझ्या सर्व आज्ञांचा विचार करीन तेव्हा मी कधीही लाजणार नाही.

आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, ‹“देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझे आई व भाऊ.”›

तेव्हा येशू त्यांना म्हणाला, ‹“तुम्ही जेव्हा मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हास हे कळेल की तो मी आहे आणि मी स्वतः काही करीत नाही तर पित्याने मला सांगितल्याप्रमाणे मी हे करतो.›

आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.